Skip to main content

Posts

Showing posts from October 2, 2016

साधू दगड आणि प्रामाणिकपणा

|| श्री नथुरामाय नमः|| सध्या सर्जिकल स्ट्राईकचा स्ट्रोक असा काही देशवासियांना लागला  आहे की जो तो पाक आणि चीनच्या दिशेने दगड भिरकावू लागला आहे अस नाही की या आधी कधी असे स्ट्राईक झालेच नाहीत  पण मार्केटिंग गुरु त्यावेळी राज्यावर नव्हते इतकंच,, असो त्यासर्व कोच बटाटे गुगलेश्वर गुगलाधींना चरणी,, सहज खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट आठवली,, आट पाट नगरातून एक साधू दुसर्या राज्यात जाण्यासाठी निघालेला असतो दुपारचं रणरणत ऊन नुकतंच सुरु झालेल असत अशातच एक निवांत सावली पाहावी आणि दोन घास खात थोडा आराम करावा असा विचार मनात येतो तोच एक छान झोपडी वजा घर आजूबाजूला छान सारवलेलं दिसल आता इथेच टेकू असा विचार करीत तो साधू त्या जागेत शिरला तसा त्या घरातील मोठी मंडळी आली त्याच स्वागत केलं हातपाय धुवायला पाणी दिल  साधू संत येति घरा,, असा त्यांना छान आंनद झाला मग साधुनेही सर्व आन्हिके उरकून घेतली जेवण वैगेरे झालं,, आता थोडा आराम करू म्हणत तो चक्क झोपला पण थोड्या वेळाने एका मोठ्या कोलाहालाने त्याला जाग आली,, पाहतो तो काय एका बाईला झाडाला बांधलाय आणि सारे गावकरी कुणी शिव्या कुणी शाप कुणी दगड फेकून म