Skip to main content

साधू दगड आणि प्रामाणिकपणा

|| श्री नथुरामाय नमः||

सध्या सर्जिकल स्ट्राईकचा स्ट्रोक असा काही देशवासियांना लागला 
आहे की जो तो पाक आणि चीनच्या दिशेने दगड भिरकावू लागला आहे
अस नाही की या आधी कधी असे स्ट्राईक झालेच नाहीत 
पण मार्केटिंग गुरु त्यावेळी राज्यावर नव्हते इतकंच,,
असो
त्यासर्व कोच बटाटे गुगलेश्वर गुगलाधींना चरणी,,
सहज खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट आठवली,,
आट पाट नगरातून एक साधू दुसर्या राज्यात जाण्यासाठी निघालेला असतो दुपारचं रणरणत ऊन नुकतंच सुरु झालेल असत अशातच एक निवांत सावली पाहावी आणि दोन घास खात थोडा आराम करावा असा विचार मनात येतो तोच एक छान झोपडी वजा घर आजूबाजूला छान सारवलेलं दिसल आता इथेच टेकू असा विचार करीत तो साधू त्या जागेत शिरला तसा त्या घरातील मोठी मंडळी आली त्याच स्वागत केलं हातपाय धुवायला पाणी दिल 
साधू संत येति घरा,, असा त्यांना छान आंनद झाला मग साधुनेही सर्व आन्हिके उरकून घेतली जेवण वैगेरे झालं,, आता थोडा आराम करू म्हणत तो चक्क झोपला पण थोड्या वेळाने एका मोठ्या कोलाहालाने त्याला जाग आली,, पाहतो तो काय एका बाईला झाडाला बांधलाय आणि
सारे गावकरी कुणी शिव्या कुणी शाप कुणी दगड फेकून मारत होत
तसे साधू महाराज पुढे झाले,,
अरे थांबा थांबा म्हणत विन्नती करू लागले तसे सारे गावकरी साधूला सांगू लागले अहो ती बाईचं तशी आहे सारा गाव नासवला तिला शिक्षा झालीच पाहिजे ,तसे साधू म्हणाले हो हो झालीच पाहिजे पण आपला राजा प्रमुख सरपंच कुणी असेलच कि नाही
पंचपरमेश्वर असतात त्यात ती बाई आहे आपण थोडी तरी दया नक्कीच दाखवली पाहिजे,, परंतु सारे लोक भडकलेल्या भूमिकेत होते कुणी ऐकायला तयार नव्हते
शेवटी साधू म्हणाले आपण एक काम करू तुम्ही तिला दगडानेच ठेचून मारू,, आता फक्त एक काम करू 
एका ओळीत या या बाई समोर उभे रहा आणि फक्त मनात बोला जाहीर नव्हे,, फक्त मनात बोला त्या परमेश्वराला साक्षी ठेवून ,,
मी आयुष्यात अत्यन्त प्रामाणिक पणे वागत आलो आहे लांडी लबाडी केलेली नाही कुणाला फसवलेलं नाही कुणाला गंडवलेलं नाही,,,,
अशी स्वतः स्वतःला ग्वाही द्यायची
आणि मग तुम्ही थकेपर्यत त्या बाईला जसे हवं तसं मारा शिव्या द्या शाप द्या चप्पल बुटाने बडवा दगडाने ठेचा जे हवं ते करा,,,,
आणि जादूची कांडी फिरावी तस झाला क्षणार्धात दगड उगारेलेले हात खाली आले सारयांनीच आपापले हात खाली घेतलं सारे मान खाली घालुन उभे राहिले😔😔
आजही तशी वेगळी गोष्ट नाही,,
पापिस्तानला धडा हा शिकवला गेलाच पाहिजे आणि ते काम लष्कर नक्कीच करेल त्यासाठी कुणाच्या आदेशाची गरज नाही,,
फक्त अवाजवी राजकीय हस्तक्षेप नको,, हो पण इतकं होऊन आम्ही काय करणार आहोत आपलंही काही कर्तव्य आहे की नाही ?
फक्त फेसबुक व्हाट्सअप वर बेडक्या फुगवून आपल्याच टिर्या बडवून घेऊन,,
इकडचे संदेश (सेन्सिबल) तिकडे पेस्ट करून ,,
युद्धा च्या कथा आणि पराक्रमाचे गोडवे गाऊन,,
एकमेकांना तू लष्करात जा तुझी तिथे गरज आहे असे सल्ले देण्यापेक्षा,,
याआपण नेमके प्रामाणिक आहोत
आपल्या तत्वांशी?
आपण नेमके किती प्रामाणिक आहोत आपल्या नोकरी धंद्याशी??
आपण नेमके किती प्रामाणिक आहोत आपल्या ,मुलांशी,बायकोशी,नातेवाईकांशी, मित्रांशी,आणि समाजाशी??
आपल्या देवाशी ,धर्माशी, त्यात आपण कुणाची फसवणूक तर करत नाही ना?? हा सवाल आधी विचारावा
एकेकाळी
देशाचं रक्षण करण्याची शपथ घेणारे आज आरक्षण मागत गल्लोगल्ली फिरत आहेत
एकेकाळी
प्राण जाये पर वचन न जाये ,,
यासाठी ख्यायनाम असणारा देश,,
आज साधं फोनवर सुद्धा खोटं बोलतो ,त्यातही आधी तो फोनच उचलत नाही,, फोन न उचलणं हा खूप मोठा सामाजिक अपराध करत असतो हे आपल्या गावी हि नसत,,
उगाच अमेरिका साऱ्या जगाचा रोष पत्करून लादेन ला मारत नाही
त्यांना माहीत असते की आपल्या जनतेचं आपल्या देशावर किती आहे ते आपली जनता म्हणजे पुतना मावशी नव्हे जिला फक्त कृष्णाला मारण्यासाठी पान्हा फुटेल,,
तेव्हा जास्त मागणं नाही देवा फक्त आपल्या मताशी शब्दाशी कामाशी समाजाशी प्रामाणिक रहा आपल्या पंत प्रधानची ताकद आपण आहोत ती ताकद देत नासल्यामुळे आज त्यांना देश विदेश फिरावे लागत आहेत
केवळ दिलेल्या शब्दाखातर मराठे पानिपतावर झुंझले अटक पार गेले भगवा अभिमानाने मिरवला केवळ शिवप्रभूंच्या शब्दाखातर वेडात मराठे झुंझले
बाजीप्रभू, मुरारबाजी ,तानाजी ,शिवाकाशीद, असे असंख्य पाचही
पातशाह्यां विरोधात लढले झुंझले
विरगतीस प्राप्त झाले कारण 
ते त्यांच्या इमानाशी प्रामाणिक होते
आणि हो हे प्रामाणिक राहण्यासाठी
लष्करात जायची गरज नाही
लक्षात ठेवा
जपानमधे अणूबाँबच्या रेडीएशन मुळे जितके लोक नपुंसक झाले असतील त्यापेक्षा कितीतरी शतपटीने जास्त लोक किंवा पिढ्या भारतात हतप्रभ झालेत ते केवळ अप्रमाणिकपणामुळे
स्वातंत्र्यप्रेमी समाज वा देशाचा शत्रू कुठून, परदेशातून येत नसतो. अवघ्या जगाची सेना एकवटली आणि जगातला महान योद्धा जरी त्या सेनेचा सेनापती असला, तरी त्याला सार्वभौम राष्ट्र पादाक्रांत करता येत नसते. स्वयंभू समाजाचे राष्ट्र कधी परकीय शत्रूकडून संपवले जात नाही. त्याला संपवण्यासाठी त्याच समाजात विध्वंसक दगाबाज पैदा व्हावा लागतो,आणि झाला कि ते राष्ट्र रसातळाला जाते  - अब्राहम लिंकन
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक



Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...