Skip to main content

Posts

Showing posts from February 17, 2013

स्पेशल २६ --चोर पोलिसांचा खेळ ,

काल परवा पुण्यात होतो तेव्हा स्पेशल २६ पाहण्याचा योग आला अत्यंत सुंदर सिनेमा देशाच्या चार कोपर्यात विखुरलेले चार चोर त्यांची हि कथा , अक्षय कुमार , अनुपम खेर राजेश शर्मा आणि किशोर कदम एकत्र येवून सीबीआय अधिकारी आहोत असे भासवून दिल्लीतील एका मंत्र्याला लुटतात आणि सुरु होतो चोर पोलिसांचा खेळ ,,, अर्थातच घरात सापडलेला सारा काळा पैसा हे सीबीआय अधिकारी लुटून नेतात आणि नेत्यावर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची पाळी येते. अर्थातच हि बातमी खर्या सीबीआय पर्यंत पोहचते आणि सुरु होतो तपास ,,,, "वेनस्डे" सारखा मास्टरपीस सिनेमा देवून स्पेशल २६ ने त्यावर कडी केली आहे वेनस्डे मध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे सदैव दहशतीत वावरणाऱ्या सामान्य माणसाची व्यथा नीरज पांडे ने मानाडली होती. आणि आता हि खर्या घटनेवर आधारित स्पेशल २६ २५ वर्षापूर्वी सीबीआयच्या एका नकली टीमने एका पेढीवर नकली छापा टाकून मोठी लुट मिळवली होती त्यावरच नीरजचा हा सिनेमा आहे यात हि चार जण थेट मंत्र्याच्या बंगल्यात घुसून त्याचे करोडो रुपये लुटून नेतात वर मंत्र्याचा कानाखाली हि जाळ काढतात. आणि आपण गुंतून जातो सिनेमाची पार्श्वभूम