Skip to main content

बघतोस काय मुजरा कर😂🤣😂🤣

*बघतोस काय मुजरा कर❓*
खरं तर युट्युबवर तो *पोवाडा नामक गाण ऐकलं* तेव्हाच तार सटकली होती पण तरीही,,
जितेंद्र जोशी माझा आवडता हिरो
त्यातही एक अमराठी मराठी लोकांना
त्यांच्या दुर्गसम्पत्तीच जतन केले तर
तर महाराष्ट्राच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो आणि त्यातूनच
आपली *दुर्गवैभव* कस वाचवता येईल त्यातूनचं आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यातही
महाराज आणखी घराघरात नव्हे तर
प्रत्येकाच्या काळजात जातील,,
हे सांगण्यासाठी एक अमराठी पुढे येतो
हेच खूप कौतुकास्पद होत माझ्यासाठी,,,
पण
*सिनेमाची सुरवात आणि शेवट*
एव्हड्या दोनच गोष्टी परिणामकारक आहेत बाकी,,, *हे राम*
या सिनेमात एक छान मुद्दा घेतला आहे तो म्हणजे *शिवस्मारकाचा*
कि 1600 कोटी त्या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते या गडकिल्यांवर खर्च करा हे *गडकोट म्हणजे महाराजांचं स्मारक*
मग असला *टुकार* सिनेमा कढण्यापेक्षा प्रथम त्यांनीच
त्या *सिनेमाला आलेला खर्च आणि महाराजांच्या नावावर केलेली लंडन वारी टाळली असती तर निदान माझ्या मते निदान एक गडाच तरी नक्कीच संवर्धन झालं असत,,*
हो टुकारच,,,,कारण,,
गावरान भाषा आणि गावातील लोक दाखवताना केवळ भाषेची गम्मत म्हणून
खुद्द हिरो म्हणजे शिवभक्त नानासाहेब जेव्हा *संडासला जायच्या निमित्ताने- मुलगा आधी गेलेला असतो त्याच नाव संभाजी या संभाजी नावाची जी काही मोडतोड हिरो करतो त्याला तोड नाही*
गावरान सिनेमा दाखवतात दाखवता तो शिवराळ कधी होतो
हे पाहून वरून कदाचित *दादा* हि शरमेने मान नक्कीच खाली घालतील यात शंका नाही
त्यातही *६५ किलोची तलवार*
इतिहास हा असा का हे सारे
*सु-शिक्षित लोक* हास्यास्पद करतात देव जाणे❓
आणि तेही आजच्या काळात सारी
*अभ्यासू मंडळी आजूबाजूला असताना❓*
त्यातही हे सारे आधुनिक मावळे
स्वतःला शिवभक्त समजणारे मोबाईल इंटरनेट वापरणारे महाराजांची तलवार आणण्यासाठी
थेट लंडन गठतात 😳❓
कुठलाही प्लान नाही आणि असला  तरीही ते शक्य आहे का❓
फक्त
सुरवातीलाच सांगितल्या प्रमाणे
शेवट जो दाखवला तो खूप चांगला संदेश देतो
हिरो ला स्वप्नात रोज एक स्वार आणि एक जमिनीत खुपसलेली तलवार दिसत असे
सगळा भ्रमनिरास झालेला हताश झालेला हिरो त्या रात्री पुन्हा झोपतो
नेहमी प्रमाणे त्याला ते स्वप्न पडत पण आज मात्र ते पूर्ण स्वप्न असत,,
त्या स्वप्नात त्याला साक्षात्कार होतो
कि जर
*ह्या गडकिल्यांचं जतन आपणच केलं पाहिजे कुठलंहीसरकार ते करणार नाही हे गडकिल्ले हीच आपली भवानी आहे तीच जतन हे आपणच केलं पाहिजे*
असा सुंदर संदेश देत सिनेमा संपतो
आणि चला निदान काही तरी चांगलं पदरात पडलं हे समाधान घेऊन घरी येतो
*ता.क.*
आता पर्यंत शिवशंभू पितापुत्र हे केवळ नफ्याच साधन म्हणून इथल्या राजकारण्यांनी वर्षोनुवर्षे वापरले पण
सिनेमावाले त्या नावाला *हास्यास्पद* बनवू पहात आहेत असच दिसतंय😏😏😏
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...