Skip to main content

येशू चा जन्म २५ डिसेंबर ला झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची सुरुवात १ जानेवारी ने का होते ?


येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणनेला
( इसवीसन ) सुरुवात झाली असं
सांगणारे सांगतात .
पण जर येशू चा जन्म २५ डिसेंबर ला
झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची
सुरुवात १ जानेवारी ने का होते ?
एक जानेवारीला काय जीजसच
बारसं झालं होतं का ???
सांगणारे शहाणे आणी ते खरं
वाटून विश्वास ठेवणारे अतिशहाणे ...
त्या दिवशी सकाळ पासूनच माझ्या बर्याच
मित्रांचे मेसेज आले , हैप्पी ख्रिसमस ,
मेरी ख्रिसमस , त्यांच्या निर्बुद्ध
पणाची
कीव आली ...
हिंदू धर्माला संपवण्याचे स्वप्न पाहणार्या
परकीय धर्माच्या सणाच्या शुभेच्छा
देताना स्वाभिमान कुठे शेण खायला
जातो देव जाणे??
ज्या इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम केले
अनन्वित अत्याचार केले..
त्यांच्या सणाच्या शुभेच्छा जेव्हा आपण देतो..
तेव्हा इंग्रजांशी लढताना हौतात्म्य
पत्करलेल्या आपल्या भगत सिंग, सुखदेव, राजगुरू,
चंद्रशेखर आजाद, यांसारख्या
क्रांतिकारकांच्या आत्म्याला स्वर्गात
किती वेदना होत असतील ??
बौद्धिक गुलामगिरीतून अजून आपण
मुक्त झालो नाही हेच खरे ...
ख्रिश्चन धर्म हा शांतता प्रेमी धर्म आहे
ही अजून एक थाप! जगभर ख्रिश्चन धर्म
वाढला तो इस्लाम प्रमाणेच तलवारीच्या
जोरावर आणी प्रलोभनांच्या जोरावर!
अमेरिकेतील
गुलामगिरी , चर्च चे अत्त्याचार
प्रसिद्ध आहेत. कसली आलीये
शांतता?
मागे एकदा पोप जोन पॉल दुसरे यांने
त्याच्या एका भाषणात सांगितले होते
की
पहिल्या सहस्त्रकात संपूर्ण युरोप
ख्रिस्तमय केला,
दुसर्या सहस्त्रकात संपूर्ण अमेरिका
ख्रिस्तमय केली ,
आता तिसर्या सहस्त्रकातील आपले लक्ष्य
संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करायचा
आहे , सर्वांनी तयार राहा .
भारतात देखील
धर्मांतराची मोहीम अत्यंत
वेगाने चालू आहे !
ही असली महत्वकांक्षा ख्रिश्चनांची .
आणी आपण त्यांचा सण साजरा करत
बसलोय!!?
सर्व आई बाबा आणी पालक
यांना देखील
विनंती आहे.. की उगाच
आपल्या लहान
मुलांमध्ये सांताक्लॉज ची फाजिल आवड
निर्माण करू नका!! छोट्या छोट्या
गोष्टीमधूनच नुकसान मोठे होते ..
नाताळच्या दिवशी ख्रिश्चनांना काही शुभेच्छा
देण्यापेक्षा मी हिंदूंनाच अशा शुभेच्छा देईन
की ख्रिश्चनांचे धार्मिक आक्रमण
थोपवण्यासाठी
परमेश्वर
सर्वांना सदबुद्धी आणी सामर्थ्य
देवो!!
एकदा वेळ
गेली की ती पुन्हा येत
नाही!
आत्ताच जागे होणे उचित .
हिंदुस्थान सोडताना ब्रिटिश म्हणाले होते की ' आम्ही गेलो तरी आमची संस्कृती जाणार नाही ',किती आत्मा विश्वास होता .हिंदुस्थानची जडण घडण करताना आपल्या तथाकथित नेत्यांचा एव्हढा आतां विश्वास होता का ? त्यांचा आत्मविश्वास होता तो ब्रिटिशांचं राजकारण जसच्या तस कस कास करता येईल याचा . परिणा आज सर्व भारत वर्ष पाहत आहे .

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...