Skip to main content

Posts

लालबहादुर शास्त्रीजी, अनंत दंडवत....

......फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी  ....  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी ....... गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी ...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी ...... पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी ..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी ....... गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी  ...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी ...... पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी  ...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी...

परशुरामांचा शाप आणि मोडिशा राजकारण

परशुरामांचा शाप आणि मोदीशा राजकारण,,, परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,, भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील, परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साध...

लेकिस पत्र

प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या लेकीला/लेकींना लिहावे असे पत्र चार्ली चॅप्लीन यांनी त्यांच्या जेराल्डिन नावाच्या मुलीला लिहिले आहे. हे एका बापाने त्याच्या लाडक्या लेकीला दिलेलं मूल्यशिक्षण तर आहेच आणि प्रेमाने केलेले मार्गदर्शनही आहे. तसेच  माणुसकीचा धडा शिकवणारं, मनाचा तळ ढवळून काढणारं, डोळ्याच्या कडा ओलावणारं साहित्यातील एक तेजस्वी, सळसळतं पान आहे! " लेकीस पत्र " प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे. नाताळची रात्र. माझ्या या घरातील सगळी लुटुपुटूची भांडणं झोपली आहेत. तुझे भाऊ-बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहेत. तुझी आईही झोपी गेलीय. पण मी अजुनही जागा आहे. खोलीत मंद प्रकाश साकळतोय. तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही. पण तू कूठं आहेस? तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात! तू 'चॅम्प्स एलीसिस'च्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील. रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय. हिवाळ्यातील आकाशात असणा...

कर्ण,अश्वसेन, आणि राज्यकर्ते

घर आमचं माळकरी त्यामुळे पूर्वी ग्रंथवाचन वारी ह्या सामान्य गोष्टी होत्या(आताशा अवघड वाटू लागल्यात ) त्यामुळे रामायण महाभारत हे ही रोजच्याच कथा मग हळूहळू शाळेत देखील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खास पुस्तक मुलांना वाचायला देत असत काही शिक्षक मग कधी कधी त्यावर प्रश्न ही विचारत ,, अशी ती ऐकण्याची वाचनाची गोडी लागलेला मी त्या ग्रंथ वाचनात हमखास कर्णाची गोष्ट येत असे,, इतकंच कळायचं की तो दुष्ट लोकांसोबत आहे आणि विजय पांडवांचाच होणार,, हे गणित ग्रंथ संपायच्या आधीच डोक्यात फिट्ट झालेलं असायचं, पण,,,, मनात मात्र कायम एक हुरहूर असायची जळो मेल ते युद्ध वैगेरे,, पांडव भले ही युद्ध जिंकोत पण कर्ण मात्र हरयला नको,,, कारण हळू हळू राधेय वैगेरे सारखी पुस्तक वाचनात येऊ लागली होती पण तरीही तो शत्रू सोबत लढतो हे मात्र मनात ठसलेलं असून ही तो हरू नये हे मनाने ठरवलेलं असायचं,, मग एक दिवस माझे आजोबा आईचे वडील ,, पुण्याला गावी गेलो असताना त्यांना मनातला प्रश्न विचारला,, की अस का ? मीच नव्हे माझे बरेच समवयस्क मित्र देखील असच म्हणतात की कर्ण जिंकायला हवा,,, अस नक्की खरच होत का?? *त्यावेळी आजोब...

चोर_आणि_घंटा

पूर्वी जेव्हा आमचं गाव हे गाव होत त्यावेळची आठवण,,, शेती वाडी गाई गुरू म्हैस गाढव कोंबड्या बकरे हे जवळपास प्रत्येक घरात पाळीव असतच,, त्यामुळे अशा समृद्ध घरात गाई गुरू म्हशी यांच्या चोऱ्याचं प्रमाण ही जास्त असे,,,, परंतु बरेचदा चोर चोरी करताना पकडला जात असे मग काय,, दे दना दन,,,  असा कार्यक्रम ठरलेला असे,, पण चोर हा कायम तुमच्या हुशारीच्या चार पावलं पुढे असतो,,, हळू हळू चोरांनी चोरीची पद्धत बदलली एकटे दुकटे येणारे चोर आता हळू हळू,, टोळक्या टोळक्याने येऊ लागले मग ते ही जनावर चोरताना आधी ते #गळ्यातील_घंटा काढू लागले मग त्या चोरां पैकी एक जण ती घंटा घेऊन निघून जात असे #मालकाची_दिशाभूल_करण्यासाठी आणि उरलेले विरुद्ध दिशेने,,,, अर्थातच मालक मग घंटेचा आवाजाचा मागोवा घेत पकडायला धावत असे पण काही अंतरावर तो चोर ती घंटा कुठे तरी आडोशाला टाकून निघून जात असे आणि इकडे ज्यांच्या हाती ते चोरलेलं जनावर गाय, म्हैस जे असेल ते शांत पणे घेऊन जात असे मधल्या मध्ये #मालक मात्र मस्त #फसत असे #हिंदूंच्या गाई म्हशी:-- राम मंदिर, 370, कश्मीर,पाकिस्तान, भ्रष्टाचार, आरक्षण, या सारखी हिंदू हिताच...
टोट्टा पटाखा आयटम माल’ : पुरुषांनाही बलात्काराची भीती वाटली पाहिजे? नक्की वाटेल?? 8च्या आत घरात ही बंधन पुरुषांना देखील पाळावीशी वाटायला हवीत,, हा विचार घेऊन हा नेटफ्लिक्स वरचा सिनेमा पहायला मिळाला,,,,, एक सिनेमा. नावावरून काहीच अर्थ लागेना. म्हटलं जरा डोकावून पाहूया. नाव होतं- टोट्टा पटाखा आयटम माल. आणि मी हादरलो हा सिनेमा होता चौघींचा. चारचौघींसारख्या त्या चौघी. शहरी, निमशहरी कुठेही या चौघी सापडतील अशाच. पुरुषी क्रूरतेला बळी पडलेल्या.  दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडानं खजील झालेल्या.  पुरुषी ताकदीवर अनेक बलात्कार घडतात, पण लहानपणापासून स्त्री ही अशक्त, कमजोर, लाचार असण्याची भावना ठासून उरी बाळगणाऱ्या चौघी कुठेतरी आत धुमसत असतात.,,, त्या पेटून उठतात, *जेव्हा एक धडधाकट, अतिशय माजोरडा साडेसहा फूट उंचीचा तरुण त्यांची छेड काढतो.* सुरुवातीला दुर्लक्ष्य करण्याचा पवित्रा घेणाऱ्या या चौधी शेवटी त्याला धडा शिकवण्याचे ठरवतात. कणखर वृत्तीची कराटे टीचर *चित्रा* त्याला झुंज देते, तरी नाजूक स्त्री शरीर आणि माजलेला सांड, या दोघांत जुंपत नेहमीसारखा पुरुष हावी ह...

संतुर्की-- संत्या आणि सुरकीची गोष्ट

*संतुर्की* संत्या आणि सुरकीची गोष्ट,, मराठीतील वेब सिनेमा,, खूपच छान सिनेमा,,, कुठे ही जाती व्यवस्थेवर दगड फिरकवला जात नाही,, खूप मोठा डायरेक्टर नाही,, परदेशी लोकेशन नाही,, प्रसिद्ध गीतकार सोबत नाहीत,, गरीब श्रीमंत असा रोजचा घीसापिटा फॉर्म्युला नाही,, 20 वर्षांपूर्वीचा बापाच्या खुनाचा बदला वैगेरे,, भूत भुताटकी, देव देवतांवर टीका,,, हिंदू धर्मावर टीका,, अस्स काहीही नाही,,, उंच पुरा तगडा हिरो 2 पीस मधील हिरोईन महागड्या गाड्या त्यांची तोडफोड जुडो कराटे येणारा सर्वगुणसंपन्न हिरो मटेरियल नाही दारू सिगरेट मोबाईल यांची रेलचेल नाही *आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो* मोठी शाळा कॉलेजेस नाहीत भारी गुळगुळीत रस्ते नाहीत आणि *आयटम सॉंग* तर बिलकुल नाही *आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो* सहज साधं निर्मळ प्रेम कुठेही त्याचा अतिरेक नाही तू माझी नाही तर कुणाचीही होणार नाही ही भूमिका नाही आजच्या पिढीच नेतृत्व कबीर सिंग प्रेमभंगात दारुडा हिंसक होतो आणि लोकांना तो आवडतो ही😏 त्या कबीर सिंग वाल्यांनी तर हा सिनेमा तर आवर्जून पहावा अरे प्रेमाचा पाया त्...

विकास,,,,

चक्रव्यूह सिनेमातील एक भाग यातील माओवाद आणि नक्षली हे दोन शब्द वगळून हा सीन पहा आपल्याच विकासाच्या हव्यसा पायी सरकार कुठल्या थराला आपला इप्सित साध्य करत पहा  हे पाहून समजून घेतल्या नन्तर ही केवळ विकास हवा म्हणून मोदींची साथ देणं योग्य आहे विकासाचा भसम्या झालाय आपल्याला फक्त हवंय पण नक्की काय किती कशाला हे मात्र माहिती नाही आणि विचार करायची इच्छा ही नाही बस्स गंधारीने बांधली म्हणून आपण ही डोळ्यावर झापड चढवून घेतली आहेत फक्त हवंय,,,, मग त्यासाठी काहीही करावं लागलं कुठल्याही थराला जावं लागलं तरीही सरदार पटेलांची मूर्ती उत्तम उदाहरण  नर्मदेच्या खोऱ्यातील विस्थिपित केले गेलेल्या लोकांना आधी जागा द्यायला हवी की पटेलांच्या मूर्तीला ? पटेल सुध्दा ह्यासाठी मोदींना शापच देतील पण ऐकणार कोण? सरकारला साम दांम दंड भेद वापरून विकास करायचा आहे आणि आम्हाला तो हवा आहे मग विकासपुरुष आहेतच दंड थोपटून उभे त्या हवंय च्या नादात आम्ही कधी ओरबाडू लागलो आणि त्या राक्षसी लवासाला विकास अस नाव कधी देऊन बसलो ते अजूनही आम्हला कळलं नाही

त्या दिवशी खर्या अर्थाने मदर्स डे साजरा होईल

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात ... राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन. म...ुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू...

रंग,,,

निवडणुकीची रणधुमाळी tv वर आणि बाहेरही चालू होती,,, एकंदरीत सर्वच प्रचार प्रसार माध्यमांनी मोदींना झुकत माप दिल होत,,, आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे नातू महाराज हातात पेन्सिल घेऊन चित्र रेखाटत होते हातात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे नाचवणारे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांच्या झेंड्यांचे रंग त्याला जस जमेल तस तो रंगवत होता आणि नेमका माझं लक्ष नसताना tv त गुंग होतो बातम्या ऐकत त्याने अचानक त्याने प्रश्न केला दादा या दोघांना कुठला रंग देऊ?? आणि माझ्या तंद्रीतुन बाहेर आलो,, म्हंटल कुणाला रे बघू,, म्हणत त्याच चित्र हाती घेतलं तर त्याने अगदी बरेचसे योग्य रित्या कार्यकर्ते त्यांचे पक्ष त्यांचे झेंडे अगदी साजेसे रंग त्यात भरले होते,, त्यात कम्युनिस्ट ते वंचीत त्यांचे हिरवे निळे लाल,,, काँग्रेसचा तुटलेलता पंजात धरलेला तिरंगी ,,तिरंगी शाल अंगावर पांघरले सोनिया राहुल ,, बेरकी पवार त्यांच्या निधर्मी रंगात घड्याळाची  टिकटिक हिकमतीने थांबवलेला तिरंगी झेंडा, सारे हिंदुत्व मानणारे त्यांना साजेसं भगवे रंग,, असे सारे मुक्तहस्ते रंग भरूनही त्याला या दोन नेते कुठल्या रंगात रंगवायचे ते कळत नव्ह...

लिंबाराम,,,,

https://youtu.be/ii2Ru3JOH2A लिंबाराम आज हे किती जणांना माहिती असेल , आठवत असेल कुणास ठाऊक???? परंतु तीन वेळा भारताचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये फडकवणारा,, लिंबाराम ज्याच्या चपळतेने डोळ्याचे पारणे फिटत होते तो ,,,लिंबाराम तो लिंबाराम आज स्वतः मात्र असहाय, अपंग, अवस्थेत धपडतोय,, भारतीय धनुर्विध्या चमुचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आज मात्र दोन शब्द बोलण्याच्या ही अवस्थेत नाही, आज त्याची दृष्टीच बाधित झालीय नीट चालू ही शकत नाही, श्रेष्ठ धनुर्विद्या वीर प्रशिक्षक लिंबाराम ची ही आजची अवस्था *दिल्लीच्या एम्स इस्पितळात जनरल वार्डात आज त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे* 46 व्या वर्षी आलेल्या स्नायू विकाराने चपळ लिंबाराम अकाली म्हातारा झालाय धनुष्याच्या प्रत्येक टनत्काराने धनुष्याला कंपन आणणार्या हातालाच आज कम्प सूटलाय,, तो कुणालाही ओळखू शकत नाही 2013 मध्ये या आजाराने पहिले आक्रमण केले ते त्याच्या नेमके त्याच्या डोळ्यावरच,,, आणि काही दिवसातच हे दुखणे पायापर्यंत पोहचले हालचालच थांबली, लिंबाराम ला आज आर्थिक मदतीसाठी याचना करावी लागत आहे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मदत केली ...

अलीबाब देखील चोरच होता- ,,फक्त,,,,

गोष्टीच नाव वाचून थोडं आश्चर्य जरूर वाटेल पण आपण सारेच त्या भ्रमाला मान्यता देणारे आहोत गेली अनेक वर्षोनुवर्षे आपण हेच मानत आलो आहोत की अलीबाबा आपलं जीवन काबाडकष्ट करत प्रामाणिकपणे जगत होता त्यासाठीच ही गोष्ट आज सक्काळी सक्काळी नातू महाराज उठले आणि कार्टून लावून बसले वृत्तपत्र वाचता वाचता मग मी ही चोरट्या धावत्या नजरेने कार्टून पाहू लागलो तस मला ही ते बघायला आवडतच आणि त्यात नेमकी अलीबाबा चाळीस चोरांची गोष्ट *(चोर तर अलीबाबा देखील होता)* लागली होती,,,, ती पाहता पाहता हीच गोष्ट जेव्हा मी माझ्या आई कडून ऐकली होती तेव्हा आईला मी एक दोन प्रश्न विचारले होते,,,,,अलीबाबा बाबत,, अर्थातच आईला तो कदाचित उत्तर माहिती नसेल किंवा तिच्या भ्रमा प्रमाणे आजही तो आपलाही भ्रमच आहे आणि आजही त्यातच जगत आहोत मात्र आईने त्यावेळी तू मोठा झालास की कळेल अस उत्तर त्यावेळी तिने दिले होत,,, आणि कार्टून पाहताना आज सहज लक्षात आलं *साधा गरीब काबाडकष्ट करत जगणारा अलीबाबा देखील चोरच होता त्याला गुहेतील प्रकार कळला आणि त्याने संधीच सोन केलं* त्याच्या मनात जर चोर नसता तर त्याने हा सगळा प्रकार राजाला जाऊन सांगितल...

आई, लिंबूमिर्ची आणि हिंदुत्व

काल सहजच थोडा सक्काळी निवांत चहा पीत बसलो होतो नातवाने कार्टून लावलं होत ते पहात होतो एक लहान मुलं आईला विचारत होत मा क्या भगवान से डरणा चाहीये,,,आई, नही बेटा अपने गलीतीयोसे सिखोगे तो भगवान से डरने की कोई आवश्यकता नही,, *अगर निडर बनाना है तो गलतीयोसे डरणा भगवान तो तुम्हरा भला ही चाहते है*,,,,,  तोच दारात एक लिंबू मिर्ची वाला आला, साब लगावू क्या,,, मी मानेनेच नकार देत त्याला पिटाळले,,,  आणि अयोध्येतील प्रसंग आठवला,,,  (उद्धव साहेबांनी आवाज दिल्यावर ) मी अयोध्येत गेलो होतो तेव्हाचा प्रसंग डोळयांसमोर आला अयोध्येचा कार्यक्रम आटोपून मी एका रिक्षात बसून निघालो थोडं दूर जातो नाही तोच सिग्नलवर एक लिंबूमिर्ची वाला आडवा आला तस त्या रिक्षा वाल्याने ती लिंबूमिर्ची घेतली,,लगेचच एक काली मातेचं रूप घेतलेली एक स्त्री अशी लालेलाल जीभ बाहेर नाचवत ती आडवी आली तस झटकन त्याने तिला पिटाळून लावली,, मला आश्चर्य वाटून त्याला मी विचारलं,, कारे बाबा जी भूत खेत दिसत नाहीत जी वाईट नजर दिसत नाही त्यासाठी तू लगेच लिंबूमिर्ची घेतलीस पण जी देवी स्वतः भुतांना मारू शकते तिला मात्र तू पिटाळून लावलस?...

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*

पूर्वी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती सागर नद्या, आकाश त्याचप्रमाणे माणसाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसत असे त्यामुळे तेव्हा tv मोबाईल इंटरनेट च जाळ नसल्यामुळे मुलांना खेळ लगोरी कबड्डी पतंग सूर पारंब्या असे मैदानी खेळ खेळले जात आकाश निरभ्र असल्या मुळे रात्री हमखास आम्ही शहरात असल्यामुळे गच्चीवर झोपत असू मग आपसूकच टक्क उघड्या डोळ्यांनी जितकं आभाळ डोळ्यात सामावून घेता येईल तितकं सामावून घेत झोपी जात असू पण या दरम्यान बरेचदा संध्याकाळी घरी हंस पक्षांचा थवा उडत जाताना दिसे,,, मी बरेचदा टक लावून पहात बसत असे ते इंग्रजी *V* आकारात उडत असत मला नेहमी असा प्रश्न पडे की हे असेच का उडतात? मागच्याला पुढे जावस वाटत नाही का? की पुढचा मागच्याना उडुच देत नाही? बर ते मान्य केलं तरी मग मधले काय करतात? ते का जोर लावून पुढच्याला ढकलत किंवा बाजूला होत स्वतः उडत??? आता *त्यावेळी आमचा गुगल म्हणजे आमची आजी* तिच्याशिवाय कोण उत्तर देणार??? मग आजी उत्तर देत असे अरे बाळा तू शाळेत जातोस की नाही ते तुझ्या पुस्तकात विमान पाहिलस की नाही? ते असच इंग्रजी *V* आकारासारखं असत मानवाला निसर्ग सारखा शिकवत असतो इंग्रजी *V...

जपान सारखे देश पुढे का आहेत

|| श्री नथुरामाय नमः || जपान सारखे देश पुढे का आहेत,,,, खेळाडूच पण दोन देश वेगवेगळे,, एक देश अजूनही 21 व्या शतकात जायच्या बाता मारतो आणि दुसरा देश 21 व्या शतकाच्याही कित्येक मैल पुढे आहे कारण त्यांना त्यांच्या देशाप्रती असलेला धर्म बजावणे म्हणजे येताजाता क्रिकेट खेळणे त्यावर बंदी घालणे शत्रूचा समाचार क्रिकेटच्या ब्याट घेणे मग भले ते आमच्या सारहद्दीत घुसून आमच्या जवांनांची शिरकमल कापून नेतील पण आम्ही खंबीर आहोत अरे क्रिकेट खेळायला तर बघा कशी बंदी घालतो अरे क्रिकेट खेळायला तर या नाही तुम्हाला हरवलं आणि ते हि शुक्रवारी तर तर तर ,, बस तर आणि तर जसा राजा तशीच प्रजा खर तर जशी प्रजा तसा राजा हवं का?? हे म्हणजे कोंबडी आधी कि अंड आधी असच झालं,,, असो,, जागतिक स्तरावर तुमचे कितीही मोठे नाव असो नियम म्हणजे नियम संघाची शिस्त मोडली तर शिक्षा हि मिळणारच,, *मोमोता* बेडमिंटन रेंकिंग मध्ये आजच्या घडीला दुसर्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू,,, ज्याने गेल्या ऑगस्ट मध्ये वर्ल्ड च्याम्पियनशिपमध्ये ब्राँझ पदक मिळवले होते जपानचे हे वर्ल्ड च्याम्पियनशिप मधील पहिलेच पदक त्याम...

तुलसीदास राम-बाकी 2

तुलसीदासांना ........ एकदा एका भक्तांने विचारले की "महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता..तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का?".... . तुलसीदास म्हणाले "हो" . भक्त:- मला पण दर्शन घडवाल का?... . तुलसीदास:- "हो नक्की" . तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं...जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेलं... . . तुलसीदास म्हणाले "अरे हे खुप सोप्प आहे अरे तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. ". अरे प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल... . त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक सांगतो.....त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल... . भक्त:-"कोणते सुत्र?" . तुलसीदास:- "||नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण|| ||तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम||" . . 👆वरील सुत्राप्रमाणे... आता कोणाचेही नांव घ्या... . त्याची अक्षरे माेजा... . १)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.. २)त्यात (पंच तत्व मिलन) ५ मिळवा.... ३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.. ४)आलेल्या सं...

बलिदान मास आणि विस्टन चर्चिल

गुरुजींच्या संपर्कात आलो आणि मग गुरुजींनी सांगितलेल्या वाटेवर बिनबोभाट चालायचं इतकंच माहिती त्यांच्या सांगितलेल्या गेलेल्या शिकवणुकीत बलिदान मास देखील येतो आणि मी तो कसोशीने पाळतो,,,काल पासून अनेकांनी मुंडन केलेले फोटो fb वर टाकलेत, कुणी गोड वर्ज्य ,,यर कुणी अनवाणी महिनाभर,,कुणी कुणी आपण कसा बलिदान मास करणार वैगेरे  वैगेरे टाकलं आहे. आता दोन गोष्टी आहेत,,,, साधारण 3/4 वर्षापूर्वी एका परिचित आमच्या जोशी बाईकडे गेलो होतो कामा निमित्त,, गप्पा टप्पा चालल्या होत्या बाई म्हणाल्या बस चहा ठेवते मी म्हंटल नको नको मी चहा घेत नाही बर मग कालच गावाहून कडकडे (लाडू) मी त्याला ही नकोच म्हंटल , सध्या गोड खात नाही मी मी अत्यन्त गोडघाशा हे माहीत असल्या मुळे आश्चर्याने त्यांनी विचारलं का रे काय झालं??? मग मी सांगितलं की आमचा बलिदान मास चालू आहे ना मग मी एकच वेळ जेवतो आणि काहीही गोड खात नाही,, मग ते का कशासाठी कुणासाठी कुणीसांगितलं वैगेरे वैगेरे सांगितलं आधी वाटलं की हे ऐकून त्यांना बर वाटेल पण त्या रागावल्या छे छे असलं काही करून काही उपयोग आहे का ? उगाच नको ते उद्योग अरे दिवसभर तुझं एक तर...

आज त्या निलकंठाचा उत्सव आहे,,,,

आज महाशिवरात्री आहे सोमवारी आल्यामुळे त्याच महत्व अधिक, भगवान शिव म्हणजे स्मशान जोगी, स्मशान म्हणजे सर्व काही संपले पण तिथली देवता म्हणजे शिव,, आणि शिव म्हणजे कल्याण करणारी देवता चांगलं करणारी देवता, आपल्या कडे यज्ञ करायची त्याला आहुती द्यायची परंपरा आहे या यज्ञात चांगल्याच वस्तू अर्पण करायच्या असतात चांगली वस्तू जाळली की त्याच होत #*भस्म* भस्म हे पवित्र असते, हेच भस्म शिवाला देखील प्रिय असते, या सृष्टीत जे जे काही जळणार त्याची #*राख* होते, म्हणून आपले जीवन कार्य समाजातील वागणूक, नातेसंबंध, सामाजिक बंधिकली, जपत त्यानुसार सगळ्यांना आनन्द देत जीवन जगणं ही खरी #*शिवोपासना* त्यामुळे ह्या शरीराचे काम झाले की ते देखील अग्नीला अर्पण करायचे असते त्याचे होते ते #*भस्म* पण आपण समाजात वावरतोच असे की त्याची #*राख* होते मृत्यूचा ही उत्सव साजरा करणारी आपली परंपरा तेव्हा आपण ठरवायचं की आपली #*राख झाली पाहिजे की भस्म* त्यामुळे संसारात राहून वैराग्य म्हणजे काय ते भगवान शिवां कडून शिकावं प्रत्यक्ष ज्यांचं राहायचं स्थान कैलास ते सार त्यागून रमतात कुठे तर स्मशानात वैराग्य म्हणजे दारिद्र्यात रा...

बघतोस काय मुजरा कर😂🤣😂🤣

*बघतोस काय मुजरा कर❓* खरं तर युट्युबवर तो *पोवाडा नामक गाण ऐकलं* तेव्हाच तार सटकली होती पण तरीही,, जितेंद्र जोशी माझा आवडता हिरो त्यातही एक अमराठी मराठी लोकांना त्यांच्या दुर्गसम्पत्तीच जतन केले तर तर महाराष्ट्राच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो आणि त्यातूनच आपली *दुर्गवैभव* कस वाचवता येईल त्यातूनचं आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यातही महाराज आणखी घराघरात नव्हे तर प्रत्येकाच्या काळजात जातील,, हे सांगण्यासाठी एक अमराठी पुढे येतो हेच खूप कौतुकास्पद होत माझ्यासाठी,,, पण *सिनेमाची सुरवात आणि शेवट* एव्हड्या दोनच गोष्टी परिणामकारक आहेत बाकी,,, *हे राम* या सिनेमात एक छान मुद्दा घेतला आहे तो म्हणजे *शिवस्मारकाचा* कि 1600 कोटी त्या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते या गडकिल्यांवर खर्च करा हे *गडकोट म्हणजे महाराजांचं स्मारक* मग असला *टुकार* सिनेमा कढण्यापेक्षा प्रथम त्यांनीच त्या *सिनेमाला आलेला खर्च आणि महाराजांच्या नावावर केलेली लंडन वारी टाळली असती तर निदान माझ्या मते निदान एक गडाच तरी नक्कीच संवर्धन झालं असत,,* हो टुकारच,,,,कारण,, गावरान भाषा आणि गावातील लोक दाखवताना केवळ ...

धप्पा- अकलेचे कांदे

आपल्याकडे *अकलेच्या कांद्याची* कमतरता नाही विशेषतः मराठी भाषिकांमध्ये तर नाहीच नाही 2/3दिवस पुण्यात होतो ठिकठिकाणी *#धप्पा* या सिनेमाचे कुतूहल वाटावे असे पोस्टर्स लागले होते ते पाहून मला ही वाटलं होत की कदाचित विसर्जन करताना गणरायाची कशी विटंबना होते किंवा dj चा त्रास कसा होतो , वर्गणी वैगेरे,,, रोजच्याच तक्रारीवर आधारित सिनेमा लहान मुलांना हाताशी धरत मोठ्यांची कानउघडणी करत असतील असा प्रयत्न सिनेदीगदर्शकाला करायचा असेल,,,, पण आज वृत्तपत्रात त्याची थोडी माहिती आली,,, सोसायटीत होणार गणेशोत्सव आणि त्यात बसवले जाणार नाटक यावरून बाहेरचे *#गुंड*   वैगेरे कसे धमकावत आणि ते *#गुंड आणि सोसायटीत लोक* आल्यावर नरमाईची भूमिका मग कसे या *# गुंडांना* शरण वैगेरे जातात , आणि सोसायटीची अगतिकता हीच कशी देशाची अगतिकता वैगेरे वैगेरे *#अगदी सांस्कृतिक दहशतवाद* आणि हा दहशतवाद देशाला हिंदू धर्माला किती कसा घातक वैगेरे याची भाषण तिरकस संवाद ,,,,, अरे काय चाललय काय,,? गणेशोत्सवात येशू ख्रिस्त दाखवण्यासाठी इतका अट्टाहास का? येशू दाखवला नाही तर आमच्या मुलांना वृक्षवल्लीचा संदेशच समजणार नाही का...