Skip to main content

Posts

Showing posts from July 29, 2018

*भरोसा विश्वास*

 पूर्वी एक शेजारी काका रहात होते त्यांना कुणीच नव्हतं त्यामुळे ते तसे आमच्या घरासोबतच जोडलेले होते माझा तर ते खूप लाड करत साधारण मी दहावीत असताना वारंवार पोट दुखत म्हणत डॉ कडे गेले डॉ ने अल्सर झालाय ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं मग  माझ्याही त्यांच्या सोबत हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या ठरल्या दिवशी ऑपरेशन झालं डॉ साहेब बाहेर आले आणि म्हणाले की अल्सर तर नव्हता पण मुतखडा मोठा होईल अशी शंका आली थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं थोडी अधिक फी द्यावी लागेल आता मी दहावीत पोटातल कळत नव्हतं न पोटा बाहेरच,,, *तरीही कुठे तरी वाटत होतं की डॉ ने कदाचित आपल्याला फसवलं पण बोलणार कुणाला???* *आणि इकडे ते काका तर डॉ ला देव मानून बसले होते* वास्तविक त्यांना ही ते ऑपरेशन नन्तर ही पोटात थोडं थोडं दुखतच होत पण वर्षभरातच त्यांचे एक मित्र त्यांना ही असाच त्रास होऊ लागला काकांनी उत्साहात त्याच डॉ च नाव सुचवलं *की तो एकदम बेस्ट आहे* त्याच्याकडेच जा,,, ते परिचित गेले ऑपरेशन झालं डॉ पुन्हा तेच सांगितलं की थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं अधिकची फी द्या,, हे सगळं काकांना कळल्यावर त्यांना त्यांचा प्रसंग डोळयांसमोरून

आणि तो तिसरा मित्र होता?

#तो तिसरा मित्र होता,,,❓ गुरुकुलातून तीन युवक उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती खास परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात प्रमाणपत्र देण्याचा सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढच्या आयुष्यक्रमणेसाठी गुरुकुलाबाहेर पडले.. संध्याकाळ होत आली होती. आणखी काही क्षणांमध्ये मिट्ट काळोख झाला असता. तिघांना झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. *अचानक पुढे चालणारा युवक थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.* *दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..* *तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला.* *दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का?* कोणत्याही क्षणी अंधार पडेल. आपल्याला मुक्कामाचं गाव गाठायचं आहे