Skip to main content

Posts

Showing posts from February 19, 2012

गिरगाव व्हाया दादर

काही दिवसां पूर्वी आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला होता ,  तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, आणि न कळत्यावेळी अनुभव हि घेतला आहे . पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा  प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल,  एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती,  आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती.. या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जाणारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देणारी ..  अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही  आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. १०५ हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेतृत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई... महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन

"गावात नाही विचारात काळ कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र"

काही गोष्टी योगायोगाने समोर येतात २\४ दिवसंपुर्विया  एका मित्राने एक कविता पाठवली त्यात आपण सारे कसे एकमेकांपासून दूर जावू  लगलो आहोत आधी पत्र मग फोन आणि मोबाईल आणि आता फेसबुक वर भेटताना ही आपली कशी दमछाक होते आहे ह्याच सुंदर वर्णन त्यात होत आणि काल परवा आमच्या भगिनी "माता मृदुलांमयी" यांनी त्यांच्या अमर वाणीतून या सार्या प्रकारचा एका वाक्यात विश्लेषण केल ते अस "गावा त नाही विचारात काळ कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र" आणि मी सहजच विचार करू लागलो जेव्हा माझ्या कडे मोबाईल नव्हता ,,, आणि ईतरान कडे  तो होता साहजिक सारे विचारात अरे तुझा  नं. दे  मी सहज घरातील किंवा दुकानातील नं देत असे आणि त्यांनी फोन केला कि मी कदाचित दुकानात किंवा दुकानात केला तर घरी मग ते रागवायचे अरे मोबाईल ghena आणि एकदाचा होय नाही करता करता मी मोबाईल घेतला आजच्या घडीला ७००\८०० नं असतील पण खूप कमी मित्र आहेत जे आजही मैत्री टिकवून आहेत,,, असो तर सांगायचं ईतकच मी विचार करू लागलो ,,, आज माझे हि नाही नाही म्हणता म्हणता फेसबुक वर १००० मित्र होतील,,, "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र&