Skip to main content

Posts

Showing posts from April 29, 2018

आपला माणूस अर्थात,,,,, महाभारत स्पर्शाच

आज कालच्या जीवन शैलीत मौज मजेत, मनसोक्त म्हणजे किमान एक दिवस उनाड जगायचे भाग्य आज काल खूप कमी जणांना,,, अगदी नाही म्हणल तरीही चालेल,,, मी ही त्याच टाईम मशीन मधला ,,, तसा मला सिनेमाचा खूप नाद पण मुंबईत जवळपास मी बघतच नाही पण पुण्याला गेलो की आवर्जून मग तो अगदी c ग्रेड असला तरीही पाहतो,,सुदैवाने खूप चांगले सिनेमा पहायला मिळतात असाच खूप दिवसांनी आज बघू उद्या बघू करत हातात स्मार्ट फोन असल्यामुळे *आपला माणूस* पहिला आणि बऱ्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा ‘स्पर्श’ चित्रपट पाहिला होता. नकळत तो आठवला,,, सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं.नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा ‘स्पर्श’ हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे. हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा ‘आपलं माणूस’ हा सिनेमा पाहिला. अप्रतिम नाना

अमर' खन्ना... विनोद खन्ना

'अमर' खन्ना...  देवानंद, अमीरखान देखणे आहेत, धर्मेंद्र दणकट होता पण हा दणकट होताच आणि त्याच्यापेक्षा जास्ती देखणाही होता. ती सिंथॉलची जुनी जाहिरात बघा कधी त्याची, सगळं कसं प्रपोर्शन मधे होतं. मधे त्याचा ऍप्सवर आलेला फोटो बघितला आणि चर्र झालं. एरवी तो आजारी, भिकारी वाटूच शकला नसता कितीही मेकअप केला असता तरी. अतिशय रॉयल वावर असायचा त्याचा. 'आन मिलो सजना'मधे राजेश खन्नाच्या हाती त्याला मार खाताना पाहून मला जाम हसू आलं होतं. त्याच्याएवढं चमत्कृतीपूर्ण आयुष्यं कुणाचं नसेल. बायको गीतांजली आणि दोन मुलं सोडून तो रजनीशकडे पाच वर्ष गेला. मग परत आला. वावरला, टिकला पण हास्यास्पद नव्हता झाला मात्रं. एकट्याच्या जिवावर सिनेमे चालवायची ताकद त्याच्यात होती. 'दयावान' परत आल्यानंतरचा सिनेमा त्याचा. मधे 'इटालियन जॉब'वरून काढलेला 'प्लेअर्स' बघत होतो. मुलगी म्हणाली 'अमर' खन्ना काय भारी दिसतो ना अजून. वृद्धापकाळ आणि आजारपण माणसाला काहीच्या काही करून टाकतं.    कुठलाही विशेष गुण नसलेला तो एक चांगला अभिनेता होता. त्याचे संवाद कानात घुमायचे, तो भन्नाट नाचायचा,

*अक्षय तृतीया*

एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणी जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे ,परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे.तुझी इच्छाअसेल ते माग. माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणी जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणी निघून गेली. काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती ,तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणी दूसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणी कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या . जेव्हा माणूस आला आणी जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ?तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू. त्याचप्रमाने पर

राजा झालेल माकड

||श्री नथुरामाय नमः || भरतपुरच्या जंगलात एकदा चिंतनबैठक झाली आणि हे पारंपरिक गादी चालवणारे राजे हवेत कशाला? गेल्या70 वर्षात जंगलाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे आता इतर जंगलात जशी लोकशाही नांदते तसेच आपण ही इथे निवडणुका घेऊ आणि निवडणूक लढवू असा विचार सगळ्यांनी केला आणि शेवटी बहुमताच्या जोरावर तिथे एक जमातीतील एक वयस्कर माकड राजा झालं,, त्या जंगलात जरी हत्ती घोडे उंट वाघ सिंह गेंडा राहत असले तरी त्या जंगलात माकडांची संख्या जास्त होती त्या जोरावर तो राजा झाला होता आता कुठल्याही समस्या असल्या की जनता त्या नव्या राजांकडे आश्वासक नजरेने जात असे जात असे परंतु त्याच्या कडे समस्या घेऊन गेले की माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असे हळू हळू हा प्रकार जनतेच्या लक्षात येऊ लागला की हा समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि इकडे तिकडे उड्या मारत या जंगलातून त्या जंगलात फक्त फिरत असतो समस्या सोडवत तर नाहीच वर समस्या निर्माण करतो जनता तक्रार करू लागली तसे तो आणि त्याचे साथीदार बोलू लागले बघा,,, *आमच्या प्रयत्नात कुठे कमतरता आहे काय? आम्हला जे येत ते मी करतोच करतो माझ्या प्रयत्नात कुठे कसूर

स्त्रीत्वाच बलिदान देऊन स्त्री मुक्‍ती नको !

सगळया स्त्री मुक्‍तीवाल्या बायकांना सांगा, ``आम्ही सगळया कार्यक्षेत्रात जायला तयार आहोत. पण आमच स्त्रीत्व जपून जाणार आहोत !'' आपल्या स्त्रीत्वाच कुठेही आम्ही बलिदान देणार नाही आणि आम्हाला ते चालणार नाही. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाच रान मोकळं करून दिलं. सावित्रीबाई फुले एवढ्या शिकल्या, पहिल्या शिक्षिका झाल्या; पण डोक्यावरचा पदर कधी बाईचा खाली आला नाही. कपाळावर नवर्‍याच्या नावाची लावलेली चीर नवरा असेपर्यंत कधीही पुसली गेली नाही. दोन वाट्या ज्या जाड्या पोटलीत गुंफलेल्या होत्या, त्या कधी काढून टाकल्या नाहीत. पायातल्या जोडव्यांनी तीला संपूर्ण समाज जोडायला शिकवला. ज्योतीबांनी सांगितले म्हणून त्या शिकल्या, पोरींची शाळा काढली, मुलाला सांभाळलं आणि त्यांच्या खांद्याला खांादा लावून सत्यशोधक समाजाचं कामही केलं. सावित्री नवर्‍याशी एकरूप झाली होती. सावित्रींना आदर्श मानणार्‍या स्त्री मुक्‍तीवाल्यांना हे लक्षात येईल का ? अपर्णा ताई

सैराट झालं जी,,,,,

काल बहुचर्चित **सैराट ** पाहिला आणि एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर,,, ** सुरवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका** आणि एका शब्दात म्हणाल तर,, ** सैराट** बस्स बाकी काही नाही सिनेमा लागायच्या आधीपासून त्याची पद्धतशीर बदनामी मोहीम चालवली गेली ,, आधी वाटलं होत कि सिनेमावालेच स्वतः निगेटिव्ह जाहिरात करत तर नाही ना?? हा त्यांचा प्रसिद्दीचा फंडा तर नाही ना?? त्यातूनही काही जणांना नागराज मंजुळे ची जात दिसली आणि मग सुरु झालं संस्कृती बचवाच काम कसा लहान मुलांना घेऊन हा चित्रपट बनवला आहे कस त्यांना प्रेम (चाळे) करायला लावलं आहे मग अर्थातच सिनेमाच्या मदतीला ब्रिगेडी धावून आले ते ओरडू लागले मनुवादी कसे या सिनेमाला विरोध करत आहेत जातीव्यवस्थेला चपराक वैगेरे,, **तर सांगायचं इतकंच कुणी या चित्रपटाच्या निमित्ताने विरोध करणारे त्यांनी आधी सर्वांनी आधी तो चित्रपट प्रामाणिकपणे पहावा आणि मग आपली मत टाकावीत न पाहताच फक्त ऐकीव माहितीवर विरोध करणारे मग ते ब्रिगेडी असो वा बामन दोघेही एकाच माळेचे,,,*** माझ्या मुलाने एक व्हाटसप स्टेट्स टाकलं होत ते वाचून खूप हसलो होतो त्याने

जादूगार आणि उंदीर शेवटी उंदीर तो उंदिरच

||श्री नथुरामाय नमः || एकदा एक जादूगार बरेच दिवस रस्ता चुकून रानोमाळ रस्ता शोधत फिरत असताना अचानक त्याला चांगली वाट दिसते( अच्छे दिन) आणि त्या मजेत मग तो जंगल सफरीवर निघतो जंगलाचा आनन्द घेत शिळ वाजवत निघतो तोच समोर एक उंदीर दिसतो चला सोबतीला घेऊ आणि मजेत प्रवास करू असा विचार करत तो जादूगार त्या उंदराला विचारतो येतो का सोबत? फिरू मज्जा करू? उंदीर- नको रे बाबा मला भीती वाटते जादूगार-कशाची? मी आहे ना सोबत उंदीर- मांजराची जादूगार- हात्तीच्या थांब मी जादूने तुला मांजर बनवतो मांजर-तरीही तिथेच जादूगार-आता काय? मांजर- अहो तुम्हला काय माहीत जंगली कुत्रा मला फाडून खाईल जादूगार-बर ठीक मी कुत्रा बनवतो कुत्रा- तरीही तिथेच जादूगार- अरे बाबा आता काय झालं? कुत्रा- अहो अस काय करता बाहेर जंगलचा राजा #शिंव्ह आहे तो खाईल ना? (जादूगार मनात-साल्या तुला राजा बनायचं अस सरळ बोल ना? ) जादूगार- ठीक मी तुला #शिंव्ह बनवतो #शिंव्ह- तरीही तिथेच जादूगार-अरे आता काय झालं? #शिंव्ह- अहो तो शिकारी आहे ना गोळी घालेल ना? जादूगार- ???? तू उंदिरच बरा अस म्हणत तो त्याला पुनः उंदीर बनवतो आणि मूर्खाला राजा