Skip to main content

मेडिक्लेम वर गुंतवणूक करण्यापेक्षा आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर,,,?


मेडिक्लेम वर गुंतवणूक करण्यापेक्षा आज स्वतःमध्ये गुंतवणूक करा पण खालील कारण देऊ नका
*व्यायामासाठी दिली जाणारी कारणं.......*
1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)
2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)
3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)
4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)
5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)
6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)
7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा व्यायाम पुरेसा वाटतो का ?)
8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)
9) मला गरजच नाही व्यायामाची
( *सर्वात मोठा गैरसमज ...*)
10) हे जिम , व्यायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत ( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)
11) जिमची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)
12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)
13) घरी आल्यावर आराम करायचा की व्यायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)

*हुश्श !!!*
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.
मित्रांनो , कारणं खूप देता येतील.
*सुरक्षित भविष्य आणि निरोगी आयुष्यासाठी मेडिक्लेम वर गुंतवणूक करण्यापेक्षा आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी आणि आंनदी जगाल हे त्रिकालाबाधित सत्य आहे*
*नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्यायला लागा...*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...