बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही करायचं
पण,,,,
कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी ,
होणार्या बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा
अल्पसा प्रयत्न,,,,
आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते
पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,,
ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,,
जेवण करणारी आई लक्षात राहते,
पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला
विसरतो आपण ,,नियमच,,,
स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,,
बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,,
देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,,
कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,,
कौसल्येचा राम असेल हि पण,,,
पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,,
मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो
तो बापच,,, नियमच,,,
आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या
बनियानवर ,,,नियमच,,,
आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून मध्ये,
तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,,
आमच्या आजारपणात धावणारा बाप
स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच ,,,
आजाराला नाही घाबरतो एक महिन्याच्या आरामाला
,,,नियमच,,,
पोरीच लग्न अन पोराच शिक्षण ,,,नियमच,,,
परीक्षेत निकाल आणि निक्काल लागल्यावर जवळ घेणारी आई लक्षात राहते
पण तो हळूच जावून पेढे आणतो त्यालाच विसरतो ,,नियमच,,,
ठेच लागली तर आई ग,,,
आणि मोठ्ठा रस्ता ओलांडताना ,
अचानक ट्रक करकचून ब्रेक दाबतो
तोंडातून आपसूक निघत "बाप रे",,,नियमच,,,
छोट्या संकटासाठी आई आणि वादळाला टक्कर देण्यासाठी
लढण्यासाठी बापच लागतो मग या बापच स्मरण
कौतुक आपण नाही करणार तर कोण,,,?
कारण उद्या आपण हि बाप होणार असतो ,,,
नियमच असतो तो,,,
1 comments:
ReplyDeleteमैत्रेय१९६४ said...
प्रिय सुनिल,
मुंबईत ब्लॉगरच्या मेळाव्यात आपण भेटलो. मनाने कुठेतरी कौल दिला की आपले जमणार. मराठी असण्याचा योग्य अभिमाने आपल्या दोघांनाही आहे. तुझा ब्लॉग मी वाचला आहे. मनात असेल ते बेधडक पणे लिहीणे हे तुझ आंगभूत वैशिष्ट. अस लिहीण किती कठीण असत हे मला कळत. असो.
आईच्या माये बद्दल खुप लिहील गेल आहे. पण बापाची पण माया असते हे तुझ्या सारखा बाप माणुसच स्पष्ट लिहू शकतो. आम्हा बाबा लोकांच्या भावना व्यक्त केल्या बद्दल आभार.
लवकरच प्रत्यक्षात भेटु ही आशा.
मैत्रेय१९६४ अर्थात देवेंद्र मराठे