Skip to main content

*हा देश संकल्प जगणाऱ्यांचा आहे*

 आजकाल हॅपी न्यू इयरच्या नावावर संकल्प सोडायचा ,धरायचा की करायचा (ट्रेंड) सुरू झालाय
संकल्प हे जगायचे पाळायचे असतात ते सोडायचे किंवा धरायचे नसतात ते प्रणापलीकडे जपायचे असतात
या भरत भूमीला हिंदुस्तानला संकल्प करण्यासाठी दिवस कधी पासून लागू लागलें??
हिंदू धर्म (कर्म) मुळात कर्माला प्राधान्य देणारा, त्याला जागण्यास प्रवृत्त करणारा, कर्माच पालन हाच तुझा धर्म सांगणारी ही संस्कृती
मग ते कर्माच पालन तुमचं तुमच्या आई वडील मुलं बायको बहीण, भाऊ सारे सोयरे, समाजाप्रती,,देशाप्रति,, तुमचं जे जे काही कर्तव्य आहे ते पालन करण्यास जीवाची ही बाजी लावण्यास पुढे मागे पाहू नका हे सांगणारी ही धर्मसंस्कृती याला संकल्प दिवस साजरे करायची पाळी का येऊ लागली??
*केवळ प्रेयसचा हव्यास वाढल्या मुळे*

*प्रेयस म्हणजे इंद्रियांना हवेहवेसे वाटणारे आणि श्रेयस म्हणजे आत्म्याला हितावह असणारे*

कवी अनिल लिहितात
मला आवडते वाट वळणाची, सरघसरणीची, पायफसणीची,,,तेव्हा
श्रेयस कशात हे आधी तुम्हला कळावे लागते
याच श्रेयसाची हाक राम कृष्णचा आदर्श बाळगणाऱ्या शिव शंभू पितापुत्रांना नन्तर लोकमान्य, सावरकर, सुखदेव राजगुरू भगतसिंग
या साऱ्या महभागांना आधी आली म्हणून स्वातंत्रसासाठी देहार्पण केलं
श्रेयस अस सहजी प्राप्त होत नसत, जीव पाखडावा लागतो त्यासाठी दिलेला शब्द पाळण्यासाठी जीवाचं रान करावं लागत
आला 31 st उचलली बाटली लावली तोंडाला
लावला dj नाचलो ढुंगण हलवत
आलं मनात केल सेलिब्रेशन अशी धमाल नसते या वाटेवर,,, *असतो तो फक्त त्याग*,,
श्रेयसा चरणी वाहावी लागते ते सत्य, निष्ठा, दुर्दम्य विश्वास,,, त्याला  *पर्याय*  नसतो
याच सत्य निष्ठा विश्वासापायी सत्यनिष्ठ राजा हरिशचंद्राने स्वप्नात दिलेलं ही वचन पाळलं
स्वप्नात दिलेल्या वचनपालनात साथ देणाऱ्या त्याच्या बायका मुलांनी
*15 लाख खात्यात जमा होतील असे कधी बोलले याची लिंक द्या असा उलट सवाल केला नाही*

*सत्याला पळवाट नसते*
*असतो तो फक्त प्रेयसाचा त्याग*,,,,
परंतु जसा राजा तशीच प्रजा
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर


Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...