Skip to main content

*'मास्तर'*

डॉ.  रोहिणी वळसे पाटील यांची 'मास्तर' नावाची कविता अतिशय सुंदर आहे जी सद्यस्थितीवर प्रकाश टाकते. म्हणून शेअर करावीशी वाटली. .
             
            *'मास्तर'*

मास्तर दमला असाल
            तुम्ही
शतकामागून शतकं
चालतचं राहिलात तुम्ही ...

तुमच्या पायातील वेदना भेगाळून
तिचं आता खिंडार झालयं
तुम्ही पार केल्यात
असंख्य अडाणी वाटा
अन् अज्ञानात पेरीत आलात
ज्ञानाच्या असंख्य लाटा...

तुम्ही मार्क्स शिकविला
तुम्ही ज्ञानोबा शिकविला
तुकाराम, ज्योतीबा आणि
सान्यांचा शामही
मास्तर तुम्ही शिकविलात

ज्योतिबाची ज्योत
सावित्रीच्या हातात देऊन
असंख्य अबलांना
सबलतेचा मार्ग शिकविला

पण मास्तर .....
काळाच्या ओघात
तुम्ही दिसेनासे झालात
तुमच्या काळ्या कोटासहीत......

मास्तर दुनिया बघा कुठे चाललीये
मार्क्सवाद उलटा टांगून
रंगीरंगीबेरंगी माॅल सजलेत
अंधाराला सजवत.....

मनावरची धूळ काढणारी
शामची आई
आता रस्त्यावरचया धुळीलाही घाबरत नाही. ...

मास्तर आईची भाकरी
चूलीतच राहिली हो...
बर्गर पिझ्झात आजची पोरं
पुरती वाहीलीत......

छत्रपतींचा एकनिष्ठ सेवकही
आता झेंडा हातात घेऊन
'सैराट'वर झिंगाट झालाय

काय होणार मास्तर या पिढीचं ?
सांगा या पोरांना
बर्गर पिझ्झा हट
म्हणजे आयुष्यात घट
त्याहून बरा लसणीचा ठेचा
अन् भाकरीची लड

मास्तर तुम्ही या अन सांगा यांना बुद्धीझम, फेमिनिझम
सोशल साइटवर फिरण्यापेक्षा
शिका सोशालिझम.....

मास्तर, माणसं माणसांना विसरत चाललीयेत हो...
हातात जेव्हा पासून आलाय फोन
पडतात झडतात तरी
सावरायला असतात कॅफेझोन

शिकवा त्यांना मास्तर
लवकर उठा लवकर निजा
मोबाईलच्या नाही तर
आयुष्याच्या रेंजसाठी झिजा

मास्तर त्यांना हेही शिकवा
मातीचेच असतात आपले पाय
सुखदुःखासाठी कधीतरी
नातीसुदधा असतात वायफाय

शिकवा त्यांना गुड मॉर्निंग
 व्हॉट्स अॅप वर करण्यापेक्षा
मोहक हसायला शिका
दुःखाच्या आभाळाला
शब्दात टाचायला शिका

मास्तर याल ना परतून? ....
तुमची गरज आहे आजच्या पिढीला
या बेफाम दुनियेला लगाम घालण्यासाठी
मास्तर तुम्ही याल ना?
तुमचा तो काळा कोट
आणि पांढरी टोपी घालून. ..

         (डॉ. रोहिणी वळसे पाटील)

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...