Skip to main content

Posts

Showing posts from July 22, 2018

*मनुष्य आणि प्राणी*

*प्रिय मित्रा*, *फक्त तुझ्यासारख्या अनेक मित्रांसाठी हॉस्पिटल मध्ये जस हिम्मत करूनही बोलू शकलो नाही तसेच इथेही तुझं नाव लिहायची हिम्मत मला होत नाही कारण आता लक्षात आलय की यावर अंमल तूच नव्हे सगळ्यांनीच करायला हवा म्हणून,,* दोनच दिवसांपूर्वी एका मित्राच्या मुलाचा फोन आला की वडीलांना एडमिट केलंय त्यांना *पेरेलेलीस चा ऐटेक* आला आहे आहेत,, आता एडमिट आहेत म्हंटल्यावर त्याची भेटून विचारपूरस करणं आलं आणि तसा मित्र ही खूप जवळचा जुना मध्यंतरीच्या काळात कामाच्या धावपळीत तो विसरला होता मला,,, खूप मेहनती खूप काम करायची तयारी असलेला,,, हो येतो भेटायला अस म्हणत कुठलं हॉस्पिटल वैगेरे विचारून घेतलं,, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायला निघायच्या आधी चहा घ्यावा म्हणून सहज बसलो तो समोरच इसाप नितीच पुस्तक पडलं होतं सहज चाळायला घेतलं चहा येई पर्यंत एक गोष्ट वाचू म्हणत ते हातात घेतलं तो सहजच *माणूस आणि प्राणी* गोष्ट समोर आली,, एके ठिकाणी रस्त्यात एक साखरेचं पोत पडलेलं पाहून एक मुंगी धावत येते यथा शक्ती तिला उचलणं शक्य आहे तितका एक दाणा ती उचलते आणि चालू पडते मग तिच्या मागे चिमणी कावळा ससा कुत्रा

*शांताबाई-स्वाभिमान आणि आरक्षण*

गोष्ट तशी अलिकडचीच कोल्हारपुरातील गडहिंग्लज गावातील 70 वर्षीय *नाभिक समाजातील* शांताबाई यादवांची,, 12 व्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन 30त च विधवा झाल्या पदरी चार मुली वडिलोपार्जित 3 एकर दिराने बळकवलेली अशा स्थितीत कुणावरही अवलंबून न राहता नवऱ्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला परन्तु *एक बाई केस कापणार?* चार मुली आणि गरिबी सोबत आता समाजाच्या तर्फे कुचाळक्या,अवहेलना,बदनामीच पदरी पडली,,, आणि *एकेदिवशी नाट्यमय घटना घडली,,,* गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या सद्गृहस्तान शांताबाईंना भर चौकात बोलावलं आणि त्या माऊलीला आपली दाढी कटिंग करायला सांगितली विस्फारलेल्या नजरेने सार गाव ती घटना पहात होत, दाढी कटिंग झाली *हरिभाऊंनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून लोकांना आवाहन केलं या बाईंनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांची कुचेष्टा अवहेलना मी खपवून घेणार नाही आशा तर्हेने त्या बाईंच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली* पुढे त्यावर अजय कुरणे यांनी *बलुत* नावाचा लघुपट ही काढला,, आज हे सारं आठवायचं कारण,,, आरक्षण गोंधळ जो अभूतपूर्व चालू आहे,, *मा

,तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा😝😜😜👈🏻

सत्य जे बोचर असत जे बोचत तेच सत्य असत दोन आजोबा आपसात गप्पा मारत बसले होते 1ले आजोबा 2 र्यांना म्हणाले , अहो माझी नात लग्नाची आहे b e झालेली आहे ,पुण्यात जाँब करते ,उच आहे, सुंदर आहे , एखादा चांगला मुलगा सुचवा . 2रे आजोबा --आपेक्शा काय आहेत ? 1ले आजोबा -- फारशी नाही ,परंतु मुलगा m e ,mtek असावा, पुण्यातला असावा , पुण्यात स्वतःचा फ्लॅट असावा ,व लाखाच्या वर पगार असावा ,घरी थोडी शेती असावी 2रे आजोबा-- आणखी काही ? 1ले आजोबा --- महत्वाचे म्हणजे मुलगा एकटा असावा ,त्याला भाऊ,बहीण ,आई वडील आजी आजोबा कोणीही नसावेत (डस्ट बीन नकोच ) 2रे आजोबा -- तुम्हाला पाहिजे तसा मुलगा माझ्या कडे आहे ,एकटाच आहे ,त्याला भाऊ बहीण कोणीच नाही ,माझ्या मित्राचाच नातु आहे ,मुलाचे आईवडिल दोन वर्षापूर्वी अँक्सीडेंट मध्ये वारलेत ,आजीआजोबा देखील वारलेत ,मी प्रयत्न करतो ,पण त्या मुलाचीही एक अट आहे ,मुलीला भाऊबहीण,आईवडिल आजीआजोबा ( डस्ट बीन ) कोणीही नकोत तुमचा पूर्ण परिवार जर आजच आत्महत्या करत असेल ,तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा😝😜😜👈🏻 ( नंतर दोन्ही आजोबांचे कडाक्याचे भांडण झाले हे सांगायला नकोच )

दिव्यांची पूजा " कि " गटारात लोळण 2

दिव्यांची आवस सुकरासी विष्ठा माने सावकाश मिष्ठानणा ची त्यास काय गोड़ी- संत शिरोमणि श्री तुकोबाराय फेसबुक आणि व्हाट्स ऐप वर येणारे मेसेज पाहून *गटारी हां देखिल 31डीसे* प्रमाने राष्ट्रीय सण होणार की काय अस वाटू लागलय,,, वास्तविक ज्याला आज गटारी अमावस्या अस अगदी काही क्यालेंडर मधे ही लिहल आणि बोलल जातय खर तर तमसो मा जोतिर्गमयचा खर्या अर्थाने संदेश देणारा हा सण- ज्या दिव्याने या देशातील 33 कोटि देवदेवतांना ओवाळल जात पूजल जात त्या दिव्यांची पूजा करायचा हां दिवस*  या दिवशी दिव्यान्ना घासून पुसून लक्ख केल जात नवी वात नव तेल घातल जात कारण या दिव्याच्या अवसेपासून श्रावण चालू होतो या महिन्यात खुप सण वार येतात गौरी गणपति इ. त्या नंतर नवरात्र त्यात तर नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो पुढे बाकीचे सण वार अशावेळी सर्वात पुढे असतो तो दिवा त्याच हे पूजन ,,,, पण आजकाल हे सार मागे पडून आता काय महिनाभर खायला मिळणार नाही घ्या खावुन आता मिलनार नाही घ्या पिवुन त्या निमित्ताने घ्या गटारात लोलून  असे सण आपन साजरे करू लागलो पहिल्यांदा मानवाने अंधारवर विजय प्रकाशाच्या सहाय्याने मिळवला अ

घरभर वस्तू पार्ट 2- देशद्रोही

दुसरी तिसरीत असताना एक छान धडा होता घरभर वस्तू,,, त्या गोष्टीच हे आधुनिक रूप,, 🤓अमित शाह भाषण देत असतात त्या भाषणात ते एक गोष्ट सांगतात,,, एक व्यक्तिला 3 मुलं होती त्याने तीनही मुलांना 100 100 रुपये दिले आणि अशी वस्तू आणायचं आवाहन केलं की त्या वस्तूने सर घर भरून गेलं पाहिजे... पहिल्या मुलाने 100 रु च्या गवताच्या पेंढ्या आणल्या पण घर काही भरलं नाही,, दूसऱ्या मुलाने 100 रू चा कापूस आणला त्याने ही घर पूर्ण पणे भरलं नाही ,, तीसऱ्या मुलाने 1 रूपायात 1 मेणबत्ती आणि माचीस आणली आणि त्या प्रकाशाने सार घर भरून गेलं अमितजी शहाजी भाषणात पुढे बोलले की आपले मा प्रधान सेवक त्या तिसऱ्या मुला सारखे आहेत जे राजकारणात आल्या पासून देशाचं भवितव्य उज्ज्वल प्रकाशमान आणि समृद्ध झालेलं दिसत आहे इतक्यात मागून एक आवाज आला ,"वो सब तो ठीक है बाकी के 99 रूपए कहाँ है?" 🤗🤗 अमित शाह - मारो इस देश द्रोही को जो सवाल करता है।