Skip to main content

Posts

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक- प्रदीप ताम्हाणे

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक- प्रदीप ताम्हाणे “आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या *निव्वळ एका भावनेने* त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. *या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला*. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला. शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची. २६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी मा...

समझ_गये_बाबू_ये_पब्लिक_है_ये_सब_जाणती_है

हा साहब, बस आपके जैसे हम देश नही बेचते,,, हा साहब, ना ही बॅंक लुटेरोंका साथ नही देते उन्हे देश छोडकर भागणे मे मदत नही करते,, हा साहब, स्विस बॅंक से देश का पैसा वापस लाने का झुटा वादा नही करते,, हा साहब, देश के हर इंसांन को अपना खून पसीने का पैसा बॅंक मे जमा करवाने को मजबूर नही करते,, हा साहब, ना ही असे मै चोर नही हु का सर्टीफेकेट देते है,,, हा साहब, ना ही गटर गेस की खोज करते #हा_साहब, #_बस्स_कभी_झंडे_कभी_रुमाल_कभी_रुमाल_बेचते_जरूर_है #क्यो_की_हम_जनता_को_उल्लू #और_खुद_को_झंडू_नही_समझते #समझ_गये_बाबू_ये_पब्लिक_है_ये_सब_जाणती_है

"आरं छातीवर जागा नव्हती म्हणुन दोन मेडल घरीच ठेवुन आलोय."

"आमच्या काळात 303 रायफल असायच्या... बोल्ट वडायचा ट्रिगर दाबायचा परत बोल्ट वडायचा ट्रिगर दाबायचा... पार हातं बोटं सुजुन जायची, कच्ची कणसं खाऊन आमी देशासाठी लडलो एके काळी,चीन नं सप्लाय लाईन तोडली होती आमची... तीन लढाया लढलोय मी,पाकिस्तानासोबत दोन आणि चीन सोबत एक. ही छातीवरती आहे तीच संपत्ती आमची.." अंगावर काटे आणनारे शब्द होते त्यांचे. बन्सी नारायण गाडे. वय 85 माजी सैनिक. लान्स नायक (ब्रिगेड आॅफ गार्ड,हेडक्वार्टर नागपुर) आज जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद इथं ध्वजवंदन कार्यक्रमानिमित्त गेलो आणि हे माजी सैनिक दुरुन दिसले. हे छाती भरगच्च मेडल्स नी भरलेली.. थोडं बोलावं म्हणुन दबकतंच बोललो जरा..(म्हटलं आर्मीचा माणुस,उगाच चिडला बिडला तर काय घ्या..) मी विचारलं तर म्हणतात कसे "आरं छातीवर जागा नव्हती म्हणुन दोन मेडल घरीच ठेवुन आलोय." त्यांच्या छातीवर दोन नागा हिल्स मेडल दोन संग्राम मेडल दोन समर सेवा मेडल एक रक्षा मेडल 1965 एक पच्चीसवी स्वतंत्रता जयंती मेडल एक आहत (casualty in 1965) मेडल आणि एक मिझो हिल्स मेडल असे एकुण दहा मेडल होते आणि लावायला जा...

मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई...

DR.RAJENDRA BHARUD (IAS) FIRST ADIVASI IAS OFFICER मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई... हां लेख सामोडे गावातील आदिवासी समाजाचा पहिला जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भारुडे (सध्या नेमणूक नांदेड)जरूर वाचा !     पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय... मी सकाळपासून रडत होतो. पाटी, पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली. माझं रडणं सतत चालूच होतं. मध्येच मायच्या हाताला जोराचा झटका देत, मी मोठमायच्या घराकडे धावत सुटलो... मोठमायच्या घरात जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात सापडणं होतं, हे त्या वेळी माझ्या बालमनाला समजत नव्हतं. मोठमाय म्हणजे महाकाली. तिने सरळ मला उचललं आणि मायला सोबत घेऊन थेट मला हेडमास्तरांकडे घेऊन गेली. मी निषेध म्हणून जमिनीवर पडून गडबडा लोळत होतो. पण या दोघीही माझ्याकडे जराही ढुंकून न पाहता घरी निघून गेल्या... धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा... याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही नसला तरी दोन खमक्या बायका होत्या... माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी बहीण आणि एक ...

मेडिक्लेम वर गुंतवणूक करण्यापेक्षा आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर,,,?

मेडिक्लेम वर गुंतवणूक करण्यापेक्षा आज स्वतःमध्ये गुंतवणूक करा पण खालील कारण देऊ नका *व्यायामासाठी दिली जाणारी कारणं.......* 1) जॉब हेक्टिक आहे ( कुणाचा नसतो ?) 2) वेळच मिळत नाही ( सर्वांनाच 24 तास मिळतात !) 3) खूप काम असते ( रिकामटेकडा कोण असतो ?) 4) अभ्यास खूप असतो कॉलेजात ( काय दिवे लावणार आहात ?) 5) घरी जाऊन पण काम असते ( आम्ही पण कामं करतो !) 6) लग्न झालं आता ( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !) 7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो ( तेवढा व्यायाम पुरेसा वाटतो का ?) 8) आता कोण बघतंय आमच्याकडे ? ( मग घराबाहेर पडूच नका !) 9) मला गरजच नाही व्यायामाची ( *सर्वात मोठा गैरसमज ...*) 10) हे जिम , व्यायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत ( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?) 11) जिमची फी परवडत नाही ( घरी करायला किती पैसे लागतात ?) 12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं ( अर्धा तास काढता येत नाही स्वतःसाठी ?) 13) घरी आल्यावर आराम करायचा की व्यायाम करत बसायचं ? ( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?) *हुश्श !!!* यापेक्षा मोठी लिस्ट होईल. मित्रांनो , कारणं खूप देत...

गटारी नव्हे दीप अमावस्या 3

 *शरीर सुदृढ आणि मन निकोप ठेवायचं असेल तर ,,,* *शरीर रुपी ज्योतीला सुदृढ करण्यासाठी व्यायामाचा दिवा घासून पुसून नित्य पूजा हि केलीच पाहिजे* काल परवा पासून आषाढ अमावस्या काय ते मेसेज येत आहेत एक बर बहुतेक सारे हि आषाढ अमावस्या आहे हिला गटारी म्हणू नका वैगेरे सांगू लागले आहे बोलू लागले आहेत आणि तसे वागू हि लागले आहेत पण,,, मला उमजला तो अर्थ इथे सांगू इच्छितो,, *दिवे दुधाने धुवावेत,,, म्हणजे शरीर रुपी प्राणज्योतीला रोज दूधच पाजा* चहा नकोच,,,,😊 *पाटावर शुभ्रवस्त्र अंथरून त्याची पूजा करावी,,,, म्हणजे सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून व्यायाम करावा* वेगवेगळी फुल वाहण्या ऐवजी तसे वेगवेगळे व्यायाम करावा,,,😊 *गोडाचा नैवेद्य,, म्हणजे जे काही गोड खाल ते नैवेद्या प्रमाणे सेवन करावे* अती गोड नकोच,,,😊 *घरातील प्रत्येकाला औक्षण करावे,,, जस तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली आहे त्याच प्रमाणे घरातील इतरांना व्यायाम करावयास प्रवृत्त करा,,,* *दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक,,नेमकेगणराय याच भूमीतले   साक्षात अग्निच मग त्याला शांत करण्यासाठी दुर्वांचा रस हा रोज प्यावा*...

आई, असं का ग केलंस?

आई, असं का ग केलंस? (मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..) उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरि या भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र **Share*** करून शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा.... हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. ) आई, असं का ग केलंस? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस? मी तुला पाहण...

*भरोसा विश्वास*

 पूर्वी एक शेजारी काका रहात होते त्यांना कुणीच नव्हतं त्यामुळे ते तसे आमच्या घरासोबतच जोडलेले होते माझा तर ते खूप लाड करत साधारण मी दहावीत असताना वारंवार पोट दुखत म्हणत डॉ कडे गेले डॉ ने अल्सर झालाय ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं मग  माझ्याही त्यांच्या सोबत हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या ठरल्या दिवशी ऑपरेशन झालं डॉ साहेब बाहेर आले आणि म्हणाले की अल्सर तर नव्हता पण मुतखडा मोठा होईल अशी शंका आली थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं थोडी अधिक फी द्यावी लागेल आता मी दहावीत पोटातल कळत नव्हतं न पोटा बाहेरच,,, *तरीही कुठे तरी वाटत होतं की डॉ ने कदाचित आपल्याला फसवलं पण बोलणार कुणाला???* *आणि इकडे ते काका तर डॉ ला देव मानून बसले होते* वास्तविक त्यांना ही ते ऑपरेशन नन्तर ही पोटात थोडं थोडं दुखतच होत पण वर्षभरातच त्यांचे एक मित्र त्यांना ही असाच त्रास होऊ लागला काकांनी उत्साहात त्याच डॉ च नाव सुचवलं *की तो एकदम बेस्ट आहे* त्याच्याकडेच जा,,, ते परिचित गेले ऑपरेशन झालं डॉ पुन्हा तेच सांगितलं की थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं अधिकची फी द्या,, हे सगळं काकांना कळल्यावर त्यांना त्यांचा प्रसंग डोळ...

आणि तो तिसरा मित्र होता?

#तो तिसरा मित्र होता,,,❓ गुरुकुलातून तीन युवक उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती खास परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात प्रमाणपत्र देण्याचा सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढच्या आयुष्यक्रमणेसाठी गुरुकुलाबाहेर पडले.. संध्याकाळ होत आली होती. आणखी काही क्षणांमध्ये मिट्ट काळोख झाला असता. तिघांना झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. *अचानक पुढे चालणारा युवक थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.* *दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..* *तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला.* *दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का?* कोणत्याही क्षणी अंधार पडेल. आपल्याला मुक्कामाचं गाव गाठायचं आहे...

*मनुष्य आणि प्राणी*

*प्रिय मित्रा*, *फक्त तुझ्यासारख्या अनेक मित्रांसाठी हॉस्पिटल मध्ये जस हिम्मत करूनही बोलू शकलो नाही तसेच इथेही तुझं नाव लिहायची हिम्मत मला होत नाही कारण आता लक्षात आलय की यावर अंमल तूच नव्हे सगळ्यांनीच करायला हवा म्हणून,,* दोनच दिवसांपूर्वी एका मित्राच्या मुलाचा फोन आला की वडीलांना एडमिट केलंय त्यांना *पेरेलेलीस चा ऐटेक* आला आहे आहेत,, आता एडमिट आहेत म्हंटल्यावर त्याची भेटून विचारपूरस करणं आलं आणि तसा मित्र ही खूप जवळचा जुना मध्यंतरीच्या काळात कामाच्या धावपळीत तो विसरला होता मला,,, खूप मेहनती खूप काम करायची तयारी असलेला,,, हो येतो भेटायला अस म्हणत कुठलं हॉस्पिटल वैगेरे विचारून घेतलं,, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायला निघायच्या आधी चहा घ्यावा म्हणून सहज बसलो तो समोरच इसाप नितीच पुस्तक पडलं होतं सहज चाळायला घेतलं चहा येई पर्यंत एक गोष्ट वाचू म्हणत ते हातात घेतलं तो सहजच *माणूस आणि प्राणी* गोष्ट समोर आली,, एके ठिकाणी रस्त्यात एक साखरेचं पोत पडलेलं पाहून एक मुंगी धावत येते यथा शक्ती तिला उचलणं शक्य आहे तितका एक दाणा ती उचलते आणि चालू पडते मग तिच्या मागे चिमणी कावळा ससा कुत्रा...

*शांताबाई-स्वाभिमान आणि आरक्षण*

गोष्ट तशी अलिकडचीच कोल्हारपुरातील गडहिंग्लज गावातील 70 वर्षीय *नाभिक समाजातील* शांताबाई यादवांची,, 12 व्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन 30त च विधवा झाल्या पदरी चार मुली वडिलोपार्जित 3 एकर दिराने बळकवलेली अशा स्थितीत कुणावरही अवलंबून न राहता नवऱ्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला परन्तु *एक बाई केस कापणार?* चार मुली आणि गरिबी सोबत आता समाजाच्या तर्फे कुचाळक्या,अवहेलना,बदनामीच पदरी पडली,,, आणि *एकेदिवशी नाट्यमय घटना घडली,,,* गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या सद्गृहस्तान शांताबाईंना भर चौकात बोलावलं आणि त्या माऊलीला आपली दाढी कटिंग करायला सांगितली विस्फारलेल्या नजरेने सार गाव ती घटना पहात होत, दाढी कटिंग झाली *हरिभाऊंनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून लोकांना आवाहन केलं या बाईंनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांची कुचेष्टा अवहेलना मी खपवून घेणार नाही आशा तर्हेने त्या बाईंच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली* पुढे त्यावर अजय कुरणे यांनी *बलुत* नावाचा लघुपट ही काढला,, आज हे सारं आठवायचं कारण,,, आरक्षण गोंधळ जो अभूतपूर्व चालू आहे,, *मा...

,तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा😝😜😜👈🏻

सत्य जे बोचर असत जे बोचत तेच सत्य असत दोन आजोबा आपसात गप्पा मारत बसले होते 1ले आजोबा 2 र्यांना म्हणाले , अहो माझी नात लग्नाची आहे b e झालेली आहे ,पुण्यात जाँब करते ,उच आहे, सुंदर आहे , एखादा चांगला मुलगा सुचवा . 2रे आजोबा --आपेक्शा काय आहेत ? 1ले आजोबा -- फारशी नाही ,परंतु मुलगा m e ,mtek असावा, पुण्यातला असावा , पुण्यात स्वतःचा फ्लॅट असावा ,व लाखाच्या वर पगार असावा ,घरी थोडी शेती असावी 2रे आजोबा-- आणखी काही ? 1ले आजोबा --- महत्वाचे म्हणजे मुलगा एकटा असावा ,त्याला भाऊ,बहीण ,आई वडील आजी आजोबा कोणीही नसावेत (डस्ट बीन नकोच ) 2रे आजोबा -- तुम्हाला पाहिजे तसा मुलगा माझ्या कडे आहे ,एकटाच आहे ,त्याला भाऊ बहीण कोणीच नाही ,माझ्या मित्राचाच नातु आहे ,मुलाचे आईवडिल दोन वर्षापूर्वी अँक्सीडेंट मध्ये वारलेत ,आजीआजोबा देखील वारलेत ,मी प्रयत्न करतो ,पण त्या मुलाचीही एक अट आहे ,मुलीला भाऊबहीण,आईवडिल आजीआजोबा ( डस्ट बीन ) कोणीही नकोत तुमचा पूर्ण परिवार जर आजच आत्महत्या करत असेल ,तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा😝😜😜👈🏻 ( नंतर दोन्ही आजोबांचे कडाक्याचे भांडण झाले हे सांगायला नकोच ) ...

दिव्यांची पूजा " कि " गटारात लोळण 2

दिव्यांची आवस सुकरासी विष्ठा माने सावकाश मिष्ठानणा ची त्यास काय गोड़ी- संत शिरोमणि श्री तुकोबाराय फेसबुक आणि व्हाट्स ऐप वर येणारे मेसेज पाहून *गटारी हां देखिल 31डीसे* प्रमाने राष्ट्रीय सण होणार की काय अस वाटू लागलय,,, वास्तविक ज्याला आज गटारी अमावस्या अस अगदी काही क्यालेंडर मधे ही लिहल आणि बोलल जातय खर तर तमसो मा जोतिर्गमयचा खर्या अर्थाने संदेश देणारा हा सण- ज्या दिव्याने या देशातील 33 कोटि देवदेवतांना ओवाळल जात पूजल जात त्या दिव्यांची पूजा करायचा हां दिवस*  या दिवशी दिव्यान्ना घासून पुसून लक्ख केल जात नवी वात नव तेल घातल जात कारण या दिव्याच्या अवसेपासून श्रावण चालू होतो या महिन्यात खुप सण वार येतात गौरी गणपति इ. त्या नंतर नवरात्र त्यात तर नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो पुढे बाकीचे सण वार अशावेळी सर्वात पुढे असतो तो दिवा त्याच हे पूजन ,,,, पण आजकाल हे सार मागे पडून आता काय महिनाभर खायला मिळणार नाही घ्या खावुन आता मिलनार नाही घ्या पिवुन त्या निमित्ताने घ्या गटारात लोलून  असे सण आपन साजरे करू लागलो पहिल्यांदा मानवाने अंधारवर विजय प्रकाशाच्या सहाय्याने ...

घरभर वस्तू पार्ट 2- देशद्रोही

दुसरी तिसरीत असताना एक छान धडा होता घरभर वस्तू,,, त्या गोष्टीच हे आधुनिक रूप,, 🤓अमित शाह भाषण देत असतात त्या भाषणात ते एक गोष्ट सांगतात,,, एक व्यक्तिला 3 मुलं होती त्याने तीनही मुलांना 100 100 रुपये दिले आणि अशी वस्तू आणायचं आवाहन केलं की त्या वस्तूने सर घर भरून गेलं पाहिजे... पहिल्या मुलाने 100 रु च्या गवताच्या पेंढ्या आणल्या पण घर काही भरलं नाही,, दूसऱ्या मुलाने 100 रू चा कापूस आणला त्याने ही घर पूर्ण पणे भरलं नाही ,, तीसऱ्या मुलाने 1 रूपायात 1 मेणबत्ती आणि माचीस आणली आणि त्या प्रकाशाने सार घर भरून गेलं अमितजी शहाजी भाषणात पुढे बोलले की आपले मा प्रधान सेवक त्या तिसऱ्या मुला सारखे आहेत जे राजकारणात आल्या पासून देशाचं भवितव्य उज्ज्वल प्रकाशमान आणि समृद्ध झालेलं दिसत आहे इतक्यात मागून एक आवाज आला ,"वो सब तो ठीक है बाकी के 99 रूपए कहाँ है?" 🤗🤗 अमित शाह - मारो इस देश द्रोही को जो सवाल करता है।

विनोद आणि कटू सत्य

  एका विनोदाची सत्यकथा लग्नाळू मुला मुलींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी ही गोष्ट जरूर वाचावी,,, काल रात्री व्हाट्सएप वर विनोद आला,, की जीव द्यायच्या निमित्ताने 20 व्या मजल्यावरून एक मुलगी उडी मारते,, तिच्या नशिबाने 17 व्या मजल्यावर एक मुलगा उभा असतो , तो तिला अलगद झेलतो आणि त्या सुंदर अशा मुलीला पाहून विचारतो प्रिये माझ्याशी लग्न करशील? ती त्याला *हट स्टूपिड* बोलते अर्थातच तो मुलगा तिचा हात सोडून देतो परन्तु नशिबाने पुन्हा खाली 14 व्या मजल्यावरचा उभा असलेला मुलगा तिला वाचवतो त्या सौंदर्यवतीला पाहून तो देखील विचारतो प्रिये माझ्याशी लग्न करशील? पुन्हा ती त्या दुसऱ्या मुलाची *ए बेअक्कल* अशी त्याची संभावना करते अर्थातच तो ही मुलगा हात सोडून देतो,, परन्तु नशीब जोरावर असलेल्या त्या मुलाला वाचवायला एक मुलगा कर्मधर्म संयोगाने आठव्या मजल्यावर उभा असतो आणि त्याने तिला वाचवल्या बरोबर हो हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे म्हणत गळ्याला त्याच्या मिठी मारते,,, परन्तु इथे मात्र तीच नशीब खराब असत ती अस बोलल्या बरोबर तो वाचणारा मुलगा , मनात विचार करतो कुठे हिला वाचवतो आहे तर ही ब...

दीप अमावस्या आणि मारेकरी संस्कृतीचे 1

आषाढ महिन्याची अमावसेस दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या हे नाव प्राप्त झाले आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी- ‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ त्याचा अर्थ असा – ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’ त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते. असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा ह...

भगवान श्री परशुरामाचा शाप ,बुद्धी आणि आपण

आज तक तेज वर संजय सिन्हा रोजच गोष्ट सांगत असतात आज त्यांच्या एका परिचिताची गोष्ट , एक दिवस त्यांचे एक परिचित त्यांना फोन करून त्यांच्या घरगुती समस्येबद्दल बोलतात मुलाची तक्रार करतात की मुलगा हाता बाहेर चालला आहे पैसे काय उधळतो लहान सहान गोष्टीवरून घरात बहीण बघत नाही आई लगेच धावून जातो आकांड तांडव करतो मला काही तरी उपाय सांगा काय करू माझं तर डोकच चालायचं बंद झालंय? मी काय करू करता सावरता मुलगा असा हातून निसटून जातोय आणि मी काहीच करू शकत नाही बुद्धी भ्रष्ट झालीय काय करू काही उपाय सांगा? तो फोन वर बोलत होता आणि इकडे ते ऐकत गप्प झालो होतो मला माझे आणि त्या परिचिताचे दिल्लीत कामाला तरुणपणातील दिवस आठवत होते आम्ही दोघेही एकदमच दिल्लीत आलो होतो त्यावेळी माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता *संजय खूप पैसे कमविशील इतकं तुझं शिक्षण झालं नक्कीच आहे मात्र किती आणि कसे ते मात्र तू ठरव,,,,* मी अगदी त्याच रस्त्यावर नेटाने चालायचा प्रयत्न करत होतो आणि तो परिचित मात्र माझी टिंगल उडवत असे संजयजी तुम्ही गरिबी पाहिलेली नाही गरिबीचे चटके काय असतात तुम्हला माहीत नाही पैशाशिवाय पान हलत नाही पैसा भगवान नही ...

फसवले गेलेल्या वडिलांचं मृत्यू पत्र

आटपाट देशातील एका  नगरीतील सत्य घटना,, मरणासन्न अवस्थेत वडील पलंगावर पडलेले आहेत आणि त्यांच्या त्या मरणासन्न यातनेत वडिलांना आपल्याला काहीच मदत करता येत नाही अशा निराश आणि चिंताक्रांत अवस्थेत तिघे भाऊ वडिलांच्या पायाशी बसून आहेत त्याही अवस्थेत आपल्या मुलांची काळजी वाहणारे वडील त्या मुलांना आश्वस्त करतात मुलांनो, " मी उधार ज्यांच्याकडून घेतलं होतं, ती उधारी सगळी चुकवली आहे, जी येणी येणार होती ती देखील वसूल करून ठेवली आहे, त्यांची समान वाटणी मी तुम्हा भावात करून ठेवली आहे राहत घर मुलींच्या लग्नासाठी घेतलल कर्ज फेडल आहे त्यामुळे काळजी नाही फक्त एका जागी मोठी रक्कम अडकून बसली आहे तुम्हा भावंडांना ती वसूल झाली तर आपापसात समसमान वाटून घ्या, रोख रक्कम हाती मिळेल हे लक्ष्यात आल्यावर त्याही परिस्थतीत भावांचे डोळे लकाकले, तिघेही एकदम बोलले बाबा जस तुम्ही सांगाल तस सांगा कुणाकडून किती रक्कम येणे बाकी आहे? वडील बोलले माहीत नाही कधी माझे प्राण निघून जातील म्हणून तळघरात एक कपाटात संपत्ती वाटप आणि येणाऱ्या त्या रोख रकम बद्दल लिहल आहे- मी मेल्या नन्तरच ते पत्र सविस्तर वाचा आणि दुसऱ्य...

2 इतिहातील तो दिवस होता वटपौर्णिमेचा*,,,,,,, अर्थात

2 इतिहातील तो दिवस होता वटपौर्णिमेचा*,,,,,,, अर्थात *वट पूर्णिमा ते वठलेला महाराष्ट्र* 2 अलिदशहा च्या कैदेतून शहाजी राजे सुखरूप बाहेर आले तो दिवस होता *वटपौर्णिमेचा,,,* इतिहासातील जिजाबाई या सावित्रीने आपल्या सत्यवानाचे म्हणजे शहाजी राजांचे प्राण आपल्या बुद्धिमान मुलाच्या मदतीने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने परत मिळवले,, इकडे शहाजी राजे मोठे अचंभीत झाले होते की हे हे सर्व घडलं कस🤔❓,,,, बाप मुलाची गाठ भेट झाली आणि लगोलग शहाजी राजे बोलणी झाली की अरे हे कसं म्हणजे हे सारं कस घडलं❓ आणि आता हे स्वराज्याच काम थांबवून आता का दिल्लीश्वराला शरण जायचं❓आता त्याची चाकरी करायचं🤔❓😡 अरे मी मेलो असतो तरी बेहत्तर पण हे उद्योग कुणी सांगितले❓ महाराजांच्या मनात काय आहे ते माहीत नसलेले शहाजी राजे चिडून बोलू लागले,,,,,, तसे शिवबा म्हणाले अहो पिताश्री,, *शत्रुलाही दिलेला शब्द पालन ही रामनीती झाली आणि शत्रूलाच दिलेला शब्द न पालन ही कृष्णनीती झाली,,* आपण मुरदला बोललो आहोत तुझी चाकरी करायची आहे म्हणून याचा अर्थ आपण लगेच चाकरी वर रुजू होऊ अस थोडंच आहे? *आपला घात आतापर्यंत शत्रूला दिलेला शब्द ...