||प्रेमाय तस्मै नमः||
एका डॉ.कड़े ८०\८५ वर्षाचे गृहस्थ आपल्या जख्मेचेटाके काढून घ्यायला गेले .
सकाळी ८.३० चा सुमार..
ते डॉ, ना म्हणाले,
थोड़े लवकर होइल का काम?
मला ९ वाजता जायचे आहें एकी कड़े
माझी बायको दुसर्या हॉस्पिटल मध्ये एडमिट आहें.
तिच्या बरोबर नाश्ता करायचा आहें.
डॉ,,खुप आजारी आहेत का त्या?
हो गेली पाच वर्षे ती हॉस्पिटल मधेच आहें,
तिला "अल्झायमर्स"झालाय..
ती ओळख़त ही नाही आता कुणाला
डॉ,,अहो ती ओळख़त ही नाही ना?
तरी तिच्या बरोबर नाश्ता करायला रोज वेळेवर जाता ?
त्यावर ते गृहस्थ म्हणाले....
"डॉ. ती मला ओळख़त नसली तरी,,
मी तिला ओळखतो ना?
गेली कित्येक वर्षे बायको आहें माझी ती ..
आज माझी तिला गरज आहें आणि
मी पाठ दाखवावी का?
अहो जिवापाड प्रेम आहें तिच्यावर ..."
ऐकता ऐकता डॉ.च्या अंगावर रोमांच उभे राहिले .
गला दाटून आला त्यांच्या मनात आल ...
तात्पर्य -
हेच खर प्रेम ...
प्रेम म्हणजे फक्त घेन देन नह्वे..
तर नीरपेक्ष पणे स्वतः कडचा आनंद
लुटवून, उधळवून घेणे....त्या गृहस्था सारख.
सकाळ ..४.८.८ रोजी आभाळमाया या सदरात
सौ .शरयु रानडे यानी ही गोष्ट लिहिली होती.
खरच असच असत का प्रेम ?
||प्रेमाय तस्मै नमः||
Comments
Post a Comment