Skip to main content

बलिदान मास आणि विस्टन चर्चिल

गुरुजींच्या संपर्कात आलो आणि मग गुरुजींनी सांगितलेल्या वाटेवर बिनबोभाट चालायचं इतकंच माहिती त्यांच्या सांगितलेल्या गेलेल्या शिकवणुकीत
बलिदान मास देखील येतो आणि मी तो कसोशीने पाळतो,,,काल पासून अनेकांनी मुंडन केलेले फोटो fb वर टाकलेत, कुणी गोड वर्ज्य ,,यर कुणी अनवाणी महिनाभर,,कुणी कुणी आपण कसा बलिदान मास करणार वैगेरे  वैगेरे टाकलं आहे.
आता दोन गोष्टी आहेत,,,,
साधारण 3/4 वर्षापूर्वी एका परिचित आमच्या जोशी बाईकडे गेलो होतो कामा निमित्त,, गप्पा टप्पा चालल्या होत्या बाई म्हणाल्या बस चहा ठेवते
मी म्हंटल नको नको मी चहा घेत नाही
बर मग कालच गावाहून कडकडे (लाडू) मी त्याला ही नकोच म्हंटल , सध्या गोड खात नाही मी
मी अत्यन्त गोडघाशा हे माहीत असल्या मुळे आश्चर्याने त्यांनी विचारलं का रे काय झालं???
मग मी सांगितलं की आमचा बलिदान मास चालू आहे ना मग मी एकच वेळ जेवतो आणि काहीही गोड खात नाही,,
मग ते का कशासाठी कुणासाठी कुणीसांगितलं वैगेरे वैगेरे सांगितलं
आधी वाटलं की हे ऐकून त्यांना बर वाटेल
पण त्या रागावल्या छे छे असलं काही करून काही उपयोग आहे का ? उगाच नको ते उद्योग अरे दिवसभर तुझं एक तर मेहनतीचं काम कुणी सांगितलं ,,,, मी जास्त हुज्जत घातली नाही कारण त्या माझ्यावरील प्रेमामुळे बोलत होत्या,,
दुसरी गोष्ट निनादराव बेडेकरांनी सांगितलेली आठवण ते एकदा युरोप मध्ये फिरत होते इंग्लडला वैगेरे गेले होते
मारलब्रो म्हणजे विस्टन चर्चिल ज्याने स्वतःच्या ताकदीवर देशाला वाचवलं मी आपलं गमतीने
एव्हडा मोठा माणूस तुमच्या देशातला त्याचे इथे कुठे पुतळे स्मारक वैगेरे काही दिसत नाही रे
आमच्या एकट्या पुण्यात फक्त महाराजांचे 8/10 तरी पुतळे असतील आणि इतका मोठा चर्चिल त्याचा पुतळा नाही???
तर त्या मित्राने दोन तीन वेळा माझ्या या कुत्सित प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं पण मी जेव्हा मुद्दाम पुन्हा विचारल तो चर्चिल आमच्या रक्तात आहे
ते स्मारक पुतळे वैगेरे तुमच्या कडे,,,इतकी मस्त सणसणीत कानाखाली त्याने मारली की मी गप्पच झालो
हे सार ऐकून माझं डोकं फेखील विचार करू लागलं की अरे खोटं काय आहे यात,,
एकीकडे बाबासाहेबांची महाराजांवरची पुस्तकाच्या पुस्तक खपत आहेत
महाराष्ट्रात अनेक लोक शिवचरित्रावर व्याख्यान देत आहेत
गुरुजीं सारखे तर शिवशंभू पितापुत्र हिंदूं रक्त गटाच्या व्हाव्यात म्हणून अव्याहत पणे प्रयत्न करत आहेत
पण तरीही देशासकट महाराष्ट्र् बलात्कारात अव्वल आहे ही अभिमानाची गोष्ट आहे का??
तेव्हा सर्व धारकर्यांना आणि शिवभक्तांना हात जोडून एक नम्र विनंती आहे
फक्त दाढी राखली, कपाळावर चंद्रकोर काढली
हातात तलवारी धरत सेल्फी अपलोड केले
बलिदान मासानिमित्ताने उपवास केले हे असे दाखवण्या पुरते शिवराय नकोत
महाराज तुमच्या दिसण्यात नव्हे तर असण्यात हवेत रक्ताच्या नसानसात हवेत
तेव्हा या बलिदान मासात उपास तपास जरूर करा पण शिवचरित्राची किमान दोन पान वाचा,,,
किमान 5 बैठका 5 सूर्यनमस्कार त्यांनतर रोज एक वाढवत जा किमान रोज 2 किमी धावा
बलिदान मास असाही करून पहा
शिवशंभू पितापुत्रणांना अभिप्रेत धर्माच रक्षण होईल ते याच मार्गाने
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
धारकरी श्री शिवप्रतिष्ठान

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...