Skip to main content

रांगडी कविता

*रांगडी  कविता*

गिरिदुर्गांच्या  तटबंद्यांना
जरा  एकदा  बिलगून  बघ,
बुलंद  बुरुजांच्या  चिलखती  चिऱ्यांना
फक्त  एकदा  स्पर्शून  बघ...
आणि  सांग  मला,
*शहरी  इमल्यांची  आठवण  येते  का..?*

किल्ल्यांवरच्या  पठारांवर
एकदा  रात्री  पहुडून  बघ,
पौर्णिमेचं  पिठूर  चांदणं
स्वतःच्या  अंगावर  पांघरून  बघ...
आणि  सांग  मला,
*पंचतारांकीत  हॉटेलची  आठवण  येते  का..?*

बाजी-तान्याचे  पोवाडे
रायगडावरून  गाऊन  बघ,
देवराईतली  राऊळघंटा
एकदा  सांजवेळी  वाजवून  बघ...
आणि  सांग  मला,
*डी.जे.च्या  धिंगाण्याची  आठवण  येते  का..?*

खळाळणाऱ्या  झऱ्यात
फक्त  जरा  बसून  बघ,
कोसळता  धबधबा
तुझ्या  पाठीवर  जरा  झेलून  बघ...
आणि  सांग  मला,
*रिसॉर्टमधल्या  कृत्रिम  धबधब्याची  आठवण  येते  का..?*

कड्यावरच्या  ठाकरांकडल्या
चहाचे  भुरके  मारुन  बघ,
धनगराच्या  झापात  बसून
धारोष्ण  दूध  पिऊन  बघ...
आणि  सांग  मला,
*पेप्सी,  कोक,  सेव्हन अपची  आठवण  येते  का..?*

चुलीवर  भाजलेली  कांदाभाकरी
एकदा  जरा  चाखून  बघ,
सारवलेल्या  जमिनीवर  बसून
केळीच्या  पानात  जेवून  बघ...
आणि  सांग  मला,
*मॅकडोनाल्डच्या  बर्गरची  आठवण  येते  का..?*

रानांमधून   धावणाऱ्या
वाटांवरून  जरा  बागडून  बघ,
मऊ  ओल्या  हिरवळीवरून
उघड्या  पायांनी  चालून  बघ...
आणि  सांग  मला,
*इटालियन  मार्बलच्या  फरश्यांची  आठवण  येते  का..?*

प्रतिष्ठेच्या  क्षणभंगूर  कवचातून
जरा  बाहेर  येऊन  बघ,
निसर्गाच्या  संगीतावर
आयुष्याची  बासरी  वाजवून  बघ...
आणि  सांग  मला,
*स्वतःची  तरी  आठवण  येते  का..???*

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...