Skip to main content

Posts

Showing posts from April 28, 2019

अलीबाब देखील चोरच होता- ,,फक्त,,,,

गोष्टीच नाव वाचून थोडं आश्चर्य जरूर वाटेल पण आपण सारेच त्या भ्रमाला मान्यता देणारे आहोत गेली अनेक वर्षोनुवर्षे आपण हेच मानत आलो आहोत की अलीबाबा आपलं जीवन काबाडकष्ट करत प्रामाणिकपणे जगत होता त्यासाठीच ही गोष्ट आज सक्काळी सक्काळी नातू महाराज उठले आणि कार्टून लावून बसले वृत्तपत्र वाचता वाचता मग मी ही चोरट्या धावत्या नजरेने कार्टून पाहू लागलो तस मला ही ते बघायला आवडतच आणि त्यात नेमकी अलीबाबा चाळीस चोरांची गोष्ट *(चोर तर अलीबाबा देखील होता)* लागली होती,,,, ती पाहता पाहता हीच गोष्ट जेव्हा मी माझ्या आई कडून ऐकली होती तेव्हा आईला मी एक दोन प्रश्न विचारले होते,,,,,अलीबाबा बाबत,, अर्थातच आईला तो कदाचित उत्तर माहिती नसेल किंवा तिच्या भ्रमा प्रमाणे आजही तो आपलाही भ्रमच आहे आणि आजही त्यातच जगत आहोत मात्र आईने त्यावेळी तू मोठा झालास की कळेल अस उत्तर त्यावेळी तिने दिले होत,,, आणि कार्टून पाहताना आज सहज लक्षात आलं *साधा गरीब काबाडकष्ट करत जगणारा अलीबाबा देखील चोरच होता त्याला गुहेतील प्रकार कळला आणि त्याने संधीच सोन केलं* त्याच्या मनात जर चोर नसता तर त्याने हा सगळा प्रकार राजाला जाऊन सांगितल