Skip to main content

Posts

विकास,,,,

चक्रव्यूह सिनेमातील एक भाग यातील माओवाद आणि नक्षली हे दोन शब्द वगळून हा सीन पहा आपल्याच विकासाच्या हव्यसा पायी सरकार कुठल्या थराला आपला इप्सित साध्य करत पहा  हे पाहून समजून घेतल्या नन्तर ही केवळ विकास हवा म्हणून मोदींची साथ देणं योग्य आहे विकासाचा भसम्या झालाय आपल्याला फक्त हवंय पण नक्की काय किती कशाला हे मात्र माहिती नाही आणि विचार करायची इच्छा ही नाही बस्स गंधारीने बांधली म्हणून आपण ही डोळ्यावर झापड चढवून घेतली आहेत फक्त हवंय,,,, मग त्यासाठी काहीही करावं लागलं कुठल्याही थराला जावं लागलं तरीही सरदार पटेलांची मूर्ती उत्तम उदाहरण  नर्मदेच्या खोऱ्यातील विस्थिपित केले गेलेल्या लोकांना आधी जागा द्यायला हवी की पटेलांच्या मूर्तीला ? पटेल सुध्दा ह्यासाठी मोदींना शापच देतील पण ऐकणार कोण? सरकारला साम दांम दंड भेद वापरून विकास करायचा आहे आणि आम्हाला तो हवा आहे मग विकासपुरुष आहेतच दंड थोपटून उभे त्या हवंय च्या नादात आम्ही कधी ओरबाडू लागलो आणि त्या राक्षसी लवासाला विकास अस नाव कधी देऊन बसलो ते अजूनही आम्हला कळलं नाही

त्या दिवशी खर्या अर्थाने मदर्स डे साजरा होईल

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात ... राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन. म...ुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू...

रंग,,,

निवडणुकीची रणधुमाळी tv वर आणि बाहेरही चालू होती,,, एकंदरीत सर्वच प्रचार प्रसार माध्यमांनी मोदींना झुकत माप दिल होत,,, आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे नातू महाराज हातात पेन्सिल घेऊन चित्र रेखाटत होते हातात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे नाचवणारे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांच्या झेंड्यांचे रंग त्याला जस जमेल तस तो रंगवत होता आणि नेमका माझं लक्ष नसताना tv त गुंग होतो बातम्या ऐकत त्याने अचानक त्याने प्रश्न केला दादा या दोघांना कुठला रंग देऊ?? आणि माझ्या तंद्रीतुन बाहेर आलो,, म्हंटल कुणाला रे बघू,, म्हणत त्याच चित्र हाती घेतलं तर त्याने अगदी बरेचसे योग्य रित्या कार्यकर्ते त्यांचे पक्ष त्यांचे झेंडे अगदी साजेसे रंग त्यात भरले होते,, त्यात कम्युनिस्ट ते वंचीत त्यांचे हिरवे निळे लाल,,, काँग्रेसचा तुटलेलता पंजात धरलेला तिरंगी ,,तिरंगी शाल अंगावर पांघरले सोनिया राहुल ,, बेरकी पवार त्यांच्या निधर्मी रंगात घड्याळाची  टिकटिक हिकमतीने थांबवलेला तिरंगी झेंडा, सारे हिंदुत्व मानणारे त्यांना साजेसं भगवे रंग,, असे सारे मुक्तहस्ते रंग भरूनही त्याला या दोन नेते कुठल्या रंगात रंगवायचे ते कळत नव्ह...

लिंबाराम,,,,

https://youtu.be/ii2Ru3JOH2A लिंबाराम आज हे किती जणांना माहिती असेल , आठवत असेल कुणास ठाऊक???? परंतु तीन वेळा भारताचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये फडकवणारा,, लिंबाराम ज्याच्या चपळतेने डोळ्याचे पारणे फिटत होते तो ,,,लिंबाराम तो लिंबाराम आज स्वतः मात्र असहाय, अपंग, अवस्थेत धपडतोय,, भारतीय धनुर्विध्या चमुचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आज मात्र दोन शब्द बोलण्याच्या ही अवस्थेत नाही, आज त्याची दृष्टीच बाधित झालीय नीट चालू ही शकत नाही, श्रेष्ठ धनुर्विद्या वीर प्रशिक्षक लिंबाराम ची ही आजची अवस्था *दिल्लीच्या एम्स इस्पितळात जनरल वार्डात आज त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे* 46 व्या वर्षी आलेल्या स्नायू विकाराने चपळ लिंबाराम अकाली म्हातारा झालाय धनुष्याच्या प्रत्येक टनत्काराने धनुष्याला कंपन आणणार्या हातालाच आज कम्प सूटलाय,, तो कुणालाही ओळखू शकत नाही 2013 मध्ये या आजाराने पहिले आक्रमण केले ते त्याच्या नेमके त्याच्या डोळ्यावरच,,, आणि काही दिवसातच हे दुखणे पायापर्यंत पोहचले हालचालच थांबली, लिंबाराम ला आज आर्थिक मदतीसाठी याचना करावी लागत आहे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मदत केली ...

अलीबाब देखील चोरच होता- ,,फक्त,,,,

गोष्टीच नाव वाचून थोडं आश्चर्य जरूर वाटेल पण आपण सारेच त्या भ्रमाला मान्यता देणारे आहोत गेली अनेक वर्षोनुवर्षे आपण हेच मानत आलो आहोत की अलीबाबा आपलं जीवन काबाडकष्ट करत प्रामाणिकपणे जगत होता त्यासाठीच ही गोष्ट आज सक्काळी सक्काळी नातू महाराज उठले आणि कार्टून लावून बसले वृत्तपत्र वाचता वाचता मग मी ही चोरट्या धावत्या नजरेने कार्टून पाहू लागलो तस मला ही ते बघायला आवडतच आणि त्यात नेमकी अलीबाबा चाळीस चोरांची गोष्ट *(चोर तर अलीबाबा देखील होता)* लागली होती,,,, ती पाहता पाहता हीच गोष्ट जेव्हा मी माझ्या आई कडून ऐकली होती तेव्हा आईला मी एक दोन प्रश्न विचारले होते,,,,,अलीबाबा बाबत,, अर्थातच आईला तो कदाचित उत्तर माहिती नसेल किंवा तिच्या भ्रमा प्रमाणे आजही तो आपलाही भ्रमच आहे आणि आजही त्यातच जगत आहोत मात्र आईने त्यावेळी तू मोठा झालास की कळेल अस उत्तर त्यावेळी तिने दिले होत,,, आणि कार्टून पाहताना आज सहज लक्षात आलं *साधा गरीब काबाडकष्ट करत जगणारा अलीबाबा देखील चोरच होता त्याला गुहेतील प्रकार कळला आणि त्याने संधीच सोन केलं* त्याच्या मनात जर चोर नसता तर त्याने हा सगळा प्रकार राजाला जाऊन सांगितल...

आई, लिंबूमिर्ची आणि हिंदुत्व

काल सहजच थोडा सक्काळी निवांत चहा पीत बसलो होतो नातवाने कार्टून लावलं होत ते पहात होतो एक लहान मुलं आईला विचारत होत मा क्या भगवान से डरणा चाहीये,,,आई, नही बेटा अपने गलीतीयोसे सिखोगे तो भगवान से डरने की कोई आवश्यकता नही,, *अगर निडर बनाना है तो गलतीयोसे डरणा भगवान तो तुम्हरा भला ही चाहते है*,,,,,  तोच दारात एक लिंबू मिर्ची वाला आला, साब लगावू क्या,,, मी मानेनेच नकार देत त्याला पिटाळले,,,  आणि अयोध्येतील प्रसंग आठवला,,,  (उद्धव साहेबांनी आवाज दिल्यावर ) मी अयोध्येत गेलो होतो तेव्हाचा प्रसंग डोळयांसमोर आला अयोध्येचा कार्यक्रम आटोपून मी एका रिक्षात बसून निघालो थोडं दूर जातो नाही तोच सिग्नलवर एक लिंबूमिर्ची वाला आडवा आला तस त्या रिक्षा वाल्याने ती लिंबूमिर्ची घेतली,,लगेचच एक काली मातेचं रूप घेतलेली एक स्त्री अशी लालेलाल जीभ बाहेर नाचवत ती आडवी आली तस झटकन त्याने तिला पिटाळून लावली,, मला आश्चर्य वाटून त्याला मी विचारलं,, कारे बाबा जी भूत खेत दिसत नाहीत जी वाईट नजर दिसत नाही त्यासाठी तू लगेच लिंबूमिर्ची घेतलीस पण जी देवी स्वतः भुतांना मारू शकते तिला मात्र तू पिटाळून लावलस?...

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*

पूर्वी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती सागर नद्या, आकाश त्याचप्रमाणे माणसाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसत असे त्यामुळे तेव्हा tv मोबाईल इंटरनेट च जाळ नसल्यामुळे मुलांना खेळ लगोरी कबड्डी पतंग सूर पारंब्या असे मैदानी खेळ खेळले जात आकाश निरभ्र असल्या मुळे रात्री हमखास आम्ही शहरात असल्यामुळे गच्चीवर झोपत असू मग आपसूकच टक्क उघड्या डोळ्यांनी जितकं आभाळ डोळ्यात सामावून घेता येईल तितकं सामावून घेत झोपी जात असू पण या दरम्यान बरेचदा संध्याकाळी घरी हंस पक्षांचा थवा उडत जाताना दिसे,,, मी बरेचदा टक लावून पहात बसत असे ते इंग्रजी *V* आकारात उडत असत मला नेहमी असा प्रश्न पडे की हे असेच का उडतात? मागच्याला पुढे जावस वाटत नाही का? की पुढचा मागच्याना उडुच देत नाही? बर ते मान्य केलं तरी मग मधले काय करतात? ते का जोर लावून पुढच्याला ढकलत किंवा बाजूला होत स्वतः उडत??? आता *त्यावेळी आमचा गुगल म्हणजे आमची आजी* तिच्याशिवाय कोण उत्तर देणार??? मग आजी उत्तर देत असे अरे बाळा तू शाळेत जातोस की नाही ते तुझ्या पुस्तकात विमान पाहिलस की नाही? ते असच इंग्रजी *V* आकारासारखं असत मानवाला निसर्ग सारखा शिकवत असतो इंग्रजी *V...

जपान सारखे देश पुढे का आहेत

|| श्री नथुरामाय नमः || जपान सारखे देश पुढे का आहेत,,,, खेळाडूच पण दोन देश वेगवेगळे,, एक देश अजूनही 21 व्या शतकात जायच्या बाता मारतो आणि दुसरा देश 21 व्या शतकाच्याही कित्येक मैल पुढे आहे कारण त्यांना त्यांच्या देशाप्रती असलेला धर्म बजावणे म्हणजे येताजाता क्रिकेट खेळणे त्यावर बंदी घालणे शत्रूचा समाचार क्रिकेटच्या ब्याट घेणे मग भले ते आमच्या सारहद्दीत घुसून आमच्या जवांनांची शिरकमल कापून नेतील पण आम्ही खंबीर आहोत अरे क्रिकेट खेळायला तर बघा कशी बंदी घालतो अरे क्रिकेट खेळायला तर या नाही तुम्हाला हरवलं आणि ते हि शुक्रवारी तर तर तर ,, बस तर आणि तर जसा राजा तशीच प्रजा खर तर जशी प्रजा तसा राजा हवं का?? हे म्हणजे कोंबडी आधी कि अंड आधी असच झालं,,, असो,, जागतिक स्तरावर तुमचे कितीही मोठे नाव असो नियम म्हणजे नियम संघाची शिस्त मोडली तर शिक्षा हि मिळणारच,, *मोमोता* बेडमिंटन रेंकिंग मध्ये आजच्या घडीला दुसर्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू,,, ज्याने गेल्या ऑगस्ट मध्ये वर्ल्ड च्याम्पियनशिपमध्ये ब्राँझ पदक मिळवले होते जपानचे हे वर्ल्ड च्याम्पियनशिप मधील पहिलेच पदक त्याम...

तुलसीदास राम-बाकी 2

तुलसीदासांना ........ एकदा एका भक्तांने विचारले की "महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता..तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का?".... . तुलसीदास म्हणाले "हो" . भक्त:- मला पण दर्शन घडवाल का?... . तुलसीदास:- "हो नक्की" . तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं...जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेलं... . . तुलसीदास म्हणाले "अरे हे खुप सोप्प आहे अरे तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. ". अरे प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल... . त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक सांगतो.....त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल... . भक्त:-"कोणते सुत्र?" . तुलसीदास:- "||नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण|| ||तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम||" . . 👆वरील सुत्राप्रमाणे... आता कोणाचेही नांव घ्या... . त्याची अक्षरे माेजा... . १)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.. २)त्यात (पंच तत्व मिलन) ५ मिळवा.... ३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.. ४)आलेल्या सं...

बलिदान मास आणि विस्टन चर्चिल

गुरुजींच्या संपर्कात आलो आणि मग गुरुजींनी सांगितलेल्या वाटेवर बिनबोभाट चालायचं इतकंच माहिती त्यांच्या सांगितलेल्या गेलेल्या शिकवणुकीत बलिदान मास देखील येतो आणि मी तो कसोशीने पाळतो,,,काल पासून अनेकांनी मुंडन केलेले फोटो fb वर टाकलेत, कुणी गोड वर्ज्य ,,यर कुणी अनवाणी महिनाभर,,कुणी कुणी आपण कसा बलिदान मास करणार वैगेरे  वैगेरे टाकलं आहे. आता दोन गोष्टी आहेत,,,, साधारण 3/4 वर्षापूर्वी एका परिचित आमच्या जोशी बाईकडे गेलो होतो कामा निमित्त,, गप्पा टप्पा चालल्या होत्या बाई म्हणाल्या बस चहा ठेवते मी म्हंटल नको नको मी चहा घेत नाही बर मग कालच गावाहून कडकडे (लाडू) मी त्याला ही नकोच म्हंटल , सध्या गोड खात नाही मी मी अत्यन्त गोडघाशा हे माहीत असल्या मुळे आश्चर्याने त्यांनी विचारलं का रे काय झालं??? मग मी सांगितलं की आमचा बलिदान मास चालू आहे ना मग मी एकच वेळ जेवतो आणि काहीही गोड खात नाही,, मग ते का कशासाठी कुणासाठी कुणीसांगितलं वैगेरे वैगेरे सांगितलं आधी वाटलं की हे ऐकून त्यांना बर वाटेल पण त्या रागावल्या छे छे असलं काही करून काही उपयोग आहे का ? उगाच नको ते उद्योग अरे दिवसभर तुझं एक तर...

आज त्या निलकंठाचा उत्सव आहे,,,,

आज महाशिवरात्री आहे सोमवारी आल्यामुळे त्याच महत्व अधिक, भगवान शिव म्हणजे स्मशान जोगी, स्मशान म्हणजे सर्व काही संपले पण तिथली देवता म्हणजे शिव,, आणि शिव म्हणजे कल्याण करणारी देवता चांगलं करणारी देवता, आपल्या कडे यज्ञ करायची त्याला आहुती द्यायची परंपरा आहे या यज्ञात चांगल्याच वस्तू अर्पण करायच्या असतात चांगली वस्तू जाळली की त्याच होत #*भस्म* भस्म हे पवित्र असते, हेच भस्म शिवाला देखील प्रिय असते, या सृष्टीत जे जे काही जळणार त्याची #*राख* होते, म्हणून आपले जीवन कार्य समाजातील वागणूक, नातेसंबंध, सामाजिक बंधिकली, जपत त्यानुसार सगळ्यांना आनन्द देत जीवन जगणं ही खरी #*शिवोपासना* त्यामुळे ह्या शरीराचे काम झाले की ते देखील अग्नीला अर्पण करायचे असते त्याचे होते ते #*भस्म* पण आपण समाजात वावरतोच असे की त्याची #*राख* होते मृत्यूचा ही उत्सव साजरा करणारी आपली परंपरा तेव्हा आपण ठरवायचं की आपली #*राख झाली पाहिजे की भस्म* त्यामुळे संसारात राहून वैराग्य म्हणजे काय ते भगवान शिवां कडून शिकावं प्रत्यक्ष ज्यांचं राहायचं स्थान कैलास ते सार त्यागून रमतात कुठे तर स्मशानात वैराग्य म्हणजे दारिद्र्यात रा...

बघतोस काय मुजरा कर😂🤣😂🤣

*बघतोस काय मुजरा कर❓* खरं तर युट्युबवर तो *पोवाडा नामक गाण ऐकलं* तेव्हाच तार सटकली होती पण तरीही,, जितेंद्र जोशी माझा आवडता हिरो त्यातही एक अमराठी मराठी लोकांना त्यांच्या दुर्गसम्पत्तीच जतन केले तर तर महाराष्ट्राच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो आणि त्यातूनच आपली *दुर्गवैभव* कस वाचवता येईल त्यातूनचं आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यातही महाराज आणखी घराघरात नव्हे तर प्रत्येकाच्या काळजात जातील,, हे सांगण्यासाठी एक अमराठी पुढे येतो हेच खूप कौतुकास्पद होत माझ्यासाठी,,, पण *सिनेमाची सुरवात आणि शेवट* एव्हड्या दोनच गोष्टी परिणामकारक आहेत बाकी,,, *हे राम* या सिनेमात एक छान मुद्दा घेतला आहे तो म्हणजे *शिवस्मारकाचा* कि 1600 कोटी त्या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते या गडकिल्यांवर खर्च करा हे *गडकोट म्हणजे महाराजांचं स्मारक* मग असला *टुकार* सिनेमा कढण्यापेक्षा प्रथम त्यांनीच त्या *सिनेमाला आलेला खर्च आणि महाराजांच्या नावावर केलेली लंडन वारी टाळली असती तर निदान माझ्या मते निदान एक गडाच तरी नक्कीच संवर्धन झालं असत,,* हो टुकारच,,,,कारण,, गावरान भाषा आणि गावातील लोक दाखवताना केवळ ...

धप्पा- अकलेचे कांदे

आपल्याकडे *अकलेच्या कांद्याची* कमतरता नाही विशेषतः मराठी भाषिकांमध्ये तर नाहीच नाही 2/3दिवस पुण्यात होतो ठिकठिकाणी *#धप्पा* या सिनेमाचे कुतूहल वाटावे असे पोस्टर्स लागले होते ते पाहून मला ही वाटलं होत की कदाचित विसर्जन करताना गणरायाची कशी विटंबना होते किंवा dj चा त्रास कसा होतो , वर्गणी वैगेरे,,, रोजच्याच तक्रारीवर आधारित सिनेमा लहान मुलांना हाताशी धरत मोठ्यांची कानउघडणी करत असतील असा प्रयत्न सिनेदीगदर्शकाला करायचा असेल,,,, पण आज वृत्तपत्रात त्याची थोडी माहिती आली,,, सोसायटीत होणार गणेशोत्सव आणि त्यात बसवले जाणार नाटक यावरून बाहेरचे *#गुंड*   वैगेरे कसे धमकावत आणि ते *#गुंड आणि सोसायटीत लोक* आल्यावर नरमाईची भूमिका मग कसे या *# गुंडांना* शरण वैगेरे जातात , आणि सोसायटीची अगतिकता हीच कशी देशाची अगतिकता वैगेरे वैगेरे *#अगदी सांस्कृतिक दहशतवाद* आणि हा दहशतवाद देशाला हिंदू धर्माला किती कसा घातक वैगेरे याची भाषण तिरकस संवाद ,,,,, अरे काय चाललय काय,,? गणेशोत्सवात येशू ख्रिस्त दाखवण्यासाठी इतका अट्टाहास का? येशू दाखवला नाही तर आमच्या मुलांना वृक्षवल्लीचा संदेशच समजणार नाही का...

ये अवगुनिया चार बडे सरताज हो गये,,

*चार कौवे चार होए* पं. भवानी प्रसाद मिश्र यांची ही कविता आजच्या काळात अगदी फिट बसते *कवी हे द्रष्टे असतात जो न देखे रवी वो देखे कवी* हे उगाच नाही *आज प्रजासत्ताक खरच आहे का❓* खरोखर हा देश प्रजेच्या मर्जी वर चालतोय कि ,,,,, हा प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतो,, *चार कौवे,,,,* *बहुत नही सिर्फ चार कौवे थे काले* *उन्होने ये तय कि सारे उडनेवाले* *उनके ढंग से उडे रुके खाये और गाये* *वो जीसको त्योहार कहे सब उसे मनाये,,* *कभी कभी जादू हो जाता है दुनिया मे* *दुनियाभर के गुण दिखाई देते है अवगुनिया मे* *ये अवगुनिया चार बडे सरताज हो गये* *इनके नौकर चिल गरुड और बाज हो गये* हंस मोर चातक गौरेये किसी गीनती मे हाथ बांधकर खडे हो गये सब विनती मे हुक्म हुवा चातक पंछि रट ना लगाये पिऊ पिऊ को छोड कौवे कौवे गाये बिस तरह कि काम छोड दिये गौरयो को खाना पिना मौज उडाणा छुट भैयो को *कौवो कि ऐसी बन आयी पांचो घी मे* *बडे बडे मनसुबे आये उनके जी मे* *उडणे तक के नियम बदल कर ऐसें ढाले* *उडणे वाले सिर्फ गये बैठे ठाले* आगे क्या हुवा सुनांना बहुत कठीण है ये दिन कवी का नही चार कौवो का दिन ह...

संक्रांत साजरी करताना,,,,

आजची संक्रांत साजरी करायचीच असेल (किंवा करताना )तर तिळगुळ ऐवजी जमल्यास बंदुकीच्या गोळ्या वाटा, गोड बोला गोड वागा पण ठकासी असावे ठक,,,, हा मन्त्र विसरू नका काही बोलयचंच असेल हरहर महादेवाचा जय घोष समोरच्यात आणि तुमच्याही नसानसात भिनू द्या , संक्रांत आहे ही हे लक्षात ठेवा कधीतरी पूर्वपुण्याइवर का होईना पण पूर्वजांच रक्त तुमच्या धमन्यात वाहतय हे लक्षात ठेवून संक्रमण करण्याचा निदान विचार तरी मनात आणा त्यानिमिताने कधी तरी शत्रूवर तुटून पडायची इच्छा निर्माण होईल, हो पण हे सार वाचायला कदाचित खूप आवडेल ही परंतु हे पक्के लक्षात ठेवा एक त्रिकालाभादित सत्य *क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे* या साठी तुम्हालाच तुमचं शरीर हे पिळदार बनवावं लागेल,,, रोजच्या रोज कसून व्यायाम करावा लागेल,,, अनेक शस्त्रकला आहेत कुठल का होईना पण शस्त्र चालवता यायला हवं,,,, अनेक युद्धकला आहेत कुठली तरी एक कला अवगत करावीच लागेल,,,,, सैनिकी बाणा अंगात भिनवावा लागेल,,, शमीच्या वृक्षावर ठेवलेली शस्त्र खाली उतरवावी लागतील,,, हे लक्षात घेतलत तरच कधी तरी *आपल्या पूर्वजांसारखा संक्रांतीला दसरा साजरा करू शकाल* *हिंदूं...

*हा देश संकल्प जगणाऱ्यांचा आहे*

 आजकाल हॅपी न्यू इयरच्या नावावर संकल्प सोडायचा ,धरायचा की करायचा (ट्रेंड) सुरू झालाय संकल्प हे जगायचे पाळायचे असतात ते सोडायचे किंवा धरायचे नसतात ते प्रणापलीकडे जपायचे असतात या भरत भूमीला हिंदुस्तानला संकल्प करण्यासाठी दिवस कधी पासून लागू लागलें?? हिंदू धर्म (कर्म) मुळात कर्माला प्राधान्य देणारा, त्याला जागण्यास प्रवृत्त करणारा, कर्माच पालन हाच तुझा धर्म सांगणारी ही संस्कृती मग ते कर्माच पालन तुमचं तुमच्या आई वडील मुलं बायको बहीण, भाऊ सारे सोयरे, समाजाप्रती,,देशाप्रति,, तुमचं जे जे काही कर्तव्य आहे ते पालन करण्यास जीवाची ही बाजी लावण्यास पुढे मागे पाहू नका हे सांगणारी ही धर्मसंस्कृती याला संकल्प दिवस साजरे करायची पाळी का येऊ लागली?? *केवळ प्रेयसचा हव्यास वाढल्या मुळे* *प्रेयस म्हणजे इंद्रियांना हवेहवेसे वाटणारे आणि श्रेयस म्हणजे आत्म्याला हितावह असणारे* कवी अनिल लिहितात मला आवडते वाट वळणाची, सरघसरणीची, पायफसणीची,,,तेव्हा श्रेयस कशात हे आधी तुम्हला कळावे लागते याच श्रेयसाची हाक राम कृष्णचा आदर्श बाळगणाऱ्या शिव शंभू पितापुत्रांना नन्तर लोकमान्य, सावरकर, सुखदेव राजगुरू भग...

येशू चा जन्म २५ डिसेंबर ला झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची सुरुवात १ जानेवारी ने का होते ?

येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणनेला ( इसवीसन ) सुरुवात झाली असं सांगणारे सांगतात . पण जर येशू चा जन्म २५ डिसेंबर ला झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची सुरुवात १ जानेवारी ने का होते ? एक जानेवारीला काय जीजसच बारसं झालं होतं का ??? सांगणारे शहाणे आणी ते खरं वाटून विश्वास ठेवणारे अतिशहाणे ... त्या दिवशी सकाळ पासूनच माझ्या बर्याच मित्रांचे मेसेज आले , हैप्पी ख्रिसमस , मेरी ख्रिसमस , त्यांच्या निर्बुद्ध पणाची कीव आली ... हिंदू धर्माला संपवण्याचे स्वप्न पाहणार्या परकीय धर्माच्या सणाच्या शुभेच्छा देताना स्वाभिमान कुठे शेण खायला जातो देव जाणे?? ज्या इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम केले अनन्वित अत्याचार केले.. त्यांच्या सणाच्या शुभेच्छा जेव्हा आपण देतो.. तेव्हा इंग्रजांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आजाद, यांसारख्या क्रांतिकारकांच्या आत्म्याला स्वर्गात किती वेदना होत असतील ?? बौद्धिक गुलामगिरीतून अजून आपण मुक्त झालो नाही हेच खरे ... ख्रिश्चन धर्म हा शांतता प्रेमी धर्म आहे ही अजून एक थाप! जगभर ख्रिश्चन धर्म वाढला तो...

जिंकूनही हरलेली ती,,,😔😔😔

ज्या महाभंगांना आपल्या बायकोचे ,मुलीचे, नातेवाईक स्त्रियांचे,किंवा ज्यां मुलींना सेल्फी काढत सतत व्हाट्सआप ,फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो छोटे छोटे स्वतःचेच व्हिडीओ अपलोड करायची सवय आहे त्या सर्वांनी आवर्जून हा लेख वाचवा कालच्या लोकसत्तात चतुरंग पुरवणीत आलेला हा लेख,,, एका विकृत माणसाने एका स्त्रीचा नग्न व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केला *दुर्दैव हे त्या स्त्रीचा चेहरा होता केरळ मधील शोभा साजु चा*,, त्या नन्तर या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता या तीन मुलांच्या आईला सरळ टाकून दिले ती ओरडून ओरडून सांगत राहिली की हा व्हिडीओ माझा नाही पण तिचा आवाज ऐकणार कुणीच नव्हतं,,, एका व्हिडीओ मुळे कुणाचं कुटुंब, कुणाचं आयुष्य, कुणाचं घर उध्वस्त होतंय याचा जराही विचार न करता तो सहा मिनिटांचा व्हिडीओ अनेकांनी जराही विचार न करता फॉरवर्ड केला,, परंतु स्वाभिमानी शोभा या सगळ्यांच्या विरोधात ठाम उभी राहिली हा व्हिडीओ माझा नाही खुशाल शहानिशा करा अस सांगत थेट पोलिसांकडे तिने तक्रार केली, तिथून ती सायबर गुन्ह्या कडे गेली , तब्बल तीन वर्षांनी हा व्हिडीओ तिचा नाही हे सिद्ध झाले परंतु या तीन वर्षात ति...

मुळशी पॅटर्न, आणि विकासाचा भसम्या*

* #मुळशी_पॅटर्न * पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो प्रवीण तरडे ची अप्रतिम कलाकृती आहे .... ही गोष्ट एका जिल्ह्याची नव्हे तर,,, ही गोष्ट आहे बेसुमार वाढलेल्या तुमच्या आमच्या * #हव्यासाची * आहे,,, ही गोष्ट आहे आपल्यामुळेच जन्माला आलेल्या * #बकासुरची * ,,, ही गोष्ट आहे * #विकासाचा_भसम्या * झालेल्या सर्वांची,,, ही गोष्ट आहे केवळ तुमचा आमच्या हव्यासापाई * #वाट्टेल_त्या_थराला * जाणाऱ्या लोकांची,,,, हे असे लोक आहेत ज्यांची वाट चुकवली गेलेली आहे खर तर सगळ्याच सिनेमात चांगल्याचा वाईटावर विजय अशीच गोष्ट असते इथे ती नेमकी नाही इथे ती कायम राहते #*प्लास्टिक* च्या रुपात ,, कारण या जगाचा अंत जरी उद्या झाला तरी #*प्लस्टिक मात्र*  उरणारच आहे हे प्लस्टिक म्हणजे नेमकं काय ते सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाही परंतु ते प्लस्टिक समूळ नष्ट होऊ शकत त्यासाठी आपणच आपला विकासाचा हव्यास सोडून दिला पाहिजे आणि केवळ आपल्या हव्यासा पायी केवळ मला पगार जास्त माझी कमाई जास्त मग दारात एक गाडी तर दुसरी का नको आमच्या हव्यासाला काही मर्यादा राहिल्या नाहीत आणि त्याचाच फायदा घेत बिल्डर ,राजकारणी, आणि...

इमर्जन्सी सीट आणि 2019

काल एका जवळपास रोजच विमानाने फिरणाऱ्या मित्राकडून विमानातील इमर्जन्सी सीट बद्दल माहिती मिळाली ह्या इमर्जन्सी सीट वर फक्त अशाच व्यक्तीला बसवतात जो वेळ आली की इमर्जन्सी सीट शेजारील मार्गातून जेव्हा विमान अडचणीत असेल तेव्हा या संकटकालीन मार्गातून आधी स्वतः न उतरता आधी इतर प्रवाशांना सुखरूप उतरवले त्यासाठी त्याच स्वतःच समान देखील त्या मार्गात प्रवाशांना अडचण होईल म्हणून ठेवू देत नाहीत तात्पर्य;- मोदी साहेब आम्ही देखील 2014 मध्ये देशाच्या या इमर्जन्सी सीटवर तुम्हला बसवलं ते गेली 60 वर्षे काँग्रेस याच सीट वर बसून मुस्लिम लांगुलचालन करत होती,हिंदूंवर अन्याय करत होती, राममंदिर 370 समान नागरी कायदा याला विरोध करत होती आज संपूर्ण देशाची सत्ता तुमच्या हाती सोपवून तुम्ही काय केलं? 15लाखाचा जुमला होता ठीक,, पण देशाबाहेरचा काळा पैसा? तो तर आला नाहीच पण पण सगळे व्यापारी सगळ्या बॅंका लुटून पुन्हा देशाबाहेर सुखरूप निघून गेले??? वर नोटबंदीच्या नावावर सर्वसामान्य माणसाला मी चोर नाही हे सिद्ध करावं लागलं तेव्हा सावधान आता 2019 ला पुन्हा मतदान येतंय पुन्हा तुम्हला या इमर्जन्सी सीटवर बसायला ...