Skip to main content

दिव्यांची पूजा " कि " गटारात लोळण 2

दिव्यांची आवस

सुकरासी विष्ठा माने सावकाश
मिष्ठानणा ची त्यास काय गोड़ी-
संत शिरोमणि श्री तुकोबाराय

फेसबुक आणि व्हाट्स ऐप वर येणारे मेसेज पाहून
*गटारी हां देखिल 31डीसे* प्रमाने राष्ट्रीय सण होणार की काय अस वाटू लागलय,,,
वास्तविक ज्याला आज गटारी अमावस्या अस अगदी काही क्यालेंडर मधे ही लिहल आणि बोलल जातय
खर तर
तमसो मा जोतिर्गमयचा खर्या अर्थाने संदेश देणारा हा सण-
ज्या दिव्याने या देशातील 33 कोटि देवदेवतांना ओवाळल जात
पूजल जात त्या दिव्यांची पूजा करायचा हां दिवस*
 या दिवशी दिव्यान्ना घासून पुसून लक्ख केल जात नवी वात नव तेल घातल जात कारण
या दिव्याच्या अवसेपासून
श्रावण चालू होतो
या महिन्यात खुप सण वार येतात
गौरी गणपति इ.
त्या नंतर नवरात्र त्यात तर नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो पुढे बाकीचे सण वार अशावेळी सर्वात पुढे असतो तो दिवा त्याच हे पूजन ,,,,
पण आजकाल हे सार मागे पडून
आता काय महिनाभर खायला
मिळणार नाही घ्या खावुन
आता मिलनार नाही घ्या पिवुन
त्या निमित्ताने घ्या गटारात लोलून
 असे सण आपन साजरे करू लागलो
पहिल्यांदा मानवाने अंधारवर विजय प्रकाशाच्या सहाय्याने मिळवला
अमावस्या अंधारावर मात करायला शिकवते
अमावस्या
दिव्या सारखे लक्ख प्रकाश लोकांना दया अस शिकवते
आजकाल आषाढ़ अमावस्या म्हणजे काय ते आधी घरी शिकवत नाहित मग इंग्रजी मीडियमला का दोष द्यावा
गटार हे घाण वाहून न्यायच काम करत आणि आम्ही नेमकी त्या दिवशी घाण जवळ करतो
दिव्यांची अवस*  हे नाव आज किती जणांना माहीत आहे देव जाणे
आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात ये वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईन महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. ती होऊ नये मग श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही.श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हिm पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो. आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.

*दिव्यांची पूजा बांधुन कि गटारात लोळण * घेउन???

सुनील प्रभाकर भुमकर

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...