Skip to main content

Posts

Showing posts from December 5, 2010

सुतलीने बांधला हत्ती,,,,

काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,, आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर  मिळाल सुतलीने बांधला हत्ती,,,, एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे , तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ, त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले  महाराज या हत्तीचा काही तरी बंदोबस्त करा  महाराज आम्ही कंटाळलो. गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देणे उचित ठरेल. गुरुनी एक क्षण विचार केला आणि  शिष्यांना म्हणाले सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा . त्याप्रमाणे  सार्यांनी प्रयत्न करून त्या हत्तीला एका   वृक्षाला   बांधून ठेवले. हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला . पण  हळूहळू तो शांत झाला . २\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता एका  दोरखंडाने बांधा,, शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या  दोरखंडाने ? अहो तो राहिल का त्यात ? मी सांगतो तस करा  विश्वास ठेवा , पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,, तो दोर ही काढा आता साधी सुतळ घ्या त्याने हत्ती बांधा . पण हत्ती काही जगाचा हलला नाही .

मुक्ता ,,,,,

मुक्ता मी तुझ कब्बड्डी कब्बड्डी पाहिलं आणि काय सांगू त्या नाटकाची मला वाटत माझ्या ईतकी जाहिरात कुणी केली नसेल (हे माझ मत आहे) मी स्वतः कब्बडी आणि कराटेशी संबंधित असा खेळाडू आहे आणि ते नाटक तू नाही केलं प्रत्यक्षात मला मी करतोय असा भास होत होता . माझी देखील अशीच काहीशी कथा आहे मला मुलगा म्हणून हे सार ईतक जड गेल प्रत्यक्षात ते मुलींना किती जड जात असेल कल्पना न केलेली बरी अरे हे सार सागताना तुझ्या अभिनयाला दाद ,,,,,बापरे काय जगलीस ते तू नाटक आणि आता जोगवा,,,,मला यांचा देखील चांगला अनुभव आहे तू  काय आणि ईतर सारे काय तुम्हाला कस काय जमत बुवा ? या सगळ्याला खूप चांगला म्हणन कमी पडेल ईतका तो चित्रपट सुंदर होता आणि आता मुंबई पुणे मुंबई अरे यार,,,,, व्यसन लागलाय मला तुझ्या चित्रपटांच आणि हे व्यसन तुझी अग्निशिखा सिरीयल पासून आहे बरका ,,, 

७४ जणांचे तळतळाट....

मध्ये एकदा  प्रबोधनकारांची गोष्ट वाचनात आली ,   आपणा पैकी कित्येकांना माहित हि असेल कदाचित,   असो तर गोष्ट अशी ,,,   केशव सीताराम ठकारे ,म्हणजेच प्रबोधनकार ,   त्यांच्या तरुण पणी त्यांनी एकदा लॉटरीच एक तिकीट काढल.   आणि कर्मधर्म संयोगाने ते लागल हि ,,,   गावात बातमी पसरली अरे ठाकरेंना लॉटरी लागली.   जो तो ठाकरेंच अभिनंदन करत होता   कारण मिळालेली रक्कम हि खूप मोठी होती   आज कदाचित ती तुम्हाला कमी वाटेल   कारण आज आपणा सर्वांची मुल त्या लॉ ट्रीच्या   रकमे ईतका पैसा रोज खर्च करतात.   तर ती रक्कम होती.   एक रुपयाच्या बदल्यात ७५ रुपये   हसलात ना..?   पण त्याकाळी ७५ रुपयात   किमान ६ महिने एखाद्या कुटुंबाचा घराचा खर्च चाले ,,,,,,   तर असे ते ७५ रुपये कधी एकदा आईच्या पायावर ठेवून   तिची शाबासकी मिळवतो असे ,   प्रबोधनकारांना झाले होते ,आणि हि बातमी तो पर्यंत   त्यांच्या आईला हि कळली होती ,   मुलाची वाट पाहत ती दरवाजात बसली होती ,   आणि धावत धावत केशव आला   आईची पायावर ते पैसे ठेवणार ,,   तोच एखादी वीज कडाडावी तशी ती माउली   कडाडली आधी ते सारे पैसे घराच्या बाहेर टाक..

गुजारीश ,,,,,दया मरणाची ,

अर्थात मृत्यूच सेलिब्रेशन ह्रितिक रोशनचा आणखी एक नितांत सुंदर सिनेमा मध्यंतरी अरुणा शानभाग चा विषय पुन्हा  एकदा गाजला होता . के ई एम रुग्णालयात आहे ती आहे आजहि, दया मरणाची  ईच्छा धरून असलेली पण नाही ,,,,,, आज हि ती  तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतेय आणि नराधम सोहनलाल वल्मिकि १९७३  साली याने अरुणा शानभाग वर बलात्कार केला केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,? आज तो कुठे तरी दिल्लीत कुठल्याशा दवाखान्यात च आहे म्हणे ,, त्याच्यावरील  आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता या ३६ वर्षात १९७३ ते २००९ के इ एम चे ७ डीन बदलले भोइवाड्याचे पोलिस बदलले,अधिकारी बदलले, नर्सेस बदलल्यापण अरुणा ला न्याय मिळाला नाही ,,,? असाच काहीसा वेगळा विषय घेवून आला  आहे गुजारीश,,,,,सरकार दरबारी तो हि दया मरणाची इच्छा प्रदर्शित करतो . आणि ती मागणी करताना अगदी जोरका झटका हि देतो प्रतिपक्षाच्या वकिलाला केवळ ६० सेकंद जादूच्या पेटीत बसायला लावतो आणि तो वकील एक मिनिट हि बसू शकत नाही . त्यावर तो म्हणतो, "माझ्या आयुष्याची ६० सेकंद हि तुम्ही जगू शकत नाही ?"क्या बात है..... मध्यंतरी

सत्य हे ईश्वराचे दुसरे रूप

माझ्या आईने माझ्या लहान पाणी सांगितलेली गोष्ट आहे हि विश्वासा सारखा दुसरा धर्म नाही आणि सत्य हे ईश्वराचे दुसरे रूप आहे हो कळण्यासाठी मात्र ती फांदी सोडन जरुरीच आहे . एक देवा धर्माला न मानणारा माणूस असतो , एके दिवशी तो सहज जंगलात फिरायला जातो आणि, अचानक एका दगडावरून त्याचा पाय घसरतो आणि तो खोल दरीत पडतो ,,,,,, पण, नशि त्याचा चांगल म्हणून पडता पडता त्याच्या हाताला एक फांदी लागते आणि तिला धरून तो लोबंकळू लागतो, आणि आता काय करायचं या विचारात तो त्याच्या मित्रांना हाका मारतो पण ते सारे पुढे निघून गेलेले असतात मदतीला कुणीच नाही काय करायचं? फांदी तर अशी कि आता तुटेल,,,,,, आता काय करायचं ? मोठ्ठा प्रश्न पडतो ?????????????????????? आणि शेवटी झाक मारत तो देवाचा धावा करतो . आणि देव हि लगेच धाव घेतो..... बोल भक्ता काय म्हणतोस? माणूस- अरे देवा तुझे डोळे आहेत कि बटर ? मी इथे फांदीला लटकतोय आणि तू काय शिळोप्याच्या गप्पा मारायला आला आहेस का? देव- भक्त मी तुला वाचवायलाच आलो होतो पण येथे आलो आणि कळल तू देव ईश्वर काहीही मनात नाहीस मग मी कसा काय वाचवायचं? माझे भक्त लोक माझ्या तो

साप आणि साधू

एका जंगलात विषारी साप राहत होता तो ज्या वाटेवर असे त्या वाटेने कुणीही जात नसे गेल्यास तो मारत असे चावत असे ,,, लोक त्याल घाबरत असत त्याल दूषण देत असत, एक दिवस त्या एक जंगलात साधू येतो आणि त्या सापाच्या वारुळा जवळच आश्रम बांधतो त्याच्या भजन प्रवचनाचा त्या सापावर परिणाम होतो तो त्याला भेटून सांगतो मला सर्व वाईट बोलतात मी चावतो त्यामुळे घाबरतात मला सुद्धा आता लोकांनी चांगल बोलाव असे वाटते काय करू ,,? साधू म्हणतो तू चावायचं सोडून दे ,,,,,,,,,, झाल त्याचा ऐकून साप बाहेर येतो लोकांना समजत आता साप काही चावणार नाही मग त्याची परीक्षा घेण्यासाठी लोक जवळ जात काठीने ढोसत कुणी उचलून फेके अशा प्रकारे त्याचा अगदी फुटबॉल केला एक दिवस साधू तिथु जात असता त्याची नजर सापावर पडते साप गलीत गात्र होवून  पडलेला असतो साधू विचारतो कायरे बाबा तुझी अवस्था ? साप म्हणतो तुमची आज्ञेचे फळ भोगतोय मी आधी चावत होतो तेच बर होत,,,,,,,,,? तुमच ऐकल म्हणू हि अवस्था झाली ,,,,, साधू म्हणतो मी बरोबरच सांगितलं होत तू त्याचा गैर अर्थ लावलास मी काय करू ? साप,,,म्हणजे ? साधू ,,अरे मी चावू नको सांगितलं ह