Skip to main content

जादूगार आणि उंदीर शेवटी उंदीर तो उंदिरच


||श्री नथुरामाय नमः ||
एकदा एक जादूगार बरेच दिवस रस्ता चुकून रानोमाळ रस्ता शोधत फिरत असताना अचानक त्याला चांगली वाट दिसते( अच्छे दिन) आणि त्या मजेत मग तो जंगल सफरीवर निघतो जंगलाचा आनन्द घेत शिळ वाजवत निघतो तोच समोर एक उंदीर दिसतो चला सोबतीला घेऊ आणि मजेत प्रवास करू असा विचार करत तो जादूगार त्या उंदराला विचारतो येतो का सोबत? फिरू मज्जा करू?
उंदीर- नको रे बाबा मला भीती वाटते
जादूगार-कशाची? मी आहे ना सोबत
उंदीर- मांजराची
जादूगार- हात्तीच्या थांब मी जादूने तुला मांजर बनवतो
मांजर-तरीही तिथेच
जादूगार-आता काय?
मांजर- अहो तुम्हला काय माहीत जंगली कुत्रा मला फाडून खाईल
जादूगार-बर ठीक मी कुत्रा बनवतो
कुत्रा- तरीही तिथेच
जादूगार- अरे बाबा आता काय झालं?
कुत्रा- अहो अस काय करता बाहेर जंगलचा राजा #शिंव्ह आहे तो खाईल ना?
(जादूगार मनात-साल्या तुला राजा बनायचं अस सरळ बोल ना? )
जादूगार- ठीक मी तुला #शिंव्ह बनवतो
#शिंव्ह- तरीही तिथेच
जादूगार-अरे आता काय झालं?
#शिंव्ह- अहो तो शिकारी आहे ना गोळी घालेल ना?
जादूगार- ???? तू उंदिरच बरा अस म्हणत तो त्याला पुनः उंदीर बनवतो आणि मूर्खाला राजा बनवण्यात आपण वेळ वाया घालवला असे स्वतःलाच बोल लावत मार्गस्थ होतो ,,,
पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते,,
*( खर तर जादूगाराने आता त्याला शिकारी बनवलं पाहिजे पण तो त्याची औकात ओळखतो आणि पुन्हा त्याला उंदीर बनवतो 2019)*
तात्पर्य--ज्यात क्षमता आहेत त्याला कुठल्याही
पदाची ताकदीची गरज नसते तो अडून अवलंबून राहत नाही की अमुक एक मिळालं असत तर मी यव केलं असत त्याव केलं असत, मै इट से इट बजाऊंगा,
एक के बदले दस सर लावूनगा ,,
पाकिस्तान को जो भाषा समजती है उसीमे करारा जवाब देना होगा,
जे दोन खासदारांच्या जीवावर स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवत होते त्यांनी युत्या आघाड्या करत
देशव्यापी पक्षाची ताकद मिळवली परन्तु ?*जातीवन्त उंदीर जमात* ह्यांनी किती ही डरकाळ्या फोडल्या तरीहि #शिंव्ह काय होता येत नाही
370 - बहुमत नाही, राम मंदिर-बहुमत नाही,समान नागरी कायदा- बहुमत नाही , विरोधक आडवे येतात काम करून देत नाही त्यासाठी काय तर एक दिवसाच उपोषण ,,बर विरोधी पक्षच अस्तित्वतात नाही, आम्ही 70 वर्षाचा गाळ उपसतोय हे सारं कोन्ग्रेसची पाप आहेत कारणच कारण
*एकंदर काय तर गाढवाने वाघाचं कातडं पांघरले तरी तो वाघ होत नाही तसाच उंदीर #शिंव्ह झाला* तरी तो  उपयोग शून्य
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...