Skip to main content

Posts

Showing posts from August 12, 2018

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक- प्रदीप ताम्हाणे

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक- प्रदीप ताम्हाणे “आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या *निव्वळ एका भावनेने* त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. *या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला*. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला. शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची. २६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी मा

समझ_गये_बाबू_ये_पब्लिक_है_ये_सब_जाणती_है

हा साहब, बस आपके जैसे हम देश नही बेचते,,, हा साहब, ना ही बॅंक लुटेरोंका साथ नही देते उन्हे देश छोडकर भागणे मे मदत नही करते,, हा साहब, स्विस बॅंक से देश का पैसा वापस लाने का झुटा वादा नही करते,, हा साहब, देश के हर इंसांन को अपना खून पसीने का पैसा बॅंक मे जमा करवाने को मजबूर नही करते,, हा साहब, ना ही असे मै चोर नही हु का सर्टीफेकेट देते है,,, हा साहब, ना ही गटर गेस की खोज करते #हा_साहब, #_बस्स_कभी_झंडे_कभी_रुमाल_कभी_रुमाल_बेचते_जरूर_है #क्यो_की_हम_जनता_को_उल्लू #और_खुद_को_झंडू_नही_समझते #समझ_गये_बाबू_ये_पब्लिक_है_ये_सब_जाणती_है

"आरं छातीवर जागा नव्हती म्हणुन दोन मेडल घरीच ठेवुन आलोय."

"आमच्या काळात 303 रायफल असायच्या... बोल्ट वडायचा ट्रिगर दाबायचा परत बोल्ट वडायचा ट्रिगर दाबायचा... पार हातं बोटं सुजुन जायची, कच्ची कणसं खाऊन आमी देशासाठी लडलो एके काळी,चीन नं सप्लाय लाईन तोडली होती आमची... तीन लढाया लढलोय मी,पाकिस्तानासोबत दोन आणि चीन सोबत एक. ही छातीवरती आहे तीच संपत्ती आमची.." अंगावर काटे आणनारे शब्द होते त्यांचे. बन्सी नारायण गाडे. वय 85 माजी सैनिक. लान्स नायक (ब्रिगेड आॅफ गार्ड,हेडक्वार्टर नागपुर) आज जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद इथं ध्वजवंदन कार्यक्रमानिमित्त गेलो आणि हे माजी सैनिक दुरुन दिसले. हे छाती भरगच्च मेडल्स नी भरलेली.. थोडं बोलावं म्हणुन दबकतंच बोललो जरा..(म्हटलं आर्मीचा माणुस,उगाच चिडला बिडला तर काय घ्या..) मी विचारलं तर म्हणतात कसे "आरं छातीवर जागा नव्हती म्हणुन दोन मेडल घरीच ठेवुन आलोय." त्यांच्या छातीवर दोन नागा हिल्स मेडल दोन संग्राम मेडल दोन समर सेवा मेडल एक रक्षा मेडल 1965 एक पच्चीसवी स्वतंत्रता जयंती मेडल एक आहत (casualty in 1965) मेडल आणि एक मिझो हिल्स मेडल असे एकुण दहा मेडल होते आणि लावायला जा

मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई...

DR.RAJENDRA BHARUD (IAS) FIRST ADIVASI IAS OFFICER मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई... हां लेख सामोडे गावातील आदिवासी समाजाचा पहिला जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भारुडे (सध्या नेमणूक नांदेड)जरूर वाचा !     पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय... मी सकाळपासून रडत होतो. पाटी, पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली. माझं रडणं सतत चालूच होतं. मध्येच मायच्या हाताला जोराचा झटका देत, मी मोठमायच्या घराकडे धावत सुटलो... मोठमायच्या घरात जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात सापडणं होतं, हे त्या वेळी माझ्या बालमनाला समजत नव्हतं. मोठमाय म्हणजे महाकाली. तिने सरळ मला उचललं आणि मायला सोबत घेऊन थेट मला हेडमास्तरांकडे घेऊन गेली. मी निषेध म्हणून जमिनीवर पडून गडबडा लोळत होतो. पण या दोघीही माझ्याकडे जराही ढुंकून न पाहता घरी निघून गेल्या... धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा... याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही नसला तरी दोन खमक्या बायका होत्या... माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी बहीण आणि एक म्हैस असा