Skip to main content

Posts

Showing posts from April 15, 2012

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे यांनी ज्याकसन चा वध केला. सुरवातीचे शिक्षण इंदूर नंतर संभाजीनगर येथे झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतीकारकाच्या संघटनेचे ते सदस्य झाले. त्यांच्या बरोबर त्याकाळात अण्णा कर्वे तसेच विनायक देशपांडे जे त्याकाळी नाशिक पंचवटीत शिक्षक होतेव पुढे त्यांच्या बरोबर जाक्सन खटल्यात आरोपी देखील होते. एका भारतीयाने एका इंग्रजाच्या गोल्फ च्या बॉल ला हाथ लावला म्हणून त्याला मरेस्तोवर मारण्यात आले,,,, दुसऱ्या एका घटनेत एक युवक कालिका मंदिरा कडून येणाऱ्या रस्त्यात " वंदे मातरम " चा मंत्रघोष करीत होता. म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला लादण्यात आला,,, त्याचे वकील पत्र घेणाऱ्या बाबासाहेब खरे यांच्या घरावर त्यांनी वकील पत्र घेतल्यामुळे जप्ती आणली,,, तर त्यांना वकिली करण्यापासून आजन्म बंदी घातली,,, बाबाराव सावरकरांनी १६ पानी कवितेचे पुस्तक "कवी गोविंद" प्रकाशित केले म्हणून त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली,, ज्याक्सन ची नाशिक ची कारकीर्द हि अशी वा