Skip to main content

Posts

शेख_चिल्ली- ज्याची जशी कर्म तस त्याच नाव

# पूर्वी आमच्या शेजारी एक दिल्लीहुन आलेलं कुटुंब पूर्वी  मुंबईत आलेलं राहत होत त्यात एक आज्जी तिची सून मुलगा दोन नातू एक नात रहात होती त्या आज्जीला आपल्या मुलाबाळांची छान नाव असताना देखील विचित्र नावाने हाक मारायची सवय होती मोठ्या नातीला लडकन, नातवाला लड्डू, दुसऱ्याला टेडया,,, आशा विचित्र नावाने हाक मारत असे न पटून एक दिवस हिम्मत करत त्या आजीला मी सहज विचारलं आजी इतकी छान छान नाव आपल्या नातवांची तुम्हीच ठेवली असतील ना??? तस आज्जीने मला जवळ घेतलं आणि केसांवरून हात फिरवत सांगितलं *बरोबर बोलतोस पण ज्याची जशी कर्म तस त्याच नाव* आता बघ ही सुनीता तू ओळखतोस तुझ्याच वर्गात आहे ना? तू बघतोस ही बसल्या बसल्या कुठेही लुडकते ( झोपते) आणि हा अनिलकुमार काही विचारले तर कधी सरळ बोलतच नाही नेहमी वाकडच ( टेढा) बोलतो, आणि हा अजय बघितलास ना किती खादाड आहे आणि लाडू बघितलं तर पंचपक्वांनाच ताट देखील बाजूला सारेल (लड्डू ) अरे जस नाव आहे तसेच वागावं नाही तर त्या नावाला अर्थ प्राप्त होतो कुुणी पप्पू तर कुुणी फेकू थांब आज खऱ्या #शेख_साहेबांची गोष्ट सांगते ऐक, तर हे शेख साहेब शाळेत कधी नीट जात नसत त...

उन्हे ये जिद के हम बुलाते हमे ये उमीद के वो पुकारे आणि मदर्स डे

संपूर्ण गाण्याचं सार या दोन ओळीत आहे काल दिवसभर मदर्स डे चे मेसेज वाचता वाचता एकीकडे हे गाणं ऐकत झोपणार होतो तोच या या दोन ओळींनी माझी पार झोप उडवून दिली,,, आणि एका मित्राने एक विनोद म्हणून सांगितलेली गोष्ट अचानक आठवली,, एका मुलाचं एका मुलीवर प्रेम असत कस बोलायच, कस बोलायच म्हणत मित्रांच्या मदतीने त्या मुलीला एका पुस्तकात प्रेम पत्र लिहून देतो सगळ्या भावना व्यक्त करतो आणि माझं प्रेम वैगेरे लिहितो वर अस लिहितो की तुला जर मी आवडत असेन तर लाल ड्रेस घालून उद्या कॉलेज वर आलीस तर मी समजेन तुझं माझ्यावर खर प्रेम आहे,, रात्र कशी बशी काढतो सकाळीच कॉलेजवर जाऊन बसतो बरीच वाट पाहिल्यावर ती येते पण पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आणि पुस्तक परत करते,, ती तिच्या रस्त्याने तो त्याच्या रस्त्याने पुढे जातो,, कालांतराने त्या मुलीचं लग्न होत पुढे मुलं बाळ होतात दिवस चाललेले असतात मुलगा मात्र नाराजीच जीण जगत असतो एक दिवस घरातील टाकाऊ भंगार विकायला काढतो आणि सहजच त्याच लक्ष त्या पुस्तकावर पडत सहजच ते उचलतो आणि प्रेमाने आठवण कुरवळावी तस ते पुस्तक हाताळताना त्यात तिने त्याला लिहलेल पत्र सापडत,, आणि स्व...

बाळा खूप लागलं तर नाही नारे 😌😔

आज मातृदिन खूप पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी ऐकलेली गोष्ट,,, एक आटपाट  नगर होत त्यात एक आई आपल्या तरुण मुलासह राहात होती,,, खूप काबाडकष्ट करून नवरा तरुण वयात वारल्यामुळे सारी जबाबदारी त्या माऊलीवर आली होती एकवेळ स्वतः जेवणार नाही पण मुलाला जेवायला ती जरूर घालत असे हळू हळू मुलगा मोठा होत होता म्हातारी आई या आशेवर जगत होती कि मुलगा शिकेल खूप मोठा होईल आणि मुलगा हि त्या प्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करत होता 10वीला त्याला खूप चांगले मार्क मिळाले मग तर आईवरची जबाबदारी आणखी वाढली खूप लटपटी खटपटी करून तिने मोठ्या कॉलेजात त्याला प्रवेश मिळवून दिला आता सुरु झाला मुलाचा पुढचा प्रवास,, आईचा आशीर्वाद घेऊन त्याने सुरवात केली पुढे 11वी 12वी लाही उत्तम गुण मिळवून तो कॉलेजात पहिला आला आता हळूहळू त्याला सारे ओळखू लागले कॉलेजातील सारी मुलं एक हुशार स्कॉलर विध्यार्थी म्हणून पाहू लागले कॉलेजच्या सरांचा तो लाडका बनला त्यातच मुलं मुली काही बाही कारणाने लगट करू लागले आणि त्यातच त्या मुलाचं लक्ष एका सौंदर्यवती कडे गेलं आणि तो वेडापिसा झाला ,,, **पाहता च ती बाला कलीजा खलास झाला ** अशी अ...

आपला माणूस अर्थात,,,,, महाभारत स्पर्शाच

आज कालच्या जीवन शैलीत मौज मजेत, मनसोक्त म्हणजे किमान एक दिवस उनाड जगायचे भाग्य आज काल खूप कमी जणांना,,, अगदी नाही म्हणल तरीही चालेल,,, मी ही त्याच टाईम मशीन मधला ,,, तसा मला सिनेमाचा खूप नाद पण मुंबईत जवळपास मी बघतच नाही पण पुण्याला गेलो की आवर्जून मग तो अगदी c ग्रेड असला तरीही पाहतो,,सुदैवाने खूप चांगले सिनेमा पहायला मिळतात असाच खूप दिवसांनी आज बघू उद्या बघू करत हातात स्मार्ट फोन असल्यामुळे *आपला माणूस* पहिला आणि बऱ्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा ‘स्पर्श’ चित्रपट पाहिला होता. नकळत तो आठवला,,, सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं.नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा ‘स्पर्श’ हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे. हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा ‘आपलं माणूस’ हा सिनेमा पाहिला. अप्रतिम नाना ...

अमर' खन्ना... विनोद खन्ना

'अमर' खन्ना...  देवानंद, अमीरखान देखणे आहेत, धर्मेंद्र दणकट होता पण हा दणकट होताच आणि त्याच्यापेक्षा जास्ती देखणाही होता. ती सिंथॉलची जुनी जाहिरात बघा कधी त्याची, सगळं कसं प्रपोर्शन मधे होतं. मधे त्याचा ऍप्सवर आलेला फोटो बघितला आणि चर्र झालं. एरवी तो आजारी, भिकारी वाटूच शकला नसता कितीही मेकअप केला असता तरी. अतिशय रॉयल वावर असायचा त्याचा. 'आन मिलो सजना'मधे राजेश खन्नाच्या हाती त्याला मार खाताना पाहून मला जाम हसू आलं होतं. त्याच्याएवढं चमत्कृतीपूर्ण आयुष्यं कुणाचं नसेल. बायको गीतांजली आणि दोन मुलं सोडून तो रजनीशकडे पाच वर्ष गेला. मग परत आला. वावरला, टिकला पण हास्यास्पद नव्हता झाला मात्रं. एकट्याच्या जिवावर सिनेमे चालवायची ताकद त्याच्यात होती. 'दयावान' परत आल्यानंतरचा सिनेमा त्याचा. मधे 'इटालियन जॉब'वरून काढलेला 'प्लेअर्स' बघत होतो. मुलगी म्हणाली 'अमर' खन्ना काय भारी दिसतो ना अजून. वृद्धापकाळ आणि आजारपण माणसाला काहीच्या काही करून टाकतं.    कुठलाही विशेष गुण नसलेला तो एक चांगला अभिनेता होता. त्याचे संवाद कानात घुमायचे, तो भन्नाट नाचायचा,...

*अक्षय तृतीया*

एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणी जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे ,परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे.तुझी इच्छाअसेल ते माग. माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणी जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणी निघून गेली. काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती ,तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणी दूसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणी कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या . जेव्हा माणूस आला आणी जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ?तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू. त्याचप्रमाने पर...

राजा झालेल माकड

||श्री नथुरामाय नमः || भरतपुरच्या जंगलात एकदा चिंतनबैठक झाली आणि हे पारंपरिक गादी चालवणारे राजे हवेत कशाला? गेल्या70 वर्षात जंगलाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे आता इतर जंगलात जशी लोकशाही नांदते तसेच आपण ही इथे निवडणुका घेऊ आणि निवडणूक लढवू असा विचार सगळ्यांनी केला आणि शेवटी बहुमताच्या जोरावर तिथे एक जमातीतील एक वयस्कर माकड राजा झालं,, त्या जंगलात जरी हत्ती घोडे उंट वाघ सिंह गेंडा राहत असले तरी त्या जंगलात माकडांची संख्या जास्त होती त्या जोरावर तो राजा झाला होता आता कुठल्याही समस्या असल्या की जनता त्या नव्या राजांकडे आश्वासक नजरेने जात असे जात असे परंतु त्याच्या कडे समस्या घेऊन गेले की माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असे हळू हळू हा प्रकार जनतेच्या लक्षात येऊ लागला की हा समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि इकडे तिकडे उड्या मारत या जंगलातून त्या जंगलात फक्त फिरत असतो समस्या सोडवत तर नाहीच वर समस्या निर्माण करतो जनता तक्रार करू लागली तसे तो आणि त्याचे साथीदार बोलू लागले बघा,,, *आमच्या प्रयत्नात कुठे कमतरता आहे काय? आम्हला जे येत ते मी करतोच करतो माझ्या प्रयत्नात कुठे कसूर...

स्त्रीत्वाच बलिदान देऊन स्त्री मुक्‍ती नको !

सगळया स्त्री मुक्‍तीवाल्या बायकांना सांगा, ``आम्ही सगळया कार्यक्षेत्रात जायला तयार आहोत. पण आमच स्त्रीत्व जपून जाणार आहोत !'' आपल्या स्त्रीत्वाच कुठेही आम्ही बलिदान देणार नाही आणि आम्हाला ते चालणार नाही. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाच रान मोकळं करून दिलं. सावित्रीबाई फुले एवढ्या शिकल्या, पहिल्या शिक्षिका झाल्या; पण डोक्यावरचा पदर कधी बाईचा खाली आला नाही. कपाळावर नवर्‍याच्या नावाची लावलेली चीर नवरा असेपर्यंत कधीही पुसली गेली नाही. दोन वाट्या ज्या जाड्या पोटलीत गुंफलेल्या होत्या, त्या कधी काढून टाकल्या नाहीत. पायातल्या जोडव्यांनी तीला संपूर्ण समाज जोडायला शिकवला. ज्योतीबांनी सांगितले म्हणून त्या शिकल्या, पोरींची शाळा काढली, मुलाला सांभाळलं आणि त्यांच्या खांद्याला खांादा लावून सत्यशोधक समाजाचं कामही केलं. सावित्री नवर्‍याशी एकरूप झाली होती. सावित्रींना आदर्श मानणार्‍या स्त्री मुक्‍तीवाल्यांना हे लक्षात येईल का ? अपर्णा ताई

सैराट झालं जी,,,,,

काल बहुचर्चित **सैराट ** पाहिला आणि एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर,,, ** सुरवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका** आणि एका शब्दात म्हणाल तर,, ** सैराट** बस्स बाकी काही नाही सिनेमा लागायच्या आधीपासून त्याची पद्धतशीर बदनामी मोहीम चालवली गेली ,, आधी वाटलं होत कि सिनेमावालेच स्वतः निगेटिव्ह जाहिरात करत तर नाही ना?? हा त्यांचा प्रसिद्दीचा फंडा तर नाही ना?? त्यातूनही काही जणांना नागराज मंजुळे ची जात दिसली आणि मग सुरु झालं संस्कृती बचवाच काम कसा लहान मुलांना घेऊन हा चित्रपट बनवला आहे कस त्यांना प्रेम (चाळे) करायला लावलं आहे मग अर्थातच सिनेमाच्या मदतीला ब्रिगेडी धावून आले ते ओरडू लागले मनुवादी कसे या सिनेमाला विरोध करत आहेत जातीव्यवस्थेला चपराक वैगेरे,, **तर सांगायचं इतकंच कुणी या चित्रपटाच्या निमित्ताने विरोध करणारे त्यांनी आधी सर्वांनी आधी तो चित्रपट प्रामाणिकपणे पहावा आणि मग आपली मत टाकावीत न पाहताच फक्त ऐकीव माहितीवर विरोध करणारे मग ते ब्रिगेडी असो वा बामन दोघेही एकाच माळेचे,,,*** माझ्या मुलाने एक व्हाटसप स्टेट्स टाकलं होत ते वाचून खूप हसलो होतो त्याने...

जादूगार आणि उंदीर शेवटी उंदीर तो उंदिरच

||श्री नथुरामाय नमः || एकदा एक जादूगार बरेच दिवस रस्ता चुकून रानोमाळ रस्ता शोधत फिरत असताना अचानक त्याला चांगली वाट दिसते( अच्छे दिन) आणि त्या मजेत मग तो जंगल सफरीवर निघतो जंगलाचा आनन्द घेत शिळ वाजवत निघतो तोच समोर एक उंदीर दिसतो चला सोबतीला घेऊ आणि मजेत प्रवास करू असा विचार करत तो जादूगार त्या उंदराला विचारतो येतो का सोबत? फिरू मज्जा करू? उंदीर- नको रे बाबा मला भीती वाटते जादूगार-कशाची? मी आहे ना सोबत उंदीर- मांजराची जादूगार- हात्तीच्या थांब मी जादूने तुला मांजर बनवतो मांजर-तरीही तिथेच जादूगार-आता काय? मांजर- अहो तुम्हला काय माहीत जंगली कुत्रा मला फाडून खाईल जादूगार-बर ठीक मी कुत्रा बनवतो कुत्रा- तरीही तिथेच जादूगार- अरे बाबा आता काय झालं? कुत्रा- अहो अस काय करता बाहेर जंगलचा राजा #शिंव्ह आहे तो खाईल ना? (जादूगार मनात-साल्या तुला राजा बनायचं अस सरळ बोल ना? ) जादूगार- ठीक मी तुला #शिंव्ह बनवतो #शिंव्ह- तरीही तिथेच जादूगार-अरे आता काय झालं? #शिंव्ह- अहो तो शिकारी आहे ना गोळी घालेल ना? जादूगार- ???? तू उंदिरच बरा अस म्हणत तो त्याला पुनः उंदीर बनवतो आणि मूर्खाला राजा...

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे* पूर्वी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती सागर नद्या, आकाश त्याचप्रमाणे माणसाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसत असे त्यामुळे तेव्हा tv मोबाईल इंटरनेट च जाळ नसल्यामुळे मुलांना खेळ लगोरी कबड्डी पतंग सूर पारंब्या असे मैदानी खेळ खेळले जात आकाश निरभ्र असल्या मुळे रात्री हमखास आम्ही शहरात असल्यामुळे गच्चीवर झोपत असू मग आपसूकच टक्क उघड्या डोळ्यांनी जितकं आभाळ डोळ्यात सामावून घेता येईल तितकं सामावून घेत झोपी जात असू पण या दरम्यान बरेचदा संध्याकाळी घरी हंस पक्षांचा थवा उडत जाताना दिसे,,, मी बरेचदा टक लावून पहात बसत असे ते इंग्रजी *V* आकारात उडत असत मला नेहमी असा प्रश्न पडे की हे असेच का उडतात? मागच्याला पुढे जावस वाटत नाही का? की पुढचा मागच्याना उडुच देत नाही? बर ते मान्य केलं तरी मग मधले काय करतात? ते का जोर लावून पुढच्याला ढकलत किंवा बाजूला होत स्वतः उडत??? आता *त्यावेळी आमचा गुगल म्हणजे आमची आजी* तिच्याशिवाय कोण उत्तर देणार??? मग आजी उत्तर देत असे अरे बाळा तू शाळेत जातोस की नाही ते तुझ्या पुस्तकात विमान पाहिलस की नाही? ते असच इंग्रजी *V* आकारासारखं असत मानवाला निसर्...

*'मास्तर'*

डॉ.  रोहिणी वळसे पाटील यांची 'मास्तर' नावाची कविता अतिशय सुंदर आहे जी सद्यस्थितीवर प्रकाश टाकते. म्हणून शेअर करावीशी वाटली. .                           *'मास्तर'* मास्तर दमला असाल             तुम्ही शतकामागून शतकं चालतचं राहिलात तुम्ही ... तुमच्या पायातील वेदना भेगाळून तिचं आता खिंडार झालयं तुम्ही पार केल्यात असंख्य अडाणी वाटा अन् अज्ञानात पेरीत आलात ज्ञानाच्या असंख्य लाटा... तुम्ही मार्क्स शिकविला तुम्ही ज्ञानोबा शिकविला तुकाराम, ज्योतीबा आणि सान्यांचा शामही मास्तर तुम्ही शिकविलात ज्योतिबाची ज्योत सावित्रीच्या हातात देऊन असंख्य अबलांना सबलतेचा मार्ग शिकविला पण मास्तर ..... काळाच्या ओघात तुम्ही दिसेनासे झालात तुमच्या काळ्या कोटासहीत...... मास्तर दुनिया बघा कुठे चाललीये मार्क्सवाद उलटा टांगून रंगीरंगीबेरंगी माॅल सजलेत अंधाराला सजवत..... मनावरची धूळ काढणारी शामची आई आता रस्त्यावरचया धुळीलाही घाबरत नाही. ... मास्तर आईची भाकरी चूलीतच राहिली हो... बर...

रांगडी कविता

*रांगडी  कविता* गिरिदुर्गांच्या  तटबंद्यांना जरा  एकदा  बिलगून  बघ, बुलंद  बुरुजांच्या  चिलखती  चिऱ्यांना फक्त  एकदा  स्पर्शून  बघ... आणि  सांग  मला, *शहरी  इमल्यांची  आठवण  येते  का..?* किल्ल्यांवरच्या  पठारांवर एकदा  रात्री  पहुडून  बघ, पौर्णिमेचं  पिठूर  चांदणं स्वतःच्या  अंगावर  पांघरून  बघ... आणि  सांग  मला, *पंचतारांकीत  हॉटेलची  आठवण  येते  का..?* बाजी-तान्याचे  पोवाडे रायगडावरून  गाऊन  बघ, देवराईतली  राऊळघंटा एकदा  सांजवेळी  वाजवून  बघ... आणि  सांग  मला, *डी.जे.च्या  धिंगाण्याची  आठवण  येते  का..?* खळाळणाऱ्या  झऱ्यात फक्त  जरा  बसून  बघ, कोसळता  धबधबा तुझ्या  पाठीवर  जरा  झेलून  बघ... आणि  सांग  मला, *रिसॉर्टमधल्या  कृत्रिम  धबधब्याची  आठवण  येते  का....

महापौर

दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती — ‘गणपत महादेव नलावडे, मेयर’! गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच! गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं. जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला. “जी”? “ही एवढीच पत्रं आलीयेत का रे”? “व्हय जी”! “नीट आठवून सांग. एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या”? “न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं”. यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले, “कोन्ता खास सांगावा यायचा हुता का”? “नाही नाही. क...

साधू दगड आणि प्रामाणिकपणा

|| श्री नथुरामाय नमः|| सध्या सर्जिकल स्ट्राईकचा स्ट्रोक असा काही देशवासियांना लागला  आहे की जो तो पाक आणि चीनच्या दिशेने दगड भिरकावू लागला आहे अस नाही की या आधी कधी असे स्ट्राईक झालेच नाहीत  पण मार्केटिंग गुरु त्यावेळी राज्यावर नव्हते इतकंच,, असो त्यासर्व कोच बटाटे गुगलेश्वर गुगलाधींना चरणी,, सहज खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट आठवली,, आट पाट नगरातून एक साधू दुसर्या राज्यात जाण्यासाठी निघालेला असतो दुपारचं रणरणत ऊन नुकतंच सुरु झालेल असत अशातच एक निवांत सावली पाहावी आणि दोन घास खात थोडा आराम करावा असा विचार मनात येतो तोच एक छान झोपडी वजा घर आजूबाजूला छान सारवलेलं दिसल आता इथेच टेकू असा विचार करीत तो साधू त्या जागेत शिरला तसा त्या घरातील मोठी मंडळी आली त्याच स्वागत केलं हातपाय धुवायला पाणी दिल  साधू संत येति घरा,, असा त्यांना छान आंनद झाला मग साधुनेही सर्व आन्हिके उरकून घेतली जेवण वैगेरे झालं,, आता थोडा आराम करू म्हणत तो चक्क झोपला पण थोड्या वेळाने एका मोठ्या कोलाहालाने त्याला जाग आली,, पाहतो तो काय एका बाईला झाडाला बांधलाय आणि सारे गावकरी कुणी शिव्या कुणी शाप कु...

तुमचा देव आणि आमचा खुदा ,,

एक दिवस नेहमी प्रमाणे अकबरला बिरबलची खोडी काढावीशी वाटली  आणि त्याने तो म्हणाला,,, तुमचा देव आणि आमचा खुदा यात खूप फरक आहे ,,  आमचा देव बघ कसा राजेशाही आहे तो स्वतः येत नाही असा नोकरा सारखा शेपूट हलवत  तो त्याचा दूत पैगंबर साहेब पाठवतो,, तुझ्या देवाला काहीच काम धंदा आहे कि नाही? बिरबल - तस नाही सरकार आमचा देवच खरा मी ते सिध्द करून दाखवतो ,  थोडे दिवसांची मोहलत द्या ? यात चार पाच दिवस निघून गेले , आणि बिरबलाने यमुना नदीत नौका वीहारच आयोजन केल अकबर आणि तो नौका विहारासाठी गेले  आजू बाजूला संरक्षणार्थ आधीच काही नौका नदीत तैनात केल्या होत्या , कालीयाला पोटात घेणारी ती नदी, बिरबलने एक युक्ती केली ज्या नावेत अकबर बसणार होता त्याच नावेत  एका दासीला तिच्या नवजात बालका सह बसवलं होत  अर्थातच ती दासी आणि आणि तीच ते मुल खोट  होत , तिच्या हातात ते लहान मुल म्हणजे मेणाचा लहान पुतळा होता  दिसायला मात्र तो अक्ब्राचाच मुलगा आहे कि काय अस दिसत होत ,, दासीला सार काही आधीच शिकवून ठेवल होत , आणि अशा तर्हेने सारे नौका विहाराल...

बार बार देखो -जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकलो कि ,,,

बार बार देखो - जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकलो  कि ,,, किमान एकदा तरी नक्कीच पाहावा असा चित्रपट,,, एकदा अशा साठी कि चित्रपट पाहताना गोंधळ उडतो कि नक्की काय चालले आहे तेच पटकन लक्षात नाही परंतु जेव्हा आशय लक्षात येतो तेव्हा स्वतःच अपराधी पण झाकताना नाकी नऊ येईल हे नक्की,, चित्रपट थोडा चमत्काराकडे झुकणारा आहे आणि त्या चमत्काराचा फायदा डायरेक्तटर ने उत्तम घेतला आहे,, कारण तो चित्रपट आहे त्यातच अस घडू शकत,,, साधी सोपी कथा थोडी जास्तच गुंतागुंत करून सागितली आहे ,,, सिद्धार्थ आणि कतरिना दोघ हि लहान पानापासून चे मित्र कतरिना भावूक प्रेमवेडी तर सिदार्थ थोडा भिडस्त लाजरा बुजरा पण अभ्यासात हुशार ,, कालांतराने  मोठे होतात त्याच बरोबर त्यांची स्वप्न देखील मोठी होत जातात आणि अशाच एका अवघड क्षणी कत्रिना सिदार्थ ला लग्ना बद्दल विचारते आणि त्याचा होकार गृहीत धरते ,, आणि दोन्ही घरात लग्नाची एकच धूम उडते ,, कतरिना तर स्वप्नातच जाते सगळी कडे एका आनदाने नाचत बागडत असते आणि सिदार्थ ला केम्ब्रिज विद्यापीठातून फोन येतो त्याच्या कामा बाबत तिकडे बोलवल जात आता हिरोच आणख...

सांगा मी काय कमावले.... काय गमावले .

"चला हवा येऊ द्या"  या कार्यक्रमात सिने कलाकार श्री जॅकी श्राॅफ यांनी स्वतः बद्दलचा "मन" हेलावुन टाकणारा अनुभव सांगितला, कार्यक्रम पाहणा-यांनी ऐकला असेलचं परंतु ज्यांनी नाही ऐकला त्यांच्या करिता ......, "जॅकी श्राॅफ" यांच्या शब्दात ....  मी, चित्रपटात येण्यापुर्वी वाळकेश्वर येथे चाळीत रहात असे,   तेव्हा मी, माझा भाऊ व आई वडील एका खोलीत रहात असुं , रात्री झोपेत कधी मला खोकला आला तरं आई उठुन बसतं असे,  आई खोकली तर मी उठुन बसे . चित्रपटात काम मिळाल्यावर पैसा आला, श्रीमंती आली, खोलीचा फ्लॅट झाला,  खोल्या वाढल्या, भिंती मधोमध आल्या, एकाच फ्लॅट मध्ये त्या पलिकडच्या भिंती आड झोपलेली "आई"  ह्रदयविकाराने गेली...............आणि, या भिंती कडील मला कळले देखिल नाही .... सांगा मी काय कमावले..... ....... काय गमावले . 🙏The Great Jacky Shrof🙏

कथा बाऊबीची- कथा मनाच्या ताकदीची,,

कथा बाऊबीची- कथा मनाच्या ताकदीची,, रविवारच्या लोकसत्तात आलेली गोष्ट,, नाव झटकन लक्षात नाही येत ना? पण बचेंगे तो और भी लडेंगे,, म्हणणारा कोण हे सांगावं लागत नाही पावनखिंड खिंड कि बाजी प्रभू, सिंहगड म्हंटला कि तानाजी मेरी झान्सी नहीं कि झान्सी कि राणी, हि प्रेरणा दाई नाव आहेत ज्यांनी अशक्य या शब्दावर मात केली,, हि तशीच एका सामान्य माणसाची हि गोष्ट,, नव्वदीच्या दशकातील,, एका न्यूरॉलॉजिस्ट ने सांगितलेली,, जॉ डॉमिनिक बाऊची ची आणि त्याने लिहलेल्या  द डायव्हीग बेल इन द बटरफ्लाय ह्या पुस्तकाची,,, हे सारं इतकं खरं आणि प्रेरणादायी आहे मनाची ताकद दाखवणार आहे की ह्या कडे पाहिलं तर अस वाटत रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक लिहिले ते मनाची ताकद काय असते निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकता,, ते दाखवण्या साठीच हे पुनः एकदा मनावर ठसत,,, सामान्य ते असामान्य असा हा प्रवास पाहताना आपण थक्क होतो. येत्या 7 सप्टेंबरला रिओ येथेच पॅरलिंपिक्स मध्ये अशाच सामान्य ते असामान्य लोकांचे खेळ पाहायला मिळणार आहेत असो,,, तर जॉ डॉमिनिक बाऊबी हा फ्रेंच माणूस पॅरिस राहणारा व्यवसायाने पत्रक...

फरक तुझ्या माझ्यातला ,,,,

एक सुंदर गोष्ट वाचायला मिळाली आपण कसे आहोत हे कळण्यासाठी सतत स्वतः कडे लक्ष असणे खूप गरजेचे असते मग इतरांनी ते कितीही सांगितलं कि तुम्ही कसे आहात तरीही त्याकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमची चाल ठरवता येते आणि मग "अरे गेलो असतो तर बरे झाले असते "असे वाटणे. आणि चालल्यावर "अरे थांबलो असतो तर ?" "उगाचच बोललो " असे वाटणे बंद होते कारण तुम्ही तुमच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असता दुसरा त्याचा काहीही अर्थ काढो,,,कारण "जे आहे ते आहे जे नाही ते नाही " अस वैराग्य एकदा प्राप्त झाल कि दुसऱ्याच्या श्रीमंतीचा डामडौल पाहून चळत नाही वळत नाही एका गुरुची आणि राजाची ही अशीच गोष्ट ,,, त्या राजाला वारंवार वाटे कि आपल्या गुरूने देखील आपल्या सारखच आपल्या राजवाडयात राहव ,,,काय आहे त्या जंगलात ? दरवेळेस राजा आमंत्रण देई ,राजाने दरवेळेस आमंत्रण द्यावे "चला साहेब राजवाड्यात" आणि गुरूने बोलावे,"नकोरे बाबा मी ईथेच बरा आहे " गुरु बोले "ईथे काय आणि तिथे काय "सारखच तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान ,,,, परंतु राजाला वाटे कि गुरु खोट बोलतोय कदाचित...