Skip to main content

जिंकूनही हरलेली ती,,,😔😔😔

ज्या महाभंगांना आपल्या बायकोचे ,मुलीचे, नातेवाईक स्त्रियांचे,किंवा ज्यां मुलींना सेल्फी काढत
सतत व्हाट्सआप ,फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो छोटे छोटे स्वतःचेच व्हिडीओ अपलोड करायची सवय आहे त्या सर्वांनी आवर्जून हा लेख वाचवा
कालच्या लोकसत्तात चतुरंग पुरवणीत आलेला हा लेख,,,
एका विकृत माणसाने एका स्त्रीचा नग्न व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केला
*दुर्दैव हे त्या स्त्रीचा चेहरा होता केरळ मधील शोभा साजु चा*,,
त्या नन्तर या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता या तीन मुलांच्या आईला सरळ टाकून दिले
ती ओरडून ओरडून सांगत राहिली की हा व्हिडीओ माझा नाही पण तिचा आवाज ऐकणार कुणीच नव्हतं,,,
एका व्हिडीओ मुळे कुणाचं कुटुंब, कुणाचं आयुष्य, कुणाचं घर उध्वस्त होतंय याचा जराही विचार न करता तो सहा मिनिटांचा व्हिडीओ अनेकांनी जराही विचार न करता फॉरवर्ड केला,,
परंतु स्वाभिमानी शोभा या सगळ्यांच्या विरोधात ठाम उभी राहिली हा व्हिडीओ माझा नाही खुशाल शहानिशा करा अस सांगत थेट पोलिसांकडे तिने तक्रार केली, तिथून ती सायबर गुन्ह्या कडे गेली ,
तब्बल तीन वर्षांनी हा व्हिडीओ तिचा नाही हे सिद्ध झाले
परंतु या तीन वर्षात तिची मुलं तीच घर नवरा त्या एक व्हिडीओ ने हिरावून घेतलं होत,,,
नवऱ्याच्याच फार्म मधील एका कर्मचाऱ्याने2015 ला हा व्हिडीओ वायरल केला इतकंच हाती आलंय त्याला अटक ही झालीय
पण तो तयार कुणी केला याचा तपास अजूनही सुरूच आहे त्याला शिक्षा व्हायलाच हवी हा शोधाचा निर्धार आहे
आज शोभा एकटी आहे मुलं सुद्धा विरोधात गेलीत
पण तरीही ती लढणार आहे
ज्या कुणी हे अधम कृत्य केले त्याला धडा शिकवायचा आहे
*पण सोशलाधिन आपण सारे यातून काही धडा घेणार की नाही????*

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...