Skip to main content

माकड आणि बाप

सध्या मी एक जाहिरात पाहतोय पीयर्स साबणाची
त्यात ती आई आपल्या मुलीला शिकवतेय आंघोळ घालताना
बाबरचा मुलगा हुमायु,हुमायुचा मुलगा अकबर ,,,,,,,,,,?
आणि अचानक मला
टोपी विक्याची गोष्ट आठवली ,,,,
एक टोपी विक्या असतो ,

त्याच्या टोप्या माकड पळवतात मग रागाने तो डोक्यावरची 
टोपी खाली टाकतो आणि मग माकड हि टोप्या खाली टाकतात
मग खुश होत त्या टोप्या उचलून घरी जातो वैगेरे वैगेरे ,,,,,आता त्यानंतरची गोष्ट ,,,,,,

टोपी विक्या पार्ट २,
कालांतराने त्या टोपी विक्याचा मुलगा मोठा होतो,
आता टोपीचा व्यवसाय तो मुलगा करू लागतो
बापाच्या मार्गदर्शनाखाली ,,,,,,
तो रोज टोपी विकायला गावोगावी जात असे .कधी या गावी तर कधी त्या गावी बाप सांगेल तसा तो धंदा करत असे
आणि एक दिवस 

त्याला त्याच जंगलातून जावे लागणार 
असते दुसर्या गावी टोपी विकायला
ज्या जंगलात माकडांनी त्याच्या बापला त्रास दिलेला असतो,,
हे समजल्यावर ईकडे बाप चिंतेत पडतो पण,
सावरतो आणि सारा घटनाक्रम मुलाला सांगतो ,
आणि मग कस वागायचं ते हि सांगतो .त्याला बजावून सांगतो कि,
बाबारे त्या जंगलातून जाताना सावध बरका!तिथे ती माकड आहेत ज्यांनी मला खूप त्रास दिला होता त्यामुळे त्या जंगलात तू 

बिलकुल थांबू नकोस ,
थांबलास तर जेवू नकोस
जेवलास तर झोपू नकोस
आणि अत्यंत सावध राहा पण 

तरीही हि सारी खबरदारी घेवूनही
तू झोपलास आणि तरही माकडांनी तुझ्या 

टोप्या पळवल्याच
तर आधी काही दगड त्यांच्यावर भिरकाव
ते सुद्धा तुझ्यावर दगड किंवा फळ भिर्कावातील
अस थोड नाटक कर आणि मग वैतागून
तुझ्या डोक्य्वरची टोपी तू खाली टाक ती माकड हि त्यांनी पळवलेल्या
तुझ्या टोप्या खाली टाकतील,,,,,,,,,,,,
त्यालागेच उचलायच्या आणि सरळ आपल्या गावाचा रस्ता धरायचा .
जा नीट जा सावध राहा ,,,,,,असा सगळा गृहपाठ करून तो मुलगा टोपी विकायला बाहेर पडतो आणि सारी खबरदारी घेवूनही
जे घडायचं ते घडत भयंकर उन्हा पासून बचाव करण्यासाठी
तो जंगलाचा आश्रय घेतो सावलीत बसतो,
जेवतो आणि थंडगार पाणी पिवून तो झोपी हि जातो ,,,,,,
झाल ईकडे माकड नेहमी प्रमाणे त्याच्या टोप्या पळवतात.
थोड्या वेळाने हे महाराज जागे होतात.
आणि झाला प्रकार लक्षात येतो बापान सांगितलेलं सार आठवत
तो त्या प्रमाणे सर करतो आणि आता शेवटचा प्रयोग
तो आपल्या डोक्यावरची टोपी रागावून खाली टाकतो ,.,,,,,
आणि आता माकड आपल्या डोक्य्वाराची टोपी खाली टाकतील
या आशेन तो वर बघत बसतो पण तोवर ,,,,,,,,,,
एक तरुण माकड हळूच खाली उतरत आणि त्याने टाकलेली
टोपी हि पळवत,,,,,,,,,,
टोपी विक्याच्या हे गावी हि नसत कि खरच अस घडेल?
तो विचार करत डोक्याला हात लावतो,ईतक्यात ते तरुण माकड बोलत 

अरे बाबा तुला तुझा बाप शिकवतो आणि आम्हाला आमचा बाप शिकवणार नाही काय?
आमच्या बापान सांगितलं होत कि ,टोपी विक्या आपली
टोपी रागावून खाली टाकेल पण तुम्ही तस करू नका
उलट जमलच तर त्याने खाली टाकलेली टोपीही पळवा,,,,,,,,,,,
तात्पर्य-
आपल्या मुलाला तुम्ही नक्की काय शिकवणार ?
हुमायुचा मुलगा अकबर कि छ्त्रपतींचा मुलगा संभाजी
जो खरा नरसिंह होता मुसलमानांना शरण नाही गेला .
हाल हाल करून त्या पापी औरंग्याने  त्यांना मारले परंतु
चकार शब्द नाही काढला. हे आणि असे एक पेक्षा एक वीर आपल्याकडे असताना
आपल्याला अकबर आणि हुमायुचा ईतिहास का शिकालावला जातो
जाहिरातींच्या माध्यमातून?
उद्या हि आपलीच मुले आपल्याला हुमायु आणि अकबराचा
ईतिहास सांगतील ,,,,,,
तेव्हा हा हुमायु कोण आणि अकबर कोण ते आपण मुलांना सांगितलं पाहिजे,
ईतिहासातील चुका सांगितल्या पाहिजेत,
त्या चुका सुधारण्याची शिकवण आपण त्यांना दिली पाहिजे,
उगाचच मराठ्यांना दुहीचा शाप आहे राग आळवत बसून काही उपयोग नाही
अरे आता
कळल शाप आहे तो मग आता सुधारकी स्वतःला
स्वतःच्या चुकांना
आपल्या बापाने केली चूक जर ती माकड सुधारत असतील तर
ती आपल्या पेक्षा हुशार म्हंटली पाहिजेत नाही का?
आणि हे प्रत्येक बापच कर्तव्य आहे ती चूक सुधार्याला
मुलाला मदत करन.   
 
 
 
 

Comments

  1. वा. जुन्या गोष्टीचं नवीन व्हर्जन तर मला नेहेमीच आवडतं...पण त्याचा सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी केलेला उपयोग सुद्धा आवडला.

    -विक्रम नरेंद्र वालावलकर.

    ReplyDelete
  2. तु ईतक सर्व लिहायला वेळ कसा काढातोस तेच उमजत नाही. वाचनाने माणुस घडतो हे सत्यच आहे पण तरीही मला अस वाटत की तु एकाच ब्लॉगवर सगळ लिहीलस तर जास्त लोकां पर्यन्त पोहोचल. विचार कर

    ReplyDelete
  3. avadali tuzi goshta tyapeksh tatparya

    jahirati mdhye jyancha udoydo hota je aaptya hindustanache shatru ahet,
    Jyani apalya Hindunva atyachar kele, Hindu mahilanvar blatkar kele tyancha ietihar shukaun kay apalya mulanna prerana milanar?
    tyanchya eitihasat fakta balatkar kashe karayache Aani Hinduna lutayacha kase, hinduncha chhal kasa karayach hech kalanar.
    apalya mulanni kay he snskar ghyayache kay?

    mitra asech mail pathavun lokanmadhye jagruti keli pahije, nahitar kahi divasat shivaji maharanpeksh congres chasan afazal khanachi punyatithi sajari karel.

    ReplyDelete
  4. मराठे इतिहास विसरले हेच दुख आहे

    ReplyDelete
  5. एक तर माझे विचार पटत असतील तरच हे वाच
    आणि जितेंद्र म्हणजे कोण? जितेंद्र आंग्रे का?
    मी तुझा फोन लावतोय पण फोन लागत नाही
    आणि नसेल तर बाबर काय तुझ्या ,,,,,,,,,,,, होता काय?
    तुला काय माहित बाबर कोण होता?
    त्याला तू भारतीय ठरवलास तेव्हाच तुझी विद्द्वत्ता कळली परंतु दुर्लक्ष केले
    तुझ्या कोमेंत्स ठेवायच्या की काढायच्या हा माझा अधिकार आहे
    त्यासाठी तू मला भित्रा ठरवणारा कोण?
    कारण मला जे माहित आहे ते सांगण्यासाठी मी याचा वापर करतो तुझ्या सारख्या
    मुर्खना उत्तर देण्यासाठी नाही करत .
    तुला काय माहित जिहाद काय?
    मुसलमान काय?
    अकबर गाझी कधी झाला ?
    गाझी चा अर्थ काय?
    कुराण म्हणजे काय?
    शरियत म्हणजे काय?
    चार दोन पुस्तकातली वाक्य फेकली म्ह्जंजे झाले काय?
    आणि ब्लोग च्या आडून मला मेल करू नकोस तुझा मेल कळव
    किंवा मला फोन कर 9869849063

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...