Skip to main content

आपला माणूस अर्थात,,,,, महाभारत स्पर्शाच

आज कालच्या जीवन शैलीत मौज मजेत, मनसोक्त म्हणजे किमान एक दिवस उनाड जगायचे भाग्य आज काल खूप कमी जणांना,,, अगदी नाही म्हणल तरीही चालेल,,,
मी ही त्याच टाईम मशीन मधला ,,,
तसा मला सिनेमाचा खूप नाद पण मुंबईत जवळपास मी बघतच नाही पण पुण्याला गेलो की आवर्जून मग तो अगदी c ग्रेड असला तरीही पाहतो,,सुदैवाने खूप चांगले सिनेमा पहायला मिळतात
असाच खूप दिवसांनी आज बघू उद्या बघू करत हातात स्मार्ट फोन असल्यामुळे *आपला माणूस* पहिला आणि बऱ्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा ‘स्पर्श’ चित्रपट पाहिला होता.
नकळत तो आठवला,,,
सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं.नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा ‘स्पर्श’ हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे.
हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा ‘आपलं माणूस’ हा सिनेमा पाहिला. अप्रतिम नाना आणि त्याचे खटकेबाज संवाद आणि सुमीत राघवन.ची त्यातून दिसणारी अगतिकता
कुठे तरी आपल्याला सुमित(अपराधी )जाग करण्यात
सुमित राघवन कमालीचा यशस्वी होतो त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता-बोलता विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना,या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतांस? कधीआउटिंगला? बाहेर? जेवायला ?” सुमित गप्प.इथपर्यंत ठीक .पण नंतर नाना सुमितला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?” आणि अंगावर सरसरून काटा उभा राहतो आणि आपल्याला प्रचंड अपराधीपणाची जाणीव नाना करून देतो,,
नाना पुढे विचारतात, “एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे ‘स्पर्श’ करत नाही ही साधी गोष्ट नाही रे”, नाना बोलतो आणि टाईम मशीन मध्ये बसून  सुसाट वेगाला आमंत्रण देणारे आपण खाडकन मुस्कडात मारल्यासारखे आपल्याच स्वप्नरंजनातून जागे होतो
किती साधी गोष्ट?. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. किती बोलतो आपण.?किती एकमेकांची काळजी घेतो.? पण खरंच स्पर्श टाळतो का? आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो? आयुष्यात किती वेळा किती जणांना कसेकसे स्पर्श करतो आपण?
अगदी आपण थोडे वयस्कर झाल्यावर स्वतः नवरा बायको म्हणून एकमेकांना किती स्पर्श करतो ?
*फक्त गृहीतच धरतो,,,,?*
खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक.स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते. लहानशी गोष्ट .’स्पर्श ‘.पण तीचं महाभारत होतं .मग कितीतरी स्पर्श आठवतात आणि आठवत राहतात .पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय?आपलाच स्पर्श पण किती अनोळखी वाटतो? आणि मग असे कितीतरी स्पर्श. उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श . दिवाळीत आंघोळी आधी, पाडव्याला आईने,भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना त्यांच्या तळव्यांचा स्पर्श . तळवे सारखेच पण कुठे आईची माया ,कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला . रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित .ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श ,लग्नात लज्जाहोमाच्या वेळी एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श.
स्पर्श लाजरे असतात ,बुजरेअसतात .मायने ओथंबलेले असतात . कधी कधी धीट तर कधी आक्रमक असतात .पण ते बोलतात .पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो. आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता सुरकुत्या पडलेला वृध्द हात जवळ घेत तिने घेतलेला मऊशार मुका  सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो.
स्पर्श रेशमी असतात. जाडेभरडे असतात. आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात. आज माझी आई सत्तरीच्या पुढे आहे .कधी कधी तीच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टिव्ही पाहतो.ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते “रोड झालांस रे” .ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत कितीतरी देवाण-घेवाण करते.
स्पर्शांना धर्म,जात,देश कसलेच बंधन नसते दसऱ्याला आपट्याची पान अनोळखी व्यक्तीला दिलेली सुद्धा गळाभेट असतेच की . पाश्चात्य संस्कृती मध्ये शेकह्यांड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात.ही परिचयाची ,भेटीची पद्धत. इथेही स्पर्श महत्त्वाचा . का असेल स्पर्श महत्त्वाचा?  मला वाटतं एकवेळ ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतील,,,
*पण स्पर्श फक्त खरं बोलतात खोट नाही बोलू शकत,,* हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं.
मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे. आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ? म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो.
*“शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला?”*
लक्षातच येत नाही आपल्या. हजारो शब्दांचं, शेकडोऔषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं.
*आठवते ना ती मुन्ना भाई mbbs मधील जादू की झप्पी??*
माणसं थकतात म्हणून स्पर्श थकत नाहीत. ती आपली गोष्ट सांगत राहतात .कुठे तरी हात ताटकळतात डोक्यावरून फिरण्यासाठी,कुणाचेतरी तळवे कोमेजून जातात तोंडावरून ,पाठीवरून न फिरल्यामुळे .सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसूसते  नातवांनी ओढून पाहावी म्हणून ,पण वेळ नसतो ना आपल्याकडे. पैसा असतो ,टीव्ही असतो गाड्या घोडे सगळ काही, *पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “जेवलीस का गं ?”*असं विचारण्यासाठी चा वेळ आणि स्पर्श नसतो आपल्याकडे.
वेळ हरवला तरी चालेल पण स्पर्श जपले पाहिजेत हो. कारण,,,
*“शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला ?”* या प्रश्न इतका भेसूर प्रश्न माझ्या वाचनात कधीच आला नाही म्हणून….

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल