Skip to main content

शेख_चिल्ली- ज्याची जशी कर्म तस त्याच नाव


#
पूर्वी आमच्या शेजारी एक दिल्लीहुन आलेलं कुटुंब पूर्वी  मुंबईत आलेलं राहत होत त्यात एक आज्जी तिची सून मुलगा दोन नातू एक नात रहात होती
त्या आज्जीला आपल्या मुलाबाळांची छान नाव असताना देखील विचित्र नावाने हाक मारायची सवय होती मोठ्या नातीला लडकन, नातवाला लड्डू, दुसऱ्याला टेडया,,, आशा विचित्र नावाने हाक मारत असे न पटून एक दिवस हिम्मत करत त्या आजीला मी सहज विचारलं आजी इतकी छान छान नाव आपल्या नातवांची तुम्हीच ठेवली असतील ना???
तस आज्जीने मला जवळ घेतलं आणि केसांवरून हात फिरवत सांगितलं
*बरोबर बोलतोस पण ज्याची जशी कर्म तस त्याच नाव*
आता बघ ही सुनीता तू ओळखतोस तुझ्याच वर्गात आहे ना? तू बघतोस ही बसल्या बसल्या कुठेही लुडकते ( झोपते) आणि हा अनिलकुमार काही विचारले तर कधी सरळ बोलतच नाही नेहमी वाकडच ( टेढा) बोलतो, आणि हा अजय बघितलास ना किती खादाड आहे आणि लाडू बघितलं तर पंचपक्वांनाच ताट देखील बाजूला सारेल (लड्डू )
अरे जस नाव आहे तसेच वागावं नाही तर त्या नावाला अर्थ प्राप्त होतो कुुणी पप्पू तर कुुणी फेकू थांब आज खऱ्या #शेख_साहेबांची गोष्ट सांगते ऐक, तर हे शेख साहेब शाळेत कधी नीट जात नसत त्यांचा व्यवसाय ( भंगार वैगेरे ) करण्यावरच जोर असे जे मिळेल जस मिळेल ते कधी रस्त्यावर कधी घरोघरी तर कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा,बिसलेरी, बिस्कीट ,शाळा सोडून काहीबाही विकण्यातच यांचा दिवस जात असे आई वडील कुठून कुठून पकडून आणून वर्गात बसवत पण या शेख साहेबांचं लक्ष बाहेरच असे, त्यामुळे काय शिकवतात या कडे कधी त्याच लक्ष नसे मग अधर्वट कानावर पडे ते तो कसे बसे लक्षात ठेवत असे त्या दिवशी वर्गात स्त्रीलिंगी पुल्लिंग शिकवत होते अर्थातच शेख साहेबांचं लक्ष नव्हते
गुरुजी शिकवत होते ,
सलमान रोता है
सलमा रोती है
सलमान  खाता है
सलमा खाती है,,, पण शेख साहेब ?? त्यांचे डोळे आणि डोकं वर्गाबाहेरच भिरभिरत होते,,
झालं थोड्या शाळा सुटली सर्वात आधी शेख साहेब बाहेर पडले आणि गेले खेळत खेळत दूर आणि अचानक एका मुलीचा ओरडण्याचा आवाज त्याला ऐकू आला,,, बघितलं  तर मुलगी एका विहिरीत पडली होती आणि मदती साठी आवाज देत होती
झालं ते बघितल्यावर शेख साहेबांनी धावत जाऊन
गावकऱ्यांना गोळा करून त्यांच्या मदतीने तिला बाहेर काढलं पण यात गम्मत अशी झाली होती की अर्धवट शिक्षण घेतलेल्या शेखने गावात लोकांना बोलवताना ,, *अरे कुवे मे लडकी गिरी है वो मदत के लिये #चिल्ली रही हे* अस वारंवार बोलत होता लोकांना त्याकडे दुर्लक्ष करत मुलीला बाहेर काढलं पण मग मात्र नंतर त्याला विचारलं की तू अस का बोलत होतास की *लडकी चिल्ली रही है?*
त्यावर मोठी फुशारकी मारत शेख साहेब बोलले
*अरे भाई पढा लिखा हु तुम सब जैसा गवार थोडी हु लाडका होता तो #चिल्ला था तो लडकी है तो #चिल्ली ही रहेगी ना?
असल्या अर्धवट रावांचं नाव पुढे शेखचिल्ली झालं
आजही आजूबाजूला निरखून पाहिलं आणि डोळे आणि मेंदू जागा ठेवला असले अर्धवट राव आज आपल्यावरच राज्य करताना दिसतील
शेवटी शेखचिल्ली स्वप्न म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे ठरलेलंच ज्यांच्या आधारावर त्यांच्यावरच कुर्हाड चालवली की फांदी किती काळ सांभाळून घेणार शेवटी येरे माझ्या मागल्या
मतदार त्या फांदीसारखेच तुम्हा किती सहन करणार?

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...