Skip to main content

Posts

Showing posts from June 10, 2018

"सात जन्म हाच नवरा मिळून दे "

स्त्री मुक्ती वाल्या काही खुळ्या लोकांची एक दरवर्षी पडणारी पोस्ट असते . ते लक्षात घेवून आधीच ही पोस्ट लिहितो आहे . वट पौर्णिमेला स्त्रियांनी "सात जन्म हाच नवरा मिळून दे " असा वर मागायचा असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करायची असते . यावर १] "नवरे" अशी पूजा कधी करणार ? आणि वर मागणार ? २] हिंदू संस्कृतीत स्त्रियांवर अन्याय केला जातो ३] हिंदू संस्कृती पुरुष प्रधान आहे अशी खुळचट तर्कटे उधळली जातात . आजकाल ज्ञानी लोक यांना उत्तरे द्यायच्या भानगडीत पडत नाहीत . आणि जे लोक संस्कृतीचा आदर करतात पण याचे उत्तर आचार हीन पणा मुळे विसरलेले असतात ते हात चोळत बसतात . हिंदू संस्कृती असे मानते कि लग्न म्हणजे एकमेका समवेत जगताना एकमेकांना ईश्वर बनण्याकडे प्रवृत्त करणे . ज्यायोगे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्राप्त होतात . यात पहिली गोष्ट अशी असते कि लग्न होवून येताना प्रत्येक विवाहिता आपल्या बरोबर अन्नपूर्णा आणते जिची स्थापना सासरच्या देव्हार्यात करतात . नवर्याने रोज पूजा करताना अन्नपूर्णा स्वरूप पत्नीच्या व तिच्या माहेरच्या सर्व कुल स्त्रियांचे प्रतिक असलेल्या