Skip to main content

Posts

Showing posts from August 4, 2013

हट्टी मैत्रीण,,,

मध्यंतरी सर्फची जाहिरात लागत असे कुछ दाग अच्छे होते है ,,, त्याची गोष्ट खूप छान होती बाई त्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाला रागवतात आणि ,,,,,,,,,,? त्या मित्राला वाचण्यासाठी सगळे मित्र खोट बोलतात आज तशाच एका मैत्री साठी आपल्या केसांचाही त्याग करणाऱ्या मुलीची गोष्ट वाचायला मिळाली वास्तविक मुलीना केस खूप प्रिय तरीही,,,, तर, एकुलती एक खूप वर्षांनी झालेली दिव्या,,, घरात सर्वांचीच लाडकी कधी आजी ,कधी आजोबा , आणि बाबांकडूनहि तिचे लाड हट्ट पुरवले जात आई मात्र या सर्व गोष्टीला वैतागली होती सततच्या लाडामुळे मुलगी बिघडणार तर नाही ना ? अशी सतत तिला काळजी वाटत असे म्हणून घरातील प्रत्येकाला सारख्या सूचना देत असे जास्त लाड करून नका उद्या सासरी गेल्यावर आपल्याला हे लाड भारी पडतील,,, पण घरातील सारे त्याकडे दुर्लक्ष करत म्हणत पाहू पुढच पुढे,,, त्यातही तिच्या बाबांना तिच्यावर भारी विश्वास कि माझी मुलगी हट्ट करते परंतु ते फाजील नसतात ,,, आणि एक दिवस मात्र आईच्या मानत असत तसाच घडत दिव्या एका नव्या हट्टाला पेटलेली असते आजचा तिचा हट्ट जगावेगळा होता तिच्या नावाप्रमाणेच दिव्या होता तिला केस कापायचे होते तेही सगळ