Skip to main content

Posts

Showing posts from September 29, 2019

लालबहादुर शास्त्रीजी, अनंत दंडवत....

......फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी  ....  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी ....... गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी ...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी ...... पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी ..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी ....... गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी  ...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी ...... पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी  ...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्

परशुरामांचा शाप आणि मोडिशा राजकारण

परशुरामांचा शाप आणि मोदीशा राजकारण,,, परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,, भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील, परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साध

लेकिस पत्र

प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या लेकीला/लेकींना लिहावे असे पत्र चार्ली चॅप्लीन यांनी त्यांच्या जेराल्डिन नावाच्या मुलीला लिहिले आहे. हे एका बापाने त्याच्या लाडक्या लेकीला दिलेलं मूल्यशिक्षण तर आहेच आणि प्रेमाने केलेले मार्गदर्शनही आहे. तसेच  माणुसकीचा धडा शिकवणारं, मनाचा तळ ढवळून काढणारं, डोळ्याच्या कडा ओलावणारं साहित्यातील एक तेजस्वी, सळसळतं पान आहे! " लेकीस पत्र " प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे. नाताळची रात्र. माझ्या या घरातील सगळी लुटुपुटूची भांडणं झोपली आहेत. तुझे भाऊ-बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहेत. तुझी आईही झोपी गेलीय. पण मी अजुनही जागा आहे. खोलीत मंद प्रकाश साकळतोय. तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही. पण तू कूठं आहेस? तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात! तू 'चॅम्प्स एलीसिस'च्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील. रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय. हिवाळ्यातील आकाशात असणा