Skip to main content

हरीण आणि कोल्हा

काल सकाळीच बातमी वाचली
आमदारांना घसघशीत पगार वाढ ,,,,,,,,
आणि त्या आधी ३ रु. ने पेट्रोल महाग झाल्याची बातमी आली होती
मग अचानक वाघ,उंदीर,मुंगुस,हरीण आणि कोल्हा यांची गोष्टआठवली .
या सार्यांची बर्या पैकी मैत्री होती.
एक दिवस मात्र कोल्हा अचानक वाघाकडे जावून त्याला म्हणाला ,
"हे हरीण कित्ती सुंदर आहे ना?"
याच मांस खायला मिळाल तर कित्ती बर ना?
तास बरेच दिवस वाघाच्या हि मनात होताच पण जनक्षोभाला
घाबरून तो गप्प होता आणि आता हि कोल्हा तस म्हणाल्यावर
त्याने लगेच प्रतिक्रिया नाही दिली .
पण कोल्हा बदमाश त्याने परत सांगितलं तसा वाघ म्हणाला ,
मी त्याला मरेन रे पण लोक काय म्हणतील?
मित्राला मारलं...... त्यापेक्षा मी सांगतो तस कर,,
तू उंदराकडे जा,.आणि त्याला हरिणाची खुर कुरतडायला संग,
हरीण लंगड झाल कि मी मारतो आणि कुणी काही
बोलला तर सांगू बिचार लंगड झाल होत त्याचे पुढे हाल होवू नयेत म्हणून
मी त्याला मारलं,,,,,
झाल प्ल्यान ठरला आणि उंदराने हरिणाचे पाय कुरतडले .
आणि वाघाने त्याला मारलं....
आता त्या हरणाला खायला सारेच आतुर झाले ,पण.....
कोल्हा म्हणाला तुम्ही सारे नदीवरून आंघोळ करून या
मी पहारा देतो ,,,,,,
सर्व प्रथम वाघ आंघोळ करून आला .तस
कोल्हा त्याला म्हणाला अरे वाघ दादा तो उंदीर बघ सगळ्यांना
सांगतो मी पाय कुरतडले म्हणून तू हरणाला मारू शकलास,,,,
वाघ चिडला कुठाय तो उंदीर अस म्हणत उंदराला
शोधायला बाहेर पडला ,,,,,,,,
मग उंदीर आला आता कोल्हा त्याला म्हणाला
अरे वाघ तुझ्यावर चिडलाय तुला पकडायला बाहेर गेलाय आणि
तू ईकडे काय करतोयस?
जा लप उन्दारानेही विचार केला या मांसाच्या आशेवर माझाच जीव
जायचा पळालेल बर,,,,,,सर सलामत तो,,,,,,
थोड्या वेळान मुंगुस तिथे आल  मग मात्र कोल्ह्याने त्याला
सरळ आव्हान दिल आपण दोघाच उरले आहोत
मी उंदराला, वाघाला पळवून लावय
हरिणाचा जीव घायला हि मीच कारणीभूत आहे आता
हे मांस खायचा असेल तर माझ्याशी लढ आणि मग हे मांस ख.
मुंगुसाने विचार केला याने वाघला उंदराला वाटेला लावलं
हरणाला मारवल आणि असाही तो माझ्या पेक्षा ताकदवान आहे
आपण आपल निघून गेलाल बर,,,,,,,,,,,आणि ते निघून जात .
आणि कोल्हा त्या हरणाच्या माणसावर यथेच्छ एकटाच ताव मारत ...
कनक नीतीतील हि गोष्ट आजच्या वर्तमानाठी अगदी फिटत बसते,,
पहा विचार करा,

वाघ म्हणजे -आपली न्यायव्यवस्था त्यात सारे आले पोलीस सैनिक सारे.
या वाघाप्रमाणेच हि न्यायव्यवस्था हि कोल्ह्याच्या सांगण्यावर विश्वासणारी,,,,
उंदीर म्हणजे - नोकरशाह बदमाशंना मदत करणारे
मुंगुस म्हणजे- विरोधी पक्ष ज्याला आपली ताकद माहित असून सुद्धा
तिचा वापर ना करणारे .
आणि
कोल्हा म्हणजे- ईतका सार सांगितल्यावरहि सांगू?
कोल्हा म्हणजे कोन्ग्रेस पुढारी जो स्वतः करता करविता असतो
आणि सार्या चुकांचं खापर वाघावर फोडून मोकळा होतो
ज्याला स्वतः साठी कस लढायचं ते फक्त माहित
त्यासाठी तो हरणाच्या मुंडक्यावर पाय हि द्यायला तयार असतो
अरे,,,,,,, हरीण कोण ते सांगितलच नाही कि !
सॉरी मला वाटल तुम्हाला कळल असेल,,,
असो हरीण म्हणजे तुम्ही आम्ही जनता
या जनते साठी भांडायला यांच्याकडे वेळ नाही
स्वतःचे पगार मात्र वाढवून घेतले
आणि बाकी सारे दिवस विरोधी पक्षांना खेळवत घालवले
पेट्रोल दरवाढ केली आता वेगळी दरवाढ करायची गरज नाही
तात्पर्य-
आता परत दरवाढ होणार
हरीण परत एकदा मारलं जाणार
आणि आपल्या बाजूने बोलायचं सोडून मुंगुस निघून जाणार .
वाघ हि चोराला सामील होणार
आणि उंदीर या सार्या प्रकारचा साक्षीदार
गप्प बसून स्वतःची कातडी वाचवणार
ये हि हमारी शान है ओर भारत मेरा महान है

Comments

  1. chaan lihilay,vaastav aahe pan tyala itkya changlya ritine lihilay ki mastach..kaatdi solun kadliye,hope our system wil change for better things.

    ReplyDelete
  2. #
    Praful Dindorkar पृथ्वीमधें जितुकीं शरीरें| तितुकीं भगवंताचीं घरें |
    नाना सुखें येणें द्वारें| प्राप्त होती ||४||

    त्याचा महिमा कळेल कोणाला| माता वांटून कृपाळु जाला |
    प्रत्यक्ष जगदीश जगाला| रक्षितसे ||५||
    December 19 at 6:50am · LikeUnlike

    ReplyDelete
  3. #
    Praful Dindorkar कांटीनें कांटी झाडावी| झाडावी परी ते कळों नेदावी |
    कळकटेपणाची पदवी| असों द्यावी ||१२||
    December 19 at 6:56am · LikeUnlike

    ReplyDelete
  4. #
    Praful Dindorkar आपल्य थोरपणासाठीं| अच्यावाच्या तोंड पिटी |
    न्याये नाहीं ते सेवटीं| परम अन्याई ||३१||
    December 19 at 7:02am · LikeUnlike

    ReplyDelete
  5. #
    Praful Dindorkar
    तुंड हेंकाड कठोर वचनी| अखंड तोले साभिमानी |
    न्याय नीति अंतःकर्णीं| घेणार नाहीं ||३||

    तऱ्हे सीघ्रकोपी सदा| कदापि न धरी मर्यादा |
    राजकारण संवादा| मिळोंचि नेणें ||४||
    ...
    ऐसें लौंद बेइमानी| कदापि सत्य नाहीं वचनीं |
    पापी अपस्मार जनीं| राक्षेस जाणावें ||५||

    समयासारिखा समयो येना| नेम सहसा चलेना |
    नेम धरितां राजकारणा| अंतर पडे ||६||

    अति सर्वत्र वर्जावें| प्रसंग पाहोन चालावें |
    हटनिग्रहीं न पडावें| विवेकीं पुरुषें ||७||

    बहुतचि करितां हट| तेथें येऊन पडेल तट |
    कोणीयेकाचा सेवट| जाला पाहिजे ||८||

    वरील समर्थांच्या दासबोधातील सर्व ओव्या आपण भारतीय नागरिकांना तसेच सद्य सरकार ला लागु होत....

    आता पुन्हा पेटवा मशाली,
    उष:काल दाटला समीप आलि निशी!See More
    December 19 at 7:09am · LikeUnlike

    ReplyDelete
  6. #
    Nilesh Ghotekar aaeech gho tynacha re !!!!!!!!!!!!!!!!!
    December 20 at 6:04pm · LikeUnlike

    ReplyDelete
  7. #
    Sunil Bhumkar nusta aaicha gho nako saglya bajune vaar zae pahijet
    December 21 at 11:42am · LikeUnlike

    ReplyDelete
  8. #
    Sunil Bhumkar tyana tyanchi aay aathvali pahije
    aani nanatar as vavatla pahije ki aay ghtali aani mumbai pahili
    December 21 at 11:43am · LikeUnlike · 1 person
    December 27, 2010 9:27 AM

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...