Skip to main content

Posts

Showing posts from October 27, 2019

आईचा मंत्र, मी आणि भाजपची सत्ता लालसा,,,

परवा नेहमी प्रमाणे fb वरची कुस्ती खेळत होतो तोच तिथे माझे मामा आले आणि म्हणाले *कुणीही आपली सत्ता आपला पक्ष वाढणारच फायदा बघणारच,,,* आणि मला नेमक्या दोन घटना नेमक्या काल आठवल्या,,, एक तर लहानपणी आईने दिलेला मंत्र आणि दुसरा हॉस्पिटल मध्ये असलेला माझा मित्र,,,, लहानपणी लक्ष सार खेळण्याकडे असे आणि मग गडबडीत जेवण खान वैगेरे चालत असे त्यात *आई जे बनवेल ते भारीच असे आणि ते मग भर भर भरायचं तोबरा भरल्या सारख, पण आवडीचं म्हणून तोबारा भरायचा नसतो तो चावता ही येत नाही आणि गिळता ही येत नाही गिळला तर ठसका लागणं उलटी होणं किवा मग हळू हळू पाणी पीत तो घास कसा बसा गिळण,,* *परन्तु असा गिळलेला घास त्याची ना चव घेता येत असे नाही तो अंगी लागत असे* त्यावेळी आईने तो आईने दिलेला मंत्र मी आजही विसरलेलो नाही *आई म्हणायची आवडलं म्हणून तोबारा भरू नकोस हळू हळू तोंड स्वीकारेल इतकंच खा तोंड म्हणजे पोट नाही जे भरून ठेवशील आणि पोटाची ताकद तेव्हडीच आहे जेव्हड तोंड स्विकार करेल या उलट वागशील तर अपचन हे ठरलेलं,,,* आजही तो जेवायचा नियम सगळीकडे लागू होतो आणि त्यामुळे*मी व्यवसाय करतो धंदा करत नाही*,, उग