Skip to main content

गटारी नव्हे दीप अमावस्या 3

 *शरीर सुदृढ आणि मन निकोप ठेवायचं असेल तर ,,,*
*शरीर रुपी ज्योतीला सुदृढ करण्यासाठी व्यायामाचा दिवा घासून पुसून नित्य पूजा हि केलीच पाहिजे*
काल परवा पासून आषाढ अमावस्या काय ते मेसेज येत आहेत
एक बर बहुतेक सारे हि आषाढ अमावस्या आहे हिला गटारी म्हणू नका वैगेरे सांगू लागले आहे बोलू लागले आहेत आणि तसे वागू हि लागले आहेत
पण,,,
मला उमजला तो अर्थ इथे सांगू इच्छितो,,
*दिवे दुधाने धुवावेत,,, म्हणजे शरीर रुपी प्राणज्योतीला रोज दूधच पाजा*
चहा नकोच,,,,😊
*पाटावर शुभ्रवस्त्र अंथरून त्याची पूजा करावी,,,, म्हणजे सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून व्यायाम करावा*
वेगवेगळी फुल वाहण्या ऐवजी तसे वेगवेगळे व्यायाम करावा,,,😊
*गोडाचा नैवेद्य,, म्हणजे जे काही गोड खाल ते नैवेद्या प्रमाणे सेवन करावे*
अती गोड नकोच,,,😊
*घरातील प्रत्येकाला औक्षण करावे,,, जस तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली आहे त्याच प्रमाणे घरातील इतरांना व्यायाम करावयास प्रवृत्त करा,,,*

*दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक,,नेमकेगणराय याच भूमीतले   साक्षात अग्निच मग त्याला शांत करण्यासाठी दुर्वांचा रस हा रोज प्यावा*
चिल्ड बियर रम व्हिस्की आदी तत्सम प्रकार म्हणजे आगच जी तुम्ही पोटात घालूच नये,,😊

*घरातील सुवासिनी सगळे दिवे एकत्र करून भोवतीरांगोळी घालून दिवे लावतात,, इथे एक प्रसंग खूप छान आहे,, श्यामची आई चित्रपटातील सारे मित्र आल्या बरोबर श्याम लपतो कारण त्याला पाण्याची भीती वाटत असते,, त्यावेळी त्याची आई कठोर होते आणि छडीने फोडते ती म्हणते माझा मुलगा 'ढ' अस सार गाव म्हंटल तरी चालेल पण माझा मुलगा 'घाबरट' आहे असं म्हंटलेलं बिलकुल चालणार नाही*
आपल्या घराच्या आरोग्यासाठी सुवासिनींन कडून हीच पूजा अपेक्षित आहे,,,😊

*पुढे पंचपक्वणांचा नैवेद्य दाखवला जातो,, म्हणजे अशा प्रकारे रोज व्यायाम केल्यावर वेगवेगळा आहार ठेवावा*
शिळ पाक उरलं सुरल अन्न हॉटेल रस्त्यावर खाऊ नये,,😊

*हे सारं करताना अर्थातच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जे काही जीवन ज्योत आपल्याला मिळालेली आहे ती आणखी एका दिव्य ज्योती कडूनच आणि हि ज्योत सर्वसाक्षी परमेश्वरच सूर्य नारायण जो स्वतः तेजोमय आहे आणि तेजाची आरती तेजानेच केली पाहिजे*
😊 *मग अर्थातच तेज कमवाव लागत ते कुठल्या बाजारात किंवा मेडिक्लेम पॉलिसीत नसत*

आणि हे सारं केलंत तरच
*"दीप सूर्यअग्निरूपसत्व तेजासां तेज उत्तमम | गृहाण मत्कृता पुजा सर्वकामप्रदो भव ||"*
अर्थ-- हे दीप तू सूर्यरूप अग्निरूप आहेस तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि इच्छा पूर्ण कर,,,
म्हणजेच
*तुम्हला जर तेजाला हे आवाहन करायचं असेल की माझी प्रार्थना तू कबूल कर तर आधी तुम्ही प्रकाशमान झालं पाहिजे ताकदवान झालं पाहिजे सुदृढ शरीर झालं पाहिजे*
आणि मगच,,
गुरुजी जी प्रार्थना घेतात
*धर्मासाठी झुंझावे म्हणजे नक्की काय ते कळेल ते झुंजन म्हणजे फेसबुक व्हाट्स अप वर भांडण खण्डन करण्यात वेळ घालवणं नव्हे,,,*
बघा जमलं तर
मानामनातील अंधार मरगळ दूर करा
हिंदुत्वच रक्षण आपोआप होईल
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...