एक प्रेमकथा
बॉलीवूड मधील घराण्यांनी आता पर्यंत अनेक हिरोंना मोठ करण्यासाठी
त्याला तयारच होणार तोच एक आक्रीत घडत ,,,,
बॉलीवूड मधील घराण्यांनी आता पर्यंत अनेक हिरोंना मोठ करण्यासाठी
भव्य दिव्य प्रेमकथा काढल्या ,,,
पण काईट्स,,,,,,,,,,त्याहून खूप वेगळा असा सिनेमा आहे .
असे नाही पण तरी सुद्धा हि आजची प्रेमकथा आहे ,
हे प्रेम देश, भाषा, धर्म,या सर्वांची सीमा ओलांडून
खर प्रेम दशांगुळे वर उरत हे अनुराग बसूने अत्यंत उत्तम रित्या सांगितलं आहे .
लासवेगात साल्सा नृत्य शिकवून फावल्या वेळात
बेकायदा अमेरिकेत आलेल्या मुलीं सोबत (ग्रीन कार्ड साठी)
लग्न लावायचा व्यवसाय करणाऱ्या "जे" (ह्रितिक रोशन)
या हरफान मौला वृत्तीच्या तरुणाची आणि ,,,,,
आपल भल मोठ्ह कुटुंब पोसण्यासाठी पैसे कमवण्याच्या उद्देशाने
मेक्सिको मधून बेकायदेशीर रीतीने अमेरिकेत येवून
टोनी( निकोलस ब्रावून) या कसिनो मालकाच्या मुलाशी लग्न करणाऱ्या
नताशा उर्फ लिंडा ( बार्बरा मोरी),,,
यांची कथा ,,,
हॉलीवूडला टक्कर देईल अस या बोलीवुडी प्रेमकथेत दम आहे
यात जे वर प्रेम करणारी जिना आहे (कंगना)
टोनीचा बाप कबीर बेदी आहे ,,
तर अशा ह्या जे च्या प्रेमात कबीर बेदीची मुलगी पडते आणि जे हि तिची श्रीमंती पाहुन त्याला तयारच होणार तोच एक आक्रीत घडत ,,,,
तोच हा प्रेमानुभव म्हणजे ,,,,काईट्स,,,
अचानक लिंडा त्याच्या समोर येते जिच्याशी त्याने आधी खोटा विवाह केलेला असतो.
पण का कुणास ठाऊक एक हलकेशी प्रेमाची चुणूक सुद्धा अनुभवलेली असते.
तोच तो तरल प्रेमानुभव त्याला पुन्हा अनुभवायला मिळतो ,,,प्रेमानुभव .
पण दुर्दैव ती समोर येते खरी पण ,,,
कबीर बेदीच्या मुलाची भावी बायको म्हणून ,,,
आणि कबीर बेदी मोठ्ठा डॉन असतो,
नियतीला काही वेगळच मंजूर असत तिला हवा असतो ,,,प्रेमानुभव .
आपसूकच मग अव्यक्त प्रेम व्यक्त केल जात ,
अशी काही परिस्थिती निर्माण होते कि दोघांना पळून जाव लागत ,,,,
विदेशातल चित्रण ,हॉलीवूडला टक्कर देणारा हृतिक ,
तितक्याच समर्थ पणे त्याला साथ देणारी लिंडा ,,
सुंदर छाया चित्रण, त्याचा डान्स ,उत्तम लोकेशन्स ,आणि ,,,
त्यात हि प्रेमात आकंठ बुडालेले अंगावर येणारे त्याचे निळे डोळे ,,,
विशेषतः हिरोईन जखमी झाल्यावर
मित्राच्या सोबतीने तिला बिनधोक परत पाठवायचा केलेला
केविलवाणा प्रयत्न ,,,,
ती निघते खरी जायला आणि फिरून मागे बघते
आपल्याला कळत हि नाही ईतक्यात ती परत येते
आणि खाडकन (प्रेमाने) त्याच्या कानाखाली लगावते
आणि आपण समजून जातो तिला त्याला सोडून जायचं नाही
आणि त्याला हि तिच्या शिवाय जमायचं नाही
एक पाचच मिनिटाचा सीन असेल पण
जान कुर्बान करावीशी वाटते ,,,हाच तो प्रेमानुभव,,,,
त्यानंतर त्याचं रीतसर लग्न होत ,
पण गुंड येतात दोघेही पुन्हा जीव वाचवून पळतात,
याही वेळी कबीर बेदीचा अंगरक्षक त्याला मदत करतो
पण तो बराच जखमी असतो लिंडा कशीबशी
त्याला त्याचा जीव वाचवा
म्हणून रेल्वेच्या डब्यात बसवते व स्वतः गुंडांना सामोरी जाते
त्यावेळी त्या डब्याच्या बंद दरवाज्यातून
हृतिक तिला जी कळवळून हाक मारतो,,,,
लिंडा आआआ ,,, हा प्रेमानुभव ,,,
कसाबसा तो जिवंत राहतो तो आपला मोबाईल शोधतो
आणि दशवातर दुर्दैवाचे पुन्हा सुरु होतात ,
खरतर हिरोईन लिंडा च काय झाल हे येथ पर्यंत आपल्याला ठाऊक नसत.
येथे हि तो अंगरक्षक त्याला सर्व हकीकत सांगतो .
पण परत सार्या गुंडांकडून तो घेरला जातो
सार्यांना तो मारतो हि पण प्रेमाच तिसर टोक कंगना ,,,
ती कशी गप्प बसेल ?तीच हि ह्रितिक वर प्रेम असत ,,
त्याची शिक्षा म्हणून ती त्याला गोळी घालते
पण उत्कट प्रेमाच्या जोरावर ह्रितिक जिवंत राहतो
कारण त्याला,,,,तो अनुभव घ्यायचा असतो ,,,,,,,?
त्याच परिस्थितीत उठतो गाडी काढतो आणि ,,
जातो त्या ठिकाणी ,,,
जिथून त्याच्या प्रेमिकेने आत्महत्या केलेली असते ,,,
त्याच कड्यावर उभा राहून स्वतःला तोही झोकून देतो ,,,हाच प्रेमानुभव ,,
जात पात भाषा धर्म यांना खर प्रेम अडवू शकत नाही ,,हा प्रेमानुभव ,,,
उत्कट तितकाच उदात्त ,,,प्रेमानुभव ,,
हा प्रेमानुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे ,
ज्यान प्रेम केल आहे ,ज्याला करायचं आहे त्याने ,
आणि ज्याला प्रेम म्हणजे काय ते कशाशी खातात
ते काळाव म्हणून हि घ्यावा असा ,,,प्रेमानुभव
आणि पुन्हा मोह आवरत नाही म्हणून सांगतो
ह्रितिकच्या निळ्या डोळ्यातून प्रेमाची वेदना अक्षरशः बोलते
म्हणजे काय ते समजण्यासाठी काईट्स पहा ,,,प्रेमानुभव घ्या
आणि यातली गाणी अरे अन्याय होईल रे ,,,
झींदगी दो पल कि,,,,,झपाटून टाकत प्रेमानुभव म्हणजे काय ते सांगत .
दिल क्यू ये मेरा ,,, प्रेमाचा तरल अनुभव देत प्रेमानुभव .
आणि सुरवातीचा कंगना आणि ह्रितिक चा डान्स ,,,
काय बोलावं,,,?
या सार्याचा एकत्रित अनुभव म्हणजे
ह्रितिक आणि लिंडाचा ,,,काईट्स
प्रेम म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय नाही कळत ,,तो काईट्स
प्रेमात स्वतःला अर्पण करण म्हणजे ,,,प्रेमानुभव ,
मग चला तर मग हा अनुभव तुम्हीही घ्या जो मी घेतला
प्रेमानुभव ............
Comments
Post a Comment