Skip to main content

अमर' खन्ना... विनोद खन्ना

'अमर' खन्ना... 

देवानंद, अमीरखान देखणे आहेत, धर्मेंद्र दणकट होता पण हा दणकट होताच आणि त्याच्यापेक्षा जास्ती देखणाही होता. ती सिंथॉलची जुनी जाहिरात बघा कधी त्याची, सगळं कसं प्रपोर्शन मधे होतं. मधे त्याचा ऍप्सवर आलेला फोटो बघितला आणि चर्र झालं. एरवी तो आजारी, भिकारी वाटूच शकला नसता कितीही मेकअप केला असता तरी. अतिशय रॉयल वावर असायचा त्याचा. 'आन मिलो सजना'मधे राजेश खन्नाच्या हाती त्याला मार खाताना पाहून मला जाम हसू आलं होतं. त्याच्याएवढं चमत्कृतीपूर्ण आयुष्यं कुणाचं नसेल. बायको गीतांजली आणि दोन मुलं सोडून तो रजनीशकडे पाच वर्ष गेला. मग परत आला. वावरला, टिकला पण हास्यास्पद नव्हता झाला मात्रं. एकट्याच्या जिवावर सिनेमे चालवायची ताकद त्याच्यात होती. 'दयावान' परत आल्यानंतरचा सिनेमा त्याचा. मधे 'इटालियन जॉब'वरून काढलेला 'प्लेअर्स' बघत होतो. मुलगी म्हणाली 'अमर' खन्ना काय भारी दिसतो ना अजून. वृद्धापकाळ आणि आजारपण माणसाला काहीच्या काही करून टाकतं.   

कुठलाही विशेष गुण नसलेला तो एक चांगला अभिनेता होता. त्याचे संवाद कानात घुमायचे, तो भन्नाट नाचायचा, वेगवेगळे गेटअप असायचे असलं काहीही नव्हतं त्यात म्हणून तो जवळचा वाटत असावा. तो, धरमपा, सनी यांची फाईट समोरच्याला बसली की ती खाणारा उठणार नाही याची खात्री वाटते, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक, मुद्दाम काढलेले ढिशूमचे आवाज याची गरज नाही, तिघांनाही त्यांनी जिम केल्याचे पुरावे अंगावरची कापडं काढून द्यायची गरज नव्हती. समोर अमिताभ आहे म्हणून तो कधी बावरला नाही, नाही म्हणून उगाच ढवळाढवळ करून पडदाभर आपणच दिसायला हवं याचा कधी अट्टाहास केला नाही. उगाच ते कॅरॅक्टर जगला असला अभ्यासपूर्ण आरोप त्याच्यावर कधी झाला नाही, त्यानी जे काही केलं ते प्रामाणिकपणे आणि आव न आणता केलं. वैयक्तिक आयुष्यावर कुणी काय बोललं याला तो उत्तरं देत बसला नाही किंवा दुस-यांच्या बाबतीत नाक खुपसत बसला नाही. तब्बल सत्तेचाळीस मल्टीस्टारर केले त्यानी. फिरोजखान, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ, शशी कपूर ते रणधीरकपूर, त्याला कुणीही वर्ज्य नव्हतं. शबाना, झीनत, विद्या सिन्हा ते मीनाक्षी शेषाद्री पर्यंत हिरोइन्स झाल्या. पडद्यावर त्यानी कुणाला खाऊन टाकलं नाही, कुणाला त्याला खाऊ दिलं नाही.

काही काही रोल त्याच अभिनेत्याचे हे ठरून जातं. गुलजारचे 'मेरे अपने' (पुढे त्याचाच असिस्टंट एन.चंद्रानी त्याचं लेटेस्ट व्हर्जन 'अंकुश' काढला) आणि १९५८ च्या नानावटी केसवर आलेला 'अचानक' (त्याच केसवर ६३ ला 'ये रास्ते है प्यार के' आला होता सुनील दत्त, लीला नायडूचा आणि लेटेस्ट अक्षयचा 'रुस्तम'), अरुणा विकासचा 'शक', 'दयावान'चा शक्ती वेलू, 'इम्तिहान'चा प्रोफेसर, 'मेरा गांव मेरा देश'चा जब्बारसिंह, 'मुकद्दर का सिकंदर'चा विशाल आणि 'अमर अकबर'चा अमर. बाकी त्याची यादी मोठी असेल पण त्याचे हे सिनेमे मला जास्ती आठवतात. 'हाथ की सफाई'साठी त्याला बेस्ट सपोर्टींग ऍक्टरचं फिल्म फेअर मिळालं होतं आणि मग डायरेक्ट लाइफटाईम अचिव्हमेंट ऍवार्ड. बेस्ट ऍक्टर न मिळण्याइतका तो एवढा वाईट नव्हता खरंतर. अर्थात तो कधी यावरून रडगाणी गात बसला नाही. उगाच हिरोईनच्या अंगाअंगाशी करणारा हिरो नव्हता तो. ग्रेसफुल, देखणा, रुबाबदार दिसायचा तो कुठल्याही रोलमधे.

अमजदवर लिहिताना म्हटलं होतं 'इन्कार' एकदा थेटरात जाऊन पहायला हवा. फक्तं 'इन्कार'कशासाठी पण? 'अचानक'मधला तो जंगलातला पाठलाग बघायला हवाय, 'मुकद्दर का सिकंदर' मधला सत्यं कळल्यावर हताश झालेला विशाल बघायला हवाय, 'मेरे अपने'मधला शाम बघायला हवाय आणि 'अमर अकबर' मधला माती उकरून पिस्तूल शोधणारा अमरही बघायला हवाय. आता योग येणं अवघड आहे. सिनेमे येत रहातील, तंत्रज्ञान बदलत राहील, अजून देखणे हिरो येत रहातील, काळ कुणासाठी थांबलाय तसाही. आमचीही गाडी पुढे धावतीयेच. तुम्ही लोक साले असे मधेच उतरून चाललात. कानापर्यंतचे लांब कल्ले, हनुवटीवर खड्डा दिसला की आता तू आठवशील. नसतील तुमचे सिनेमे येत नविन पण टिव्हीवर लागला सिनेमा की तुम्ही दिलेल्या आनंदाची आठवण यायची, कुठेतरी तुम्ही आहात अजून याचा आनंद व्हायचा. आता अँथनीच्या अंगावर वसकन 'विल यू शटप' ओरडणारा अमर दिसला की वाईट वाटेल.

कै.'अमर' खन्ना, देव तुझ्या आत्म्यास नविन अजून देखणं रूप देवो ही सदिच्छा.

जयंत विद्वांस

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल