Skip to main content

संक्रांत साजरी करताना,,,,


आजची संक्रांत साजरी करायचीच असेल (किंवा करताना )तर तिळगुळ ऐवजी जमल्यास बंदुकीच्या गोळ्या वाटा, गोड बोला गोड वागा पण ठकासी असावे ठक,,,, हा मन्त्र विसरू नका
काही बोलयचंच असेल हरहर महादेवाचा जय घोष समोरच्यात आणि तुमच्याही नसानसात भिनू द्या , संक्रांत आहे ही हे लक्षात ठेवा कधीतरी पूर्वपुण्याइवर का होईना पण पूर्वजांच रक्त तुमच्या धमन्यात वाहतय हे लक्षात ठेवून संक्रमण करण्याचा निदान विचार तरी मनात आणा
त्यानिमिताने कधी तरी शत्रूवर तुटून पडायची इच्छा निर्माण होईल,
हो पण हे सार वाचायला कदाचित खूप आवडेल ही
परंतु हे पक्के लक्षात ठेवा एक त्रिकालाभादित सत्य
*क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे*
या साठी तुम्हालाच तुमचं शरीर हे पिळदार बनवावं लागेल,,,
रोजच्या रोज कसून व्यायाम करावा लागेल,,,
अनेक शस्त्रकला आहेत कुठल का होईना पण शस्त्र चालवता यायला हवं,,,,
अनेक युद्धकला आहेत कुठली तरी एक कला अवगत करावीच लागेल,,,,,
सैनिकी बाणा अंगात भिनवावा लागेल,,,
शमीच्या वृक्षावर ठेवलेली शस्त्र खाली उतरवावी लागतील,,,
हे लक्षात घेतलत तरच कधी तरी
*आपल्या पूर्वजांसारखा संक्रांतीला दसरा साजरा करू शकाल*
*हिंदूंनो शेक्सपियरच एक वाक्य कायम लक्षात ठेवा
*,,,घावांना जर जिभा असत्या तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या परंतु मेल्या मनाचे तुम्ही तुमच्या वरील घाव बोलतीलच कसे*?
कारण तुमच्या घावांना जिभा नाहीत आहेत ते फक्त आणि फक्त अश्रू,,,,,
तुमच्या क्रोधाला अंगार नाही आहे ती फक्त क्षमाशीलता (अति ),,,,
*इतरांनी अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे,,, बस्स इतकंच माहिती आहे ,सहन करणं हा जणू काही तुमच्यासाठी सृष्टी नियमच*
*आज अहिंसा आमच्यात इतकी भिनली आहे की
कुत्रा निदान काळ वेळ पाहून आपलं शेपूट आत घालतो परंतु हिंदू??*,,,,
*मुंबई लोकल मधील कुत्र्यासारखा देखील शेपूट हलवत नाही आम्ही कायम आजही निदर्शन आंदोलन निषेध सारखी बोथट झालेली हत्यार वापरतो*
*एखाद्या वांझ बाई सारख ,,,,त्यामुळे आमचा व्यक्त होणारा राग देखील वांझोटाच*
कारण क्रियेवीण वाचाळता ही नसानसात भिनलेली आहे
परंतु फक्त *निवडणुक हरल्यावरच आमचं हिंदुत्व जाग होत*
*फेसबुक व्हाट्स आप वर शिवशंभुचे फोटो डकवले,, पाणीपतावरच्या युद्धकथा जणू काही स्वतःच रचल्या या आवेशात बेंबीच्या देठापासून जय भवानी जय शिवाजी चा नारा दिला की आमची इतिकर्तव्यता संपते*,,,,
आम्ही हे लक्षातच घेत नाही निषेध धरण आंदोलन ह्यांना घाबरणारे हा देश सोडून 1947 सालीच निघून गेलेत पानिपतावरच्या पराभवत हे मुख्य कारण होत की गनिमी काव्या शिवाय सामोरासमोर लढायचं तंत्रच आम्हला अवगतच नव्हतं ,,,
कधीतरी तिळगुळ वाटताना
याच दिवशी मराठे देश रक्षणासाठी हौतात्म्य पत्करून अटकेपार गेले,,,
दिल्लीच तख्त सिंहासन मराठ्यांनी घाणाचे घाव घालून फोडले,,,,,
जरी मराठ्यांचा पराभव झाला तरी त्या पराभवाने शत्रूला इतका घाम फोडला की शेवटी दिल्लीच तख्त मराठ्यांच्या हवाली करत पुन्हा कधीही त्या खैबरखिंडीतून कुणा आक्रमकाने हिंदुस्थानात येण्याचं धाडस केलं नाही,,,,
याची जाण ठेवायची असेल तरच संक्रांत साजरी करा
कुणाशी ,का कधी, किती ,कशासाठी ,
गोड बोलायचे हे एकदा ठरवा
तिळगुळ तोंडात टाकण्या आधी कधी तरी तळपायाची आग मस्तकात जाईल अस बघा
नक्की सांगतो
संक्रांतीलाच विजयाचा दसरा नक्की साजरा होईल

जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
आपणा सर्वांस मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक खुप साऱ्या गोड गोड शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...