Skip to main content

*शांताबाई-स्वाभिमान आणि आरक्षण*

गोष्ट तशी अलिकडचीच
कोल्हारपुरातील गडहिंग्लज गावातील 70 वर्षीय *नाभिक समाजातील* शांताबाई यादवांची,,
12 व्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन 30त च विधवा झाल्या पदरी चार मुली वडिलोपार्जित 3 एकर दिराने बळकवलेली
अशा स्थितीत कुणावरही अवलंबून न राहता नवऱ्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला परन्तु *एक बाई केस कापणार?*
चार मुली आणि गरिबी सोबत आता समाजाच्या तर्फे कुचाळक्या,अवहेलना,बदनामीच पदरी पडली,,, आणि
*एकेदिवशी नाट्यमय घटना घडली,,,*
गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या सद्गृहस्तान शांताबाईंना भर चौकात बोलावलं आणि त्या माऊलीला आपली दाढी कटिंग करायला सांगितली विस्फारलेल्या नजरेने सार गाव ती घटना पहात होत, दाढी कटिंग झाली *हरिभाऊंनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून लोकांना आवाहन केलं या बाईंनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांची कुचेष्टा अवहेलना मी खपवून घेणार नाही आशा तर्हेने त्या बाईंच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली* पुढे त्यावर अजय कुरणे यांनी *बलुत* नावाचा लघुपट ही काढला,,
आज हे सारं आठवायचं कारण,,,
आरक्षण गोंधळ जो अभूतपूर्व चालू आहे,,
*माझा मा श्री बाळासाहेबांच्या आरक्षण भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर ,,*
असो दुर्दैवाने हे कुणाला मान्य नाही,
*एक मराठा लाख मराठा देखील आरक्षण रद्दच करा ची ठाम भूमिका घेत नाही,*
*समान नागरी कायदा आणण्याची ताकद 56 इंच मध्ये ही नाही,*
पण मराठा आरक्षण आंदोलनातला एक *महत्वाचा प्रश्न आहे की bc ला फी कमी जवळ पास नाहीच पण आम्हला मात्र न परवडणारी फी भरावी लागते त्या अभावी
आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे पुढे नोकऱ्या नाही,,,* ( ज्वलंत प्रश्न)
मग आज समस्त मराठा समाजाने जो *मराठा धनिक वर्ग आहे* त्यांनी हरिभाऊ कडुकर यांची भुमीका घ्यायला काहीच हरकत नाही श्री कडुकर यांनी जस शांताबाई यांच्या व्यवसायला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आपलं वजन वापरून अनेक मराठ्यांची जी कॉलेजेस आहेत त्यात या गरीब होतकरू मुलांना
त्यांना परवडेल अशी फी घेऊन शिक्षण द्यायला काय हरकत नसावी समाजाने समाजाच ऋण फेडायची ही नामी संधी आहे त्यातही जमत नसेल तर मराठा समाजाने आपल्याच गरीब बांधवांना मदत करून व्यवसायिक बनण्यास ही मदत करता येऊ शकेल,
*मराठा समाजाच्या बॅंका, पतसंस्था, साखर कारखाने, कृषी उत्पन्न समित्या,सूत गिरण्या, हातमाग, सहकारी सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, सहकारी मार्केटिंग, कॉलेजेस, दन्त महाविद्यालये, बाजार समित्या, पेट्रोल पम्प, मद्याचे कारखाने,
1960 पासूनचे काँगेस काळातील ते आज पर्यंतचे मराठा आमदार खासदार*
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
एका तरी गरीब मराठा मुलाला यांच्या संस्थेच्या वैद्यकीय,इंजनियरिंग,मैनेजमेंट कॉलेज ला यानी फुकट एडमिशन दिलीय का?
यांच्या संस्थेत यांचीच मुले संचालक असतात.पुतणे,भाचा, मेहुना,दाजी,चुलता,सुन,जावई, मावशी,काका,आत्या ,आत्याचा नवरा,नातू, अगदी लाम्बचा नातेवाईक कूवत नसताना पदावर असतो.
जरा सगळ्या मराठा नेत्यांचे नाते संबंध तपासा. त्यांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या मग तो कारखाना असो की सोसाइटी इथे असलेला दिसून येईल.
हे एक सर्कल आहे जे सत्तेच्या आसपास फिरते.
तुम्हाला ते सर्कल मधे येउच देत नाहीत

हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा,






Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...