Skip to main content

Posts

Showing posts from March 20, 2011

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,

मी गेली काही वर्ष कच्छाला जातो,,,        येथील मां आशा पुराच्या निमित्ताने साधारण दोन वर्षांपूर्वींची गोष्ट आहे सहज एका माणसाबरोबर ओळख झाली आणि गाडीत गप्पा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात त्याला एक sms आला त्यात अस लिहील होत "हा sms १० जणांना पाठवा तुमच भल होईल वैगेरे वैगेरे आणि ज्यानी ह्या sms कडे दुर्लक्ष केल त्याचं कस वाटोळ झाल"  हा sms त्याने मला आवर्जून वाचून दाखवला कारण हा sms त्याला एका राजकीय पुढार्याच्या मोठ्या मुलाने पाठवला होता , मग आमच मग हे कस चुकीच आहे वैगेरे गप्पा सुरु झाल्या ,,,,,,, झाल त्यानानातर हा विषय मी पूर्णतः विसरून गेलो पण आज शनिवार सक्काळी सक्काळी मला पुन्हा असाच sms आला  आणि त्यात सार वरील प्रमाणेच लिहील होत , माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याल दम वैगेरे दिला रागावलो  हि ,,,,, आणि अचानक मला माझ्या लहान पणाचे दिवस आठवले मी लहान असताना संतोषी मत नावाचा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता . ज्याच्या त्याच्या घरी दरी शुक्रवार पाळण्यात येत होता मग त्या दिवसाची नवलाई आंबट चिंबट खावू नये वैगेरे वैगेरे,,,,, लहान होतो त्यातलं गांभीर्य कळत नव्

देवाची लीला लाकूडतोडया,मुलगा, आणि त्याची बायको

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला माहितच आहे विहिरी काठी लाकड फोडताना पाणी प्यायला गेला असता त्याची कुर्र्हाड विहिरीत पडते गरीब बिच्रा लाकूडतोड्या मग देवाचा धावा करतो देव येतो आणि विहिरीत बुडी मारतो आधी सोन्याची,चांदीची अशा ५\६ कुर्र्हडी काढतो लाकूड तोड्या गरीब असला तरी प्रामाणिक असतो तो त्या कुर्र्हडी नाकारतो आणि सांगतो देवा माझी कुर्र्हाड साधी आहे त्यामुळे ह्या कुर्र्हडी माझ्या नाहीत . देव त्याच्या या प्रामाणिक पणावर खुश होवून त्या सर्व कुर्र्हडी बक्षीस देतो गरीब लाकूड तोड्या श्रीमंत होतो,,,,,,,,, त्याच लाकूड तोड्याचा मुलगा आपल्या बायकोला घेवून एकदा गावी येतो . आणि मग परत ते जुने दिवस आठवले जातात त्या मुलाच्या बायकोला हे सर्व ऐकल्यावर ती विहीर पहायची ईच्छा होते ज्या मुळे आपल्या सासरची भरभराट झाली,,, नवर्या कडे ती हट्ट धरते ती विहीर मला दाखवा मुलगा ती विहीर दाखवायला घेवून जातो    ' अय्या किती खोल आहे ' असे म्हणत असतानाच  जाउन ती विहीरीत पडते . आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते ! देव हि लगेच भक्ताच्या हाकेला ओ देतो देव व्हीरीत बुडी मार

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता,,,,,,,,?

तर हि गोष्ट आहे संत एक नाथांची एकदा नदीवर  स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली अस १०८ वेळा घडल नाथांनी  न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात  सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली,,, १-नाथ किती महान होते ते कळत २-नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते ३ -माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत ४ -एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका ५ -रागावून त्रास तुम्हालाच ६ -शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच ७ -दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण नाथांची हि गोष

गोष्ट रंगांची ,,,

दैनिक सकाळ ,दिनांक २१.३.११ स्पृहा जोशी यांनी हि कविता लिहिली आहे खूप खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे ईंद्र धनुष्याच्या कमानीखाली धम्माल करायचे . माणसाला तेव्हा म्हणे रंग म्हणजे काय ते कळतच नव्हते,, त्या दिवशी रंग रंगपंचमी खेळताना ,,,,,, एक माणूस त्यांना कोरडा दिसला , हसू विसार्ल्यासारखा,, रंगानं खूप वाईट वाटल , त्यांनी ठरवलं कि याचा आयुष्य रंगांनी भरून टाकायचं , आयष्य रंबिरंगी झाल कि तो हि हसायला लागेल,,,,,,, त्याला हि भावना कळतील, ईन्द्रधनुश्य  होईल त्याच जगण लाल रंग म्हणाल मी सळसळता उत्साह देईन,,,,,, नारंगी म्हणाला मी देईन उर्जा शिकवेन त्याग ,,, पिवळा म्हणाल मी देईन स्वच्छ विचार न अडखळनारे  ,, हिरवा म्हणाल मी देईन आनंद भरभराट ,,, निळा शांतपणे म्हणाल मी देईन शांती, आणि देईन ओढ असिमाची,,,,,,, पारवा दूर बघत म्हणाला ,,, माझ्या मुले शिकतील हे शहाणपण आणि सुखाने विलीन होतील अनंतात ,,, जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाला, मी देईन यांना पूर्णत्व ,,, सारे रंग आनंदले त्यांनी आपल्याकडच हा ठेवा माणसाला बहाल केला आणि ,