Skip to main content

रंग,,,

निवडणुकीची रणधुमाळी tv वर आणि बाहेरही चालू होती,,,
एकंदरीत सर्वच प्रचार प्रसार माध्यमांनी मोदींना झुकत माप दिल होत,,, आणि त्या पार्श्वभूमीवर
आमचे नातू महाराज हातात पेन्सिल घेऊन चित्र रेखाटत होते हातात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे नाचवणारे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांच्या झेंड्यांचे रंग
त्याला जस जमेल तस तो रंगवत होता
आणि नेमका माझं लक्ष नसताना tv त गुंग होतो बातम्या ऐकत त्याने अचानक त्याने प्रश्न केला दादा या दोघांना कुठला रंग देऊ??
आणि माझ्या तंद्रीतुन बाहेर आलो,,
म्हंटल कुणाला रे बघू,, म्हणत त्याच चित्र हाती घेतलं तर त्याने अगदी बरेचसे योग्य रित्या कार्यकर्ते
त्यांचे पक्ष त्यांचे झेंडे अगदी साजेसे रंग त्यात भरले होते,,
त्यात कम्युनिस्ट ते वंचीत त्यांचे हिरवे निळे लाल,,,
काँग्रेसचा तुटलेलता पंजात धरलेला तिरंगी ,,तिरंगी शाल अंगावर पांघरले सोनिया राहुल ,,
बेरकी पवार त्यांच्या निधर्मी रंगात घड्याळाची  टिकटिक हिकमतीने थांबवलेला तिरंगी झेंडा, सारे हिंदुत्व मानणारे त्यांना साजेसं भगवे रंग,,
असे सारे मुक्तहस्ते रंग भरूनही त्याला या दोन नेते कुठल्या रंगात रंगवायचे ते कळत नव्हतं
ते नेते होते मोदी-शहा,,,,,
दादा ह्यांना देखील एकच एक भगवा रंग लावू का बरोबर दिसेल ना? अगदी निरागसतेने त्याने विचारलं,,, मी म्हंटल थांब,,,,
आधी नीट निकाल लागू दे,,
त्यांना सत्तेत येऊ दे,,,
पंतप्रधान पदाची शपथ घेऊ दे,,,
त्या नन्तर त्यांचा रंग कळेल मग त्यांना रंगव,,

शेवटी सरड्या प्रमाणे रंग बद्दलनार्या मोदी शहा जोडगळीचा काय हो भरवसा???
बापझाद्याची जहागितदारी ऊतू चालले पिता पुत्र शहाजी राजे शिवाजी राजे, त्यांच्याच पावला वर पाऊल टाकत ज्वाला भगवी की शम्भू राजांच्या रक्ताचा रंग भगवा असा प्रश्न पडावा,,
मौज मजेच गुलाबी आयुष्य  स्वातंत्र्याच्या वेदी वर झोकून देणारे मग ते मदनलाल असोत सावरकर असोत क्रांती यज्ञाच्या वेदीत भगव्या रंगात कधी मिसळून गेले कळलं नाही असे अनेको,,,
अगदी काल परवा शेवटचा महानेता होऊन गेला ज्याच्या रंगाला पाकिस्तान सकट सारी जगदुनिया सलाम करत होती आज ही करते ते स्व. हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्यांचा रंग कुठला होता हे कुणालाही सांगायची विचारायची कधी गरज पडली नव्हती
एकच एक फक्त भगवा,,,,,
गोकुळातल्या हरीचे रंग त्याच्या केसात खोवलेला मोरपंखीसारखेच,, फुलपाखरू जस फुल जशी माती तोच रंग,,,
काळ्या आईचा रंग अभिमाने मिरवतो तोच शेतकरी,,
पण पिठाच्या गिरणीततील माणूस त्याचा जसा मूळचा रंग ओळखता येत नाही
कारण अंगावर असणाऱ्या अहंमान्यतेच्या, गर्विष्ठपणाच्या पिठाला सत्तेचा माज चिकटलेला असतो मीच काय तो पर्याय ही मस्ती हा फक्त मी पणा नेमका कुठला रंग दाखवते
इथे एक एक वचन सांगावस वाटत,,,
भगवान श्रीकृष्ण म्हणतात,, जिथे मी आहे तिथे मी नाही आणि जिथे मी नाही तिथे मी आहे,

पण माझा हा विचार त्या माझ्या नातवाला कुठला लक्षात येणार,???
मी त्याला सांगितलं
या देखाव्यात दिसणाऱ्या रंगसंगती प्रमाणे तू कुठलाही रंग दे कारण यांचा खरा रंग कुठला ते हे दोघेही विसरलेले आहेत
आणि लोकांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे
ती ही काळ्या रंगाची त्यामळे या दोघांच्या विरोधात कुणीही बोलू नये अशीच इच्छा सगळ्यांची असते
तुम्ही मत मांडलं की तुम्ही पाकिस्तानी ,देशद्रोही, काँग्रेसी,, अशी लेबल्स लावली जातात
त्यामुळे तुम्ही कावळा पोपट चिमणी भारतीय अमेरिकन त्यांच्या त्यांच्या रंगात खुशाल रंगवू शकता पण ह्यांचा रंग सत्तेच्या आकडेवारीवर अवलंबून असतो,, 

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...