Skip to main content

बाळा खूप लागलं तर नाही नारे 😌😔

आज मातृदिन
खूप पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी
ऐकलेली गोष्ट,,,
एक आटपाट  नगर होत त्यात एक आई आपल्या तरुण मुलासह राहात होती,,,
खूप काबाडकष्ट करून नवरा तरुण वयात वारल्यामुळे सारी जबाबदारी
त्या माऊलीवर आली होती
एकवेळ स्वतः जेवणार नाही पण
मुलाला जेवायला ती जरूर घालत असे हळू हळू मुलगा मोठा होत होता
म्हातारी आई या आशेवर जगत होती
कि मुलगा शिकेल खूप मोठा होईल
आणि मुलगा हि त्या प्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करत होता
10वीला त्याला खूप चांगले मार्क मिळाले मग तर आईवरची जबाबदारी आणखी वाढली
खूप लटपटी खटपटी करून तिने
मोठ्या कॉलेजात त्याला प्रवेश मिळवून दिला आता सुरु झाला मुलाचा पुढचा प्रवास,,
आईचा आशीर्वाद घेऊन त्याने
सुरवात केली पुढे 11वी 12वी लाही उत्तम गुण मिळवून तो कॉलेजात पहिला आला
आता हळूहळू त्याला सारे ओळखू लागले कॉलेजातील सारी मुलं एक हुशार स्कॉलर विध्यार्थी म्हणून पाहू लागले कॉलेजच्या सरांचा तो लाडका बनला त्यातच मुलं मुली काही बाही
कारणाने लगट करू लागले

आणि त्यातच त्या मुलाचं लक्ष
एका सौंदर्यवती कडे गेलं
आणि तो वेडापिसा झाला ,,,
**पाहता च ती बाला कलीजा खलास झाला **
अशी अवस्था झाली त्याची,,
पण तीही सौंदर्यवती होती ऐर्यागैर्या ला भीक घालणारी नव्हती,,
त्याने खूप प्रयत्न केले तिला मिळवायचे पण नाही ,,,
त्याला तिला मिळवता आलं नाही,,
एक दिवस मात्र तो घायकुतीला येऊन तिला विचारतो हे
स्वप्नसुंदरी मी काय केलं म्हणजे तू
तुझं हृदय मला देशील,,
तू माझी होशील,,
मी पार वेडापिसा झालोय
तू बोल मी आकाशातले सूर्यचंद्र तुझ्या पायाशी आणून टाकू का,??
बोल राणी बोल मी काय करू??😌

खूप आढेवेढे घेतल्या नन्तर ती म्हणते चल ठीक आहे
मी देते तुला माझं हृदय पण???
त्या बदल्यात तू काय देणार??

तिचे हे बोल ऐकून तो हरकून गेला पार वेडा व्हायचा बाकी होता
सौदंर्यवती साक्षात हातात वरमाला घेऊन उभी होती,,,
तो म्हणला तू फक्त बोल राणी
काय हवं बस तू बोल त्यासाठी मी जीवाचं रान करेन,,
आणि ती सौंदर्यवती म्हणाली
ते ऐकून आभाळ फाटून पृथ्वी पोटात घेईल तर बर अस त्या मुलाला वाटलं,,,,???
ती सौंदर्यवती म्हणाली,,,,

तुझं जर खरच माझ्यावर प्रेम असेल तर हृदयाच्या बदली हृदय मला हवं
ते हि तुझ्या आईच,,
आणि
त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले
हे हे कस शक्य आहे???
तो चाचरत म्हणाला,,
तसा नाकाचा शेंडा उडवत ती म्हणाली हे शक्य नाही??😳
मग मलाही शक्य नाही गेलास उडत,,,
तसा तिथून तो मान खाली घालून
चालू लागला ,,पण इतकं होऊनही
तो काही भानावर आला नव्हता,,
त्याच्या समोर फक्त प्रश्न होता
कि हे सार आईला कस सांगायचं???

त्या दिवसापासून तो तुटक तुटक वागू
लागला अभ्यासात जेवणावरच लक्ष उडू लागलं,,
हळू हळू त्याने बोलणंही सोडून दिल
गप्प गप्प बसून राहू लागला
हे सार ती माउली पहात होती
मुलाचे हाल बघवत नव्हते
शेवटी तो काहीच बोलत नाही सांगत नाही तेव्हा स्वतःच विचारू म्हणत
तिने विचारलं कारे बाळा काय झालं??
तू असा गप्प गप्प का??
तू हल्ली नीट जेवत देखील नाहीस
अभ्यासावरच लक्ष उडलेल दिसतय
काय झालं काय ते मला सांग,,
पण असे स्वतःचे हाल करून घेऊ नकोस😔😔😔
खूप काळजी वाटते रे बोल काही तरी बोल सांग माझ्या राज्या माझ्या सोन्या अरे तूच माझा आधार आहेस
मी काय करू ??
माझं काय चुकलं का??
😔😔😔😔
पण सोन्या काही बोलेना कस बोलणार???
आणि काय बोलणार???
काय सांगू कि माझ्या प्रेयसीला तुझं
काळीज हवं???
छे छे ते अशक्य,,,,,,
पण मनात आशा मात्र होती कुठे तरी
कि मिळावं आईच काळीज कि ती
सौंदर्यवती झालीच माझी😊😊,,

शेवटी पुन्हा आईने खोदून खोदून विचारलं सांग रे काय झालय नक्की
कस बस मग त्याने तोंड उघडलं
आणि झाला प्रसंग आईला सांगितला,,,
मुलाची इच्छा त्या माऊलीच्या लक्षात आली त्याची होणारी घुसमट लक्षात आली
आणि क्षणाचाही विचार न करता
आपल्या लाडक्या लोकांसाठी त्या माउलीने
बाजूला पडलेला सुरा आपल्या उरात खुपसला आणि आपलं काळीज
काढून हसत हसत आपल्या मुलाच्या हाती ठेवलं आणि जा त्या मुलीला दे
आणि ये तिला घेऊन आणि सुखाने
संसार कर असा आशीर्वाद देऊन ती माउली देवाघरी गेली,,,,
पण खरी गोष्ट तर पुढेच आहे,,,,

हातात आलेलं ते आईच काळीज
घेऊन तो मुलगा धावतच त्याच्या प्रेयसीकडे धावला,,,
आणि तिच्या समोर गुडघायनवर बसत तिला तो म्हणाला हे प्राणेशवरी
हे स्वप्नसुंदरी बघ बघ मी माझ्या
आईच काळीज घेऊन आलो आहे
आता तरी तू माझी होशील ना????

ते काळीज घेऊन आलेला पाहिल्या बरोबर त्या मुलीने जी सणसणीत
कानाखाली मारली ते पाहिल्यावर
ते पाहिल्यावर तो भानावर आला
आणि काय करून बसलो हे अस म्हणत कपाळावर हात मारला,,
ती म्हणाली अरे मूर्खां चल दूर हो
अरे जो माझ्या साठी स्वतःच्या आईच
काळीज घेऊन येतो तो उद्या माझ्यापेक्षा कुणी दुसरी रूपवान
मिळाली तर काय तू माझंही काळीज
घेऊन जायला मागे हटणार नाहीस कशावरून तुझ्या सारखा मूर्ख
जगात पाहिला नाही चल हट,,,,,,,,

आता मात्र आभाळ कोसळल त्याच्यवर एकीकडे आई गमावली
दुसरीकडे प्रेयसीने झिडकारले,,,
आता स्वतःचा जीव दिल्या खेरीज काही एक उपाय दिसत नाही जगून तरी काय करू??
आणि जगू कुणासाठी???

भरल्या डोळ्यांनी तो डोंगराच्या दिशेने सैरावैरा धावू लागला कड्यावरून आता जीवच देतो
अस म्हणत तो धावू लागला आणि
धावता धावता एके ठिकाणी तो पाय
अडखळून पडला ,,,,,
त्याही अवस्थेत त्या हातात असलेल्या आईच्या काळजाने विचारलं
** बाळा खूप लागलं तर नाही ना रे**
😌😌😌
जगातील सर्व चांगल्या प्रेमळ आयांना समर्पित
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल