Skip to main content

Posts

Showing posts from March 6, 2011

गरीब कोण ?

अर्थात नजरेचा फरक ,,,,,, एकदा एक अति श्रीमंत माणूस आपल्या मुलाला जवळच्याच एका खेड्यातल्या शेतावर गेला, तिथली ती गरिबी त्यालोकांच दारिद्र्य आपल्या मुलाने अनुभवाव म्हणून तो त्याला घेवून गेला , आणि मग त्याला आपल्या संपत्तीच महत्व आणि अपूर्वाई आपोआप कळेल .त्यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा सदैव अभिमान राहील असा विचार करून त्या खेड्यात त्या मुलाला तो घेवून आला होता. ते दोघ बाप लेक त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतावर दोन दिवस राहिले . आणि मग आपल्या गहरी परतल्यावर त्या बापाने आपल्या श्रीमंती गुर्मीत विचारले काय मग कशी वाटली ट्रीप? बघितलस ना गरीब लोक कस जगतात ? यावर तो मुलगा म्हणाला हो हि ट्रीप मला खूपच आवडली, आणि लक्षात  आल कि आपणच त्यांच्या पेक्षा जास्त गरीब आहोत,,,,,, हे ऐकून बाप बेशुद्ध व्हायचा तेव्हडा बाकी होता,,, बाप म्हणाल ते कस काय? मुलगा म्हणाला आपल्याकडे एक कुत्रा आहे ,त्यांच्या कडे चार कुत्रे आहेत, आपल्या अंगणात पोहायचा छोटासा तलाव आहे त्यांच्या कडे खूप मोठी खाडी आहे , ती कुठे संपते ते दिसतच नाही, आपल अंगण गेट पर्यंत आहे त्याचं अंगण क्षितिजाला जावून टेकल आहे, आपलच

पत्रास कारण कि , ,,,,,,

||श्री|| ||खंडोबा प्रसन्न|| स.न.वि.वि. प त्रा स कारण कि , मित्रांनो खूप वर्ष लोटली,  कु णाचे मला पत्र आले नाही कि  मी कुणाला पाठविले नाही. तुम्ही शेवटचे आंतरदेशी पत्र , पोस्टकार्ड कुणाला पाठवले?  किंवा तुम्हाला कुणाचे आले? जर आठवून पाहा . .! आज कपाट साफ करता करता एक पोस्टकार्ड फाईल मधून खाली पडले . . आणि गहीवरुन आले . . एक काळ होता किती महत्त्व होते . .या पोस्टकार्ड, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी, तार यांना . . यांच्या शिवाय माणसांची नाती एकमेकांत घट्ट राहणे मुश्किल होते . . काकांचे, मामांचे ,आजोळचे पत्र आले की ते वाचताना  सर्व मंडळी कशी त्या पत्रात डोळ्यासमोर साक्षात उभी राहत . . त्या काळी आम्हा लहान मुलांचा पण खूप रुबाब होता .  त्यावेळी मी चौथी ,पाचवीला असेन . रस्त्यावर कुठे पोस्टमन कुणाचे घर शोधत असला तर . . लगबगीने ओ काका मला माहीत आहे त्यांचे घर . .चला मी दाखवतो . . मग त्यांना त्या घरी नेऊन शाबासकी मिळवायची . . जर त्या घरात कुणाला वाचता येत नसेन तर आपला रुबाब अजून वाढला . . ऐ पिंटू हे पत्र वाच जरा कुणाचे आले आहे ? मग त्यांना ते वाचून दाखवून खावू पण मिळवायचा . .कित