Skip to main content

लिंबाराम,,,,

https://youtu.be/ii2Ru3JOH2A

लिंबाराम आज हे किती जणांना माहिती असेल , आठवत असेल कुणास ठाऊक????
परंतु तीन वेळा भारताचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये फडकवणारा,, लिंबाराम
ज्याच्या चपळतेने डोळ्याचे पारणे फिटत होते तो ,,,लिंबाराम
तो लिंबाराम आज स्वतः मात्र असहाय, अपंग, अवस्थेत धपडतोय,,
भारतीय धनुर्विध्या चमुचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आज मात्र दोन शब्द बोलण्याच्या ही अवस्थेत नाही, आज त्याची दृष्टीच बाधित झालीय
नीट चालू ही शकत नाही,
श्रेष्ठ धनुर्विद्या वीर प्रशिक्षक लिंबाराम ची ही आजची अवस्था
*दिल्लीच्या एम्स इस्पितळात जनरल वार्डात आज त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे*
46 व्या वर्षी आलेल्या स्नायू विकाराने चपळ लिंबाराम अकाली म्हातारा झालाय
धनुष्याच्या प्रत्येक टनत्काराने धनुष्याला कंपन आणणार्या हातालाच आज कम्प सूटलाय,,
तो कुणालाही ओळखू शकत नाही
2013 मध्ये या आजाराने पहिले आक्रमण केले ते त्याच्या नेमके त्याच्या डोळ्यावरच,,,
आणि काही दिवसातच हे दुखणे पायापर्यंत पोहचले
हालचालच थांबली,
लिंबाराम ला आज आर्थिक मदतीसाठी याचना करावी लागत आहे
क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मदत केली देखील पण ती तुटपुंजी ठरली उपचरातच संपली
भारतीय धनुर्विद्या संस्था  आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून सध्या तरी ठोस सहाय्य मिळालेले नाही लिंबाराम अजूनही ठेचकळतो आहेच अजूनही रोगमुक्त झाला नाही मात्र योग्य उपचार झाले झाले तर आजार नियंत्रीत केला जाऊ शकतो हे अजुनही डॉक्टरांना वाटते1991 अर्जुन पुरस्कार
2012 ला पूरस्काराने सन्मानित सुपरस्टार क्रीडापटू आशा गर्तेत फेकला जावा हेच डोकं सुन्न करणार आहे
1992 बीजिंग एशियन कप स्पर्धेतील त्यांची कामगिरी चमकदार होती
2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तो प्रशिक्षक होता
पत्नी जेनी सध्या त्याची काळजी घेतेय
आपल्या गावात क्रीडाप्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह त्याचा संकल्प आज तरी अंधाराने वेढला आहे *मात्र कधी काळी लक्ष्यावर दृष्टी ठेवणार्या धनुर्धराची नजर मात्र शून्यात हरवली आहे*
या आधी ही असे अनेक खेळाडू जे खरोखर देशासाठी खेळले ते जवळ पास संपले आहेत
*पानसिंग तोमर हे त्यापैकी एक नाव,,,,*
*त्याच ही दुर्दैव असच जेव्हा तो विक्रमावर विक्रम करत होता तेव्हा त्याची कुणीही दखल घेत नव्हतं मात्र तो डाकू झाला आणि त्याच नाव रेडिओवर रोज झळकू लागलं ही या देशातील गुणवंत खेळाडुंची उपेक्षा नाही तर काय?*
क्रिकेट सोडून या देशात अजून अनेक खेळ आहेत हे आम्हला कधी कळणार?
*त्यातही क्रिकेट हे कधीच देशासाठी खेळल जात नाही हे ही कधी लक्षात घेणार??*

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...