Skip to main content

Posts

Showing posts from May 5, 2019

लिंबाराम,,,,

https://youtu.be/ii2Ru3JOH2A लिंबाराम आज हे किती जणांना माहिती असेल , आठवत असेल कुणास ठाऊक???? परंतु तीन वेळा भारताचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये फडकवणारा,, लिंबाराम ज्याच्या चपळतेने डोळ्याचे पारणे फिटत होते तो ,,,लिंबाराम तो लिंबाराम आज स्वतः मात्र असहाय, अपंग, अवस्थेत धपडतोय,, भारतीय धनुर्विध्या चमुचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आज मात्र दोन शब्द बोलण्याच्या ही अवस्थेत नाही, आज त्याची दृष्टीच बाधित झालीय नीट चालू ही शकत नाही, श्रेष्ठ धनुर्विद्या वीर प्रशिक्षक लिंबाराम ची ही आजची अवस्था *दिल्लीच्या एम्स इस्पितळात जनरल वार्डात आज त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे* 46 व्या वर्षी आलेल्या स्नायू विकाराने चपळ लिंबाराम अकाली म्हातारा झालाय धनुष्याच्या प्रत्येक टनत्काराने धनुष्याला कंपन आणणार्या हातालाच आज कम्प सूटलाय,, तो कुणालाही ओळखू शकत नाही 2013 मध्ये या आजाराने पहिले आक्रमण केले ते त्याच्या नेमके त्याच्या डोळ्यावरच,,, आणि काही दिवसातच हे दुखणे पायापर्यंत पोहचले हालचालच थांबली, लिंबाराम ला आज आर्थिक मदतीसाठी याचना करावी लागत आहे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मदत केली