Skip to main content

त्या दिवशी खर्या अर्थाने मदर्स डे साजरा होईल

एका खेडे गावात एक आई
आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये
तरी असावे, पण घरात १० रुपये
नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात
... राबायला गेली संध्याकाळी
मजुरीचे पैसे आणले, तितक्यात
मुलगा शाळेतून आला आई
ला म्हणाला मला जेवायला दे
मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे
आहे सकाळी लवकर उठेन. म...ुलगा सकाळी लवकर
उठला त्या माऊलीला पण
उठवले,
मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई
लवकर न्याहारी तयार ठेव
मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध
चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून
आला आई जवळ बसला आणि आई
ला म्हणाला मला लवकर दुध
आणि भाकरी दे मला उशीर
होतोय आई ने आजू बाजूला पहिले दुध
उतरवायला काहीच सापडत
नव्हते पुन्हा मुलाचा आवाज
आला आई लवकर कर माउलीने
विचार न करता तसाच
दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे
चटके मस्तकाला वेदना देऊ
लागल्या हाताची लाही लाही झाली,
पुन्हा मुलाचा आवाज आला आई
लवकर कर न उशीर होतोय
त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले
आणि मुलाला दिले,
त्या माऊलीच्या डोळ्यातले
अश्रू पाहून त्या मुलाने मान
खाली घालून न्याहरी केली. आई
ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले, मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी
परतला आई ने विचारले
बाळा जत्रेत की की पहिले
मुलाने जत्रेतल्या
गमती जमाती सांगितल्या मग
आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस
कि नाही, त्या मुलाने आई ला सांगितले
की तू डोळे बंद कर
मी काहीतरी आणले आहे
तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद
केले मुलाने खिश्यातून
सांडशी काढून आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात
त्या सांडशीच्या स्पर्शाने अश्रू
आले.. आई धन्य
झाली.....आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर
इजा करून गेली

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...