Skip to main content

Posts

Showing posts from December 11, 2011

सिनेमा डर्टी नको चांगला हवा,,

आज दोन बातम्यांनी मला अस्वस्थ केल  कुठे चाललो आहोत आपण? सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली डर्टी सिनेमात घातलेली विद्याची साडी ९० हजाराला विकली गेली ,,,आणि दुसरी बातमी ,, दुपारी बातम्या लावल्या आणि नागपुरातील आमदार डर्टी सिनेमा पाहायला कसे गेले, मग मिडीयावाले कसे आले मग त्यांच्या पासून लपण्यासाठी त्या आमदारांना काय काय उद्योग करावे लागले... ते रसभरीत वर्णन आणि त्या आमदारांचे मीडियापासून लपवलेले चेहेरे केविलवाणे दिसत होते. माझ्या लहानपणी कधी कधी ऐकायला मिळायचे कि अमुक हिरोचे कपडे,चप्पल,बुट किंवा काही हिरोईंस ची अंतर वस्त्र हि लीलावत विकली गेली पण हे सार तिकडे विदेशात घडत असे आणि मला त्यातलं विशेष काही कळत नसे पण हे लोन आता आपल्या कडे हि? माझा एक मित्र हि तो डर्टी सिनेमा पाहून आला. तसे त्याने एफबी वर टाकले हि होते त्याला डझनावारी कॉमेंटहि आल्या . मी काही अजून पहिला नाही पण ,,, चित्रपटाची कथा सांगायला लागू नये ईतकी सर्वांना परिचित आहे, त्यामुळे मी त्यावर काय बोलाव ? नावातच काही आहे, तरीही आपण तो सिनेमा पाहावा आणि त्यासाठी ईतका आटापिटा ? असो, वृत्तपत्रातील परीक्षण सांगते , सिनेमा ३

दिल्ली ,नादीरशहा आणि कुत्रा-१

गेल्यावर्षी पानिपतच्या २५० वर्षांच्या निमित्ताने तिथे गेलो होतो, मग फिरता फिरता दिल्लीला पोहचलो तिथे फतेपुरी येथील धर्मशाळेत राहिलो होतो . तिथल्या मालकांशी मग बोलता बोलता चांगली ओळख झाली दिल्लीच्या अनेक ओळखी सांगितल्या त्यापैकी हि एक ,,, नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केल्यावर ३ दिवस दिल्ली लुटली जात होती , जे मिळेल ते हडप केल जात होत पण अनुभवी आणि वयोवृध्द सल्लागाराने नादिरशहाला विनंती केली आता महाराज आता काही राजपाटच्या गोष्टी करा,,,, त्यावेळी नादिरशहाने जे उत्तर दिले ते असे ,,, "हम यहाँ राजपाट के लिये नाही लुट-पाट के लिये आये हैं" ते मालक म्हणाले हि आमच्या दिल्लीची ओळख ? सुनील ईथे येणारा कुणी नादिरशहा असो वा आजचा राजकारणी त्यांचा धंदा एकच लुट-पाट,,,,,,,,,,,,,,,? हो पण लक्षात ठेव हि दिल्ली दिसते तशी नाही बर, वाऱ्याबरोबर पलटी मारन हे राजकारणी तिच्याकडूनच शिकले आहेत, एक गम्मत-किस्सा सांगतो, पुढे म्हणाले,, दिल्लीचा एक नवाब होता तो दरबारात असताना त्याच्या शेजारी त्याचा लाडका कुत्राही बसत असे.नावाबाला कुर्निसात करताना लोक त्याच्या कुत्र्यालाही सलाम करत . एक दिवस हा