Skip to main content

*मनुष्य आणि प्राणी*



*प्रिय मित्रा*,
*फक्त तुझ्यासारख्या अनेक मित्रांसाठी हॉस्पिटल मध्ये जस हिम्मत करूनही बोलू शकलो नाही तसेच इथेही तुझं नाव लिहायची हिम्मत मला होत नाही कारण आता लक्षात आलय की यावर
अंमल तूच नव्हे सगळ्यांनीच करायला हवा म्हणून,,*

दोनच दिवसांपूर्वी एका मित्राच्या मुलाचा फोन आला की वडीलांना एडमिट केलंय त्यांना *पेरेलेलीस चा ऐटेक* आला आहे आहेत,,
आता एडमिट आहेत म्हंटल्यावर त्याची भेटून विचारपूरस करणं आलं आणि तसा मित्र ही खूप जवळचा जुना मध्यंतरीच्या काळात कामाच्या धावपळीत तो विसरला होता मला,,, खूप मेहनती खूप काम करायची तयारी असलेला,,,
हो येतो भेटायला अस म्हणत कुठलं हॉस्पिटल वैगेरे विचारून घेतलं,,
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायला निघायच्या आधी चहा घ्यावा म्हणून सहज
बसलो तो समोरच इसाप नितीच पुस्तक पडलं होतं सहज चाळायला घेतलं चहा येई पर्यंत एक गोष्ट वाचू म्हणत ते हातात घेतलं तो सहजच *माणूस आणि प्राणी* गोष्ट समोर आली,,
एके ठिकाणी रस्त्यात एक साखरेचं पोत पडलेलं पाहून एक मुंगी धावत येते यथा शक्ती तिला उचलणं शक्य आहे तितका एक दाणा ती उचलते आणि चालू पडते
मग तिच्या मागे चिमणी कावळा ससा कुत्रा
असे छोटे मोठे प्राणी येतात आणि यथाशक्ती कुणी एक दाणा कुणी दोन कुणी मूठभर जसे उचलणं शक्य तितकेच ते घेऊन जात असतात इतक्यात एक मनुष्य तिथून जात असतो तो पाहतो की साखरेचं पोत पडलेलं आहे , तसा तो लगबगीनं कुणी पाहताय का ते बघत लगेच पोत उचलून चालू लागतो ,, तसे साखर खायला जमा झालेले किडा मुंगी त्याने ती साखरेच पोत उचलून चालू लागताच आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात की हा असा काय करतोय????
इकडे तो मनुष्य ते पोत उचलून चालू पडतो खरा पण ते एकट्याला उचलणं शक्य नसतं तरीही तो खूप ताकद लावून ते पोत कसबस उचलून चालत असतो,
कुणी बघू नये म्हणून झपझप पावलं टाकत असतो कुणाला मदतीला बोलवावं तर तो हिस्सेदार म्हणून मग नकोच पण एकट्याची ताकद ती कमी पडली आणि नेमका एका खडकाळ जमिनीपाशी तो अडखळून पडतो हातातलं साखरेचं पोत पडून साखर इकडे तिकडे पडते आणि याच नेमकं डोकं दगडावर आपटत आणि दुर्दैवाने जीव जातो आणि इथेच
*मनुष्याच्या हावरट,हपापलेपणाला अधोरेखित करत गोष्ट संपते*
तो आणि मी आम्ही दोघेही एकाच वेळी मुंबईत आलो
दोघे ही पुण्याचेच असल्यामुळे पुढे घनिष्ठ मैत्री झाली, पण मध्यंतरीच्या काळात
*कामातून वेळच नाही सवडच नाही आणि नेमकं जवळचा शेजार ही सोडून लांब डोंबिवलीत राहायला गेलेला असल्याने त्याचा नी माझा हळू हळू संपर्क ही कमीच होत गेला* इतका की आजकाल तो व्हाट्सएप वर देखील महाग झाला होता
आणि आज अचानक त्याच्या मुलाचा फोन आला पपा आजारी आहेत,,,,,
आणि आताच वाचलेली गोष्ट झर झर पुढे पुढे जात होती , माझ्या मनात मात्र त्या मित्राची पैसे कमवायची धावपळ मेहनत डोळयांसमोरून चित्रपटा प्रमाणे धावत होती ,,, त्यासाठी त्याला हवी ती तडजोड करायला तो नेहमी तयार असे , दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत होता , कामाचा कंटाळा नाही ,विधिनिषेध नाही,
पण *किती धावायचं? का?आणि कुणासाठी ?कशासाठी ? आपली भूक किती? * हे कधीच लक्षात न घेतल्यामुळे
आज तो लुळा (  पेरेलेलीस)होऊन पडला होता ,,
हा सारा विचार करत होतो तोच सौ ने समोर चहा आणून ठेवला तो घेतला आणि दोघेही लगेचच निघालो त्याला भेटायला दारात ओला आलीच होती तो पर्यंत गाडीत बसलो पण ती गोष्ट मनुष्य आणि प्राणी काही केल्या डोळयांसमोरून जात नव्हती ठरवलं आता जाऊन साल्याची कान उघडणी करायची मस्त ही गोष्ट ही सांगायची खूप रागावयच वैगेरे वैगेरे ,,,पण समोर लुळा झालेला माझ्याच वयाचा देखणा पण हतबल झालेला माझा मित्र केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात
कसनुस हसत तो माझ्याकडे पहात होता
डोळयांच्या किनारीतून झरझर त्याच्या पाणी वाहत होत
*एक प्रकारे हात जोडून तो माझी मनातल्या मनात माफीच मागत होता की मित्रा तुझं ऐकलं असत नसती धावपळ केली नसती रोजच्या रोज थोडा वेळ काढून छान व्यायाम केला असता,, थोडा वेळ आपल्याच मुलांशी मित्र नातेवाईकांशी बोलण्यात वेळ घालवला असता,, फक्त मी, मला, माझं करण्यात आपल्याच लोकांपासून दूर गेलो नसतो तर आज ही वेळ नक्कीच आली नसती दिवसातले एक दोन तास स्वतःसाठी आपल्या प्रियजनांसाठी नाही आपल्याकडे?*
त्याची ती हतबलता पाहून मीच गलबलून गेलो त्याला चांगला दम द्यावा कान उघडणी करावी या हेतूने गेलो होतो पण त्याला काहीच बोलू शकलो नाही
तो मूकपणे त्याच्या चुका स्वीकारत होता
आणि मी मात्र त्याचे पेपर तपासत औषध पहात ती कशी द्यायची ते डॉ ला विचारून मुलाला नीट समजावून सांगत होतो
रात्री मुक्कामाला येतो तू आज आराम कर अस त्याच्या मुलाला सांगत घरी आलो कारण रात्री पोळी भाजी घेऊन जाणार होतो,, बाहेर पडलो मात्र
तुकोबांचा अभंग ओठांवर राहून राहून येत होता,,,
*तुका म्हणे घेई राहे इतुके धन विवेक विचार करोनिया* किती लागत आम्हला?
त्यासाठी किती धावपळ करायची? हे आम्हला कधी कळणार?
माना अगर नका मानू पण प्रत्येकाचा वाटा त्या परमेश्वराने इथे राखून ठेवला आहे
तो समाधानाने आनंदाने मिळवायचा की उरफुटेस्तो धावायचं हे ज्याने त्याने ठरवायचं







Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल