Skip to main content

Posts

Showing posts from July 1, 2018

भगवान श्री परशुरामाचा शाप ,बुद्धी आणि आपण

आज तक तेज वर संजय सिन्हा रोजच गोष्ट सांगत असतात आज त्यांच्या एका परिचिताची गोष्ट , एक दिवस त्यांचे एक परिचित त्यांना फोन करून त्यांच्या घरगुती समस्येबद्दल बोलतात मुलाची तक्रार करतात की मुलगा हाता बाहेर चालला आहे पैसे काय उधळतो लहान सहान गोष्टीवरून घरात बहीण बघत नाही आई लगेच धावून जातो आकांड तांडव करतो मला काही तरी उपाय सांगा काय करू माझं तर डोकच चालायचं बंद झालंय? मी काय करू करता सावरता मुलगा असा हातून निसटून जातोय आणि मी काहीच करू शकत नाही बुद्धी भ्रष्ट झालीय काय करू काही उपाय सांगा? तो फोन वर बोलत होता आणि इकडे ते ऐकत गप्प झालो होतो मला माझे आणि त्या परिचिताचे दिल्लीत कामाला तरुणपणातील दिवस आठवत होते आम्ही दोघेही एकदमच दिल्लीत आलो होतो त्यावेळी माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता *संजय खूप पैसे कमविशील इतकं तुझं शिक्षण झालं नक्कीच आहे मात्र किती आणि कसे ते मात्र तू ठरव,,,,* मी अगदी त्याच रस्त्यावर नेटाने चालायचा प्रयत्न करत होतो आणि तो परिचित मात्र माझी टिंगल उडवत असे संजयजी तुम्ही गरिबी पाहिलेली नाही गरिबीचे चटके काय असतात तुम्हला माहीत नाही पैशाशिवाय पान हलत नाही पैसा भगवान नही

फसवले गेलेल्या वडिलांचं मृत्यू पत्र

आटपाट देशातील एका  नगरीतील सत्य घटना,, मरणासन्न अवस्थेत वडील पलंगावर पडलेले आहेत आणि त्यांच्या त्या मरणासन्न यातनेत वडिलांना आपल्याला काहीच मदत करता येत नाही अशा निराश आणि चिंताक्रांत अवस्थेत तिघे भाऊ वडिलांच्या पायाशी बसून आहेत त्याही अवस्थेत आपल्या मुलांची काळजी वाहणारे वडील त्या मुलांना आश्वस्त करतात मुलांनो, " मी उधार ज्यांच्याकडून घेतलं होतं, ती उधारी सगळी चुकवली आहे, जी येणी येणार होती ती देखील वसूल करून ठेवली आहे, त्यांची समान वाटणी मी तुम्हा भावात करून ठेवली आहे राहत घर मुलींच्या लग्नासाठी घेतलल कर्ज फेडल आहे त्यामुळे काळजी नाही फक्त एका जागी मोठी रक्कम अडकून बसली आहे तुम्हा भावंडांना ती वसूल झाली तर आपापसात समसमान वाटून घ्या, रोख रक्कम हाती मिळेल हे लक्ष्यात आल्यावर त्याही परिस्थतीत भावांचे डोळे लकाकले, तिघेही एकदम बोलले बाबा जस तुम्ही सांगाल तस सांगा कुणाकडून किती रक्कम येणे बाकी आहे? वडील बोलले माहीत नाही कधी माझे प्राण निघून जातील म्हणून तळघरात एक कपाटात संपत्ती वाटप आणि येणाऱ्या त्या रोख रकम बद्दल लिहल आहे- मी मेल्या नन्तरच ते पत्र सविस्तर वाचा आणि दुसऱ्य